शासकीय नोकरी | Government Job vacancy in Maharashtra

प्रस्तावना :- करोनाच्या काळात शासकीय  असो खाजगी नोकर भरती करण्यात आली नाही. आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. मा. पंतप्रधान यांनी केंद्रशासनातील पदे भरण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे केंद्रशासनाच्च्या अखत्यारीतील विभागाची लवकर जाहिरात येऊ शकते. तसेच  महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारातील विभागात सुध्दा भरती होऊ शकते. राज्यात तलाठयांच्या जागा मोठयाप्रमाणात रिक्त असल्याने महसूल यंत्रणेवर पडणारा भार लक्षात घेऊन 3165 तलाठी पदे भरण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजूरी दिली असुन पहिाल्या टप्यात एक हजार (1000) तलाठयांची भरती  करण्यात येईल. अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत केली होती. त्यानुसार शासनाकडून 31/12/2020 पर्यंतच्या रिक्त पदांचा तपशील मागविण्यात आला आहे.

पोलीस भरती. 7 हजार 231 पदांची पोलीस भरती करण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी विधानसभेत केली होती. मागासवर्गीयांच्या 15426 पदांचा अनुशेष भरुन काढण्यासाठी विशेष भरती मोहीम राबविण्यात येणार आहे. असे सामान्य प्रशासन राज्यमंत्री श्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत सांगितले होते.

वाढते पशुधन आणि विभागाची प्रशासकीय गरज लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी विधानपरिषदेत दिली होती.

तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग(MPSC) यांच्या जाहिरीती येत आहे. पुढील काळात शासकीय नोकर भरती होऊ शकते. त्यासाठी  मुलांनी अभ्यासाला लागावे. पोलीस भरतीच्या मुलांनी शारीरिक क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करावा. शासकीय नोकरी लागल्यानंतर तुम्हाला शासकीय(प्रशासकीय) ज्ञान असणे गरजेच आहे. यासाठी आपल्याला emahgov.com या Website चा उपयोग होऊ शकतो.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग(MPSC) वर New Candidate ने येथे नोंदणी करावी.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग(MPSC) च्या जाहीरीती येथे पाहण्यात याव्यात. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग(MPSC) चा निकाल येथे पाहावा.

शासन निर्णय 12/04/2022 नुसार पदभरती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तयारीला लागा.

(1) ज्या प्रशासकीय विभागांनी वित्त विभागाच्या  दि.11.02.2016 च्या शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे सुधारित आकृतीबंध अंतिम मंजूर केले आहेत. अशा सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता अन्य पदे 50 टक्के भरण्यास अनुमती देण्यात येत आहे. वरील प्रमाणात  पदभरतीसाठी एकही पद उपलब्ध होत होत नसल्यास किमान एक पद भरता येईल.

(2) ज्या प्रशासकीय विभागांनी वित्त विभागाच्या दि.11.02.2016 च्या शासन वनर्णयातील निर्देशाप्रमाणे सुधारित आकृतीबंध अंतिम मंजूर केले आहेत. अशा सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील रिक्त पदे 100 टक्के भरण्यास मुभा देण्यात येत आहे.

(3) कोविड -19 च्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर  उपाययोजनांतर्गत दि..04.05.2020 चे निर्बंध लागू झाल्यानंतरच्या कालावधीत उच्च स्तरीय सचिव समितीने / उपसमितीने मान्यता दिलेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील रिक्त पदे 100 टक्के भरण्यास मुभा देण्यात येत आहे.

Leave a Reply