गट-अ व गट-ब साठी अनुकंपा धोरण लागू व व अन्य माहिती | Compassionate policy for Group-A and Group-B and other information

भाग-तीन

भाग दोन येथे पाहण्यात यावा.

प्रस्तावना:-शासकीय सेवेत असताना अधिकारी/कर्मचारी दिवंगत झाल्यास अथवा गंभीर आजार, अपघात यामुळे शासकीय सेवा करण्यास वैद्यकीय दृष्ट्टया कायमचा असमर्थ ठरल्यामुळे रुग्णता सेवा निवृत्त झाल्यास त्याच्या कुटुंबावर ओढावण्या-या आर्थिक आपत्तीत कुटुंबिंयांना तातडीने मदत मिळण्याच्या उद्देशाने अनुकंपा(Compassion)नियुक्तीची योजना लागू  केली. 

अनुकंपा नियुक्ती धोरणातील सर्व तरतूदींचे एक‍त्रिकरण करण्यात आले आहे. प्रचलित अनुकंपा नियुक्ती धोरणानुसार गट-क व गट-ड मधील राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवेत असताना निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यास गट-क व गट-ड मधील पदावर अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात येते. आता शासन निर्णय दि.27/09/2021 नुसार गट-अ व गट-ब साठी अनुकंपा धोरण लागू करण्यात आले आहे. गट-अ व गट-ब मधील अधिकारी/कर्मचाऱ्यांची मागणी खूप दिवसापासून होती. ती शासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे. शासकीय सेवेत असताना गट-अ व गट-ब मधील दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील पात्र सदस्यास गट-क व गट-ड मध्ये अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय करण्यात येत आहे. तसेच सदर योजनेचा लाभ हा दिनांक 1 जानेवारी,2020 पासून अनुज्ञेय करण्यात आला आहे.

शासन निर्णय दि 26/02/2013 नुसार अनुकंपा नियुक्ती धोरणातील तरतूदीमध्ये सुधारणा-विवाहीत मुलीस अनुकंपा नियुक्तीस पात्र ठरविण्यात आले आहे.

महत्वाचा शासन निर्णय दि 22/12/2021 नुसार अनुकंपा तत्वावर 20 टक्के पदे भरण्याच्या मर्यादेस दि.31.12.2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

शासन निर्णय दि 26/08/2021 नुसार अनुकंपा तत्वावर नियुक्तत्या जलदगतीने होण्यास सहाय्यभूत म्हणून अनुकंपा नियुक्ततीची प्रमाणित कार्यपध्दती (SOP) प्रसिध्द करण्यात आली आहे.

शासन निर्णय दि 23/06/2021 नुसार अनुकंपा तत्वावर नियुक्तीच्या अनुषंगाने टंकलेखन प्रमाणपत्र सादर करण्याच्या तरतूदीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

 शासन निर्णय दि 27/04/2021 नुसार महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत राज्य कामगार विमा योजनेच्या मुळ कामगाऱ्यांना अनुकंपा योजना लागु करण्यात आले आहे.

 शासन निर्णय दि 06/0/2021 नुसार सेवेत असताना दिवंगत झालेल्या समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळण्याबाबत.

शासन निर्णय दि. 11/09/2019 नुसार सेवेत असतांना दिवंगत झालेल्या गट- क व गट-ड संवर्गातील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या नियंत्रणाखालील कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटुंबियांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळण्याबाबत.

शासन निर्णय दि. 11/07/2019 नुसार राज्यातील महानगरपालीका/नगरपरिषद/नगरपंचायतींमधील पात्र अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंपा नियुक्ती योजनेसंदर्भातील सुधारित शासन निर्णय लागू करण्यात आला आहे.

शासन निर्णय दि. 12/05/2016 नुसार अनुकंपा प्रतिक्षा यादीतील अर्हताधारक उमेदवारांना स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर नियुक्ती देण्याच्य कार्यपध्दतीबाबत.

शासन निर्णय दि. 11/04/2011 नुसार अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी शासनाकडे अर्ज केलेल्या मृत शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास शासकीय निवासस्थानात रहाण्यास दयावयाच्या मुदतवाढीचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

शासन निर्णय दि. 17/03/2022 नुसार महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ व वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (म.) मंबुई या महामंडळातील कर्मचाऱ्यांना अनुकंपा नियमुक्तीचे धोरण लागू करण्यात आले आहे.

Leave a Reply