साहवा वेतन आयोग | Sixth Pay Commission Maharashtra

प्रस्तावना:- 2008 मध्ये हकीम समिती स्थापन केली होती. शासन निर्णयदि.27/02/2009 नुसार राज्य वेतन सुधारणा समितीच्या शिफारशी स्विकृत करण्यात आल्या आहे. शासनअधिसूचना दि.22/04/2009 च्या अधिसूचना नुसार दिनांक 01/01/2006 पासून साहवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. शासन परिपत्रक दि.29/04/2009 नुसार वेतन नियम-2009 नुसार वेतन निश्च‍ितीबददल सूचना देण्यात आल्या आहे.

साहवा वेतन आयोग (sixth compensation commission) Infrmation about Sixth Pay CommissionInformation about Sixth Pay Commission

जोडपत्र-I       जोडपत्र-3        शासननिर्णय दिनांक-09/06/2009      शासननिर्णय दिनांक-31/08/2009

शासननिर्णय दिनांक-05/05/2010   शासननिर्णय दिनांक-25/10/2011  शासननिर्णय दिनांक-26/12/2011

शासननिर्णय दिनांक-11/07/2012  शासननिर्णय दिनांक-11/02/2013   शासननिर्णय दिनांक-03/09/2013

शासननिर्णय दिनांक-24/06/2015

म.ना.से.( सुधारीत वेतन ) नियम 2009

अ.क्र.

विषय

म.ना.से.(वेतन)नियम 1981 अन्वये नियम

 सुधारीत वेतन नियम 2009 अन्वये नियम

1

सुधारीत वेतन संरचनेत प्रारंभिक वेतन निश्चीती

नियम क्र.7

2

शासकिय सेवेत प्रथम नियुक्ती

 नियम क्र. 10, 40

नियम.8(जोडपत्र 3)

3

वरिष्ठ पदावर पदोन्नती

नियम क्र. 11 (1)

नियम क्र. 13 (अ)(1)/13(अ)(2)

4

समान जबाबदारीच्या पदावर बदली / नियुक्ती

नियम क्र. 11(2)(अ/ब/ड)

 

5

निवड श्रेणी लागु होणे

नियम क्र. 11(4)

 

6

पदोन्नती, पदावनती पुन्हा पदोन्नती अशा प्रसंगी वेतनाचे नियमन

नियम क्र. 14(4) परंतुक

 

7

विकल्प दिल्यावर करावयाची वेतननिश्चीती

शासन निर्णय      दि. 6/11/1984

13(ब)(1)

8

पदावनती

नियम क्र.12

12

9

पदाच्या वेतनमानात बदल

नियम क्र. 15

 

10

शिक्षा म्हणुन पदावनती

नियम क्र. 16

 

11

परिविक्षाधिन नियुक्तीतील वेतनवाढी

नियम क्र. 39 (1) अपवाद

 

12

शिक्षा म्हणुन वेतनवाढ रोखणे

नियम क्र. 36

 

13

मुदतपुर्व/आगाउ वेतनवाढ

नियम क्र. 40

 

14

शिक्षा म्हणुन वेतन कपात करणे

नियम क्र. 42

 

15

नियुक्त्याचे एकत्रीकरण / अतिरिक्त कार्यभार सोपविणे

नियम क्र. 56

 

 1) सुधारीत वेतन संरचनेत प्रारंभिक वेतन निश्चीती

दिनांक 1 जाने वारी 2006 पासुन सुधारीत वेतन संरचना लागु करण्यासाठी सर्व कर्मचा-याबांबतीतदिनांक 1 जानेवारी 2006 रोजी सुधारीत वेतन श्रेणीतील वेतननिश्चीती विद्यमान वेतनश्रेणीतील मुळ वेतनास 1.86 ने गुणून येणा-या रकमेच्या पुढील 10 च्या टप्प्यातील रकमेवर करण्यात येईल. ही रक्कम पुर्णाकिंत करताना 50 पैसे अथवा त्यावरील रक्कम पुढील 10 रुपयाच्या पटीत पुर्णाकिंत करण्यात यावी.

जर वरील प्रमाणे येणारे वेतन सुधारीत वेतनश्रेणीतील किंवा टप्प्याहुन कमी असेल तर सुधारीत वेतनश्रेणीतील किमान टप्प्यावर वेतननिश्चीत केले जाईल.वरील प्रमाणे वेतनबँन्डमधिल वेतननिश्चीत करुन या वेतनबरोबरच विद्यमान वेतनश्रेणीतील विहित केलेले समुचित ग्रेड वेतनही अनुज्ञेय राहील.विद्यमान वेतनश्रेणीतील वेतनाबरोबर विशेष भत्ता/ विशेष वेतन मिळणा-या कर्मचा-याबाबतहीवरील प्रमाणे वेतननिश्चीती करण्यात येईल.

2. शासकिय सेवेत प्रथम नियुक्ती  (नियम क्र.8) ( जोडपत्र -3)

        एखाद्या व्यक्तीची शासकिय सेवेत प्रथम नियुक्ती झाल्यास  नियम क्रमांक 40 च्या प्राधिकारानुसार उच्च प्रारंभिक वेतननिश्चीत केलेले नसेल तर तिला महाराष्ट्र नागरी सेवा ( सुधारीत वेतन ) नियम  2009 मधील नियम क्र. 8 अनुसार या नियमातील जोडपत्र -3 मध्ये दर्शविल्यानुसार त्याचे नियुक्तीच्या वेतन बँड मधील प्रारभिक वेतन अनुज्ञेय ग्रेड वेतन मंजूर करण्यात येईल.

दिनांक

वेतनश्रेणी

शेरा

 

5200-20200

 

1/01/2007

7510+2400

जोडपत्र 3 ( म.ना.से. सुधारीत वेतन नियम2009मधिलनि.क्र. 8 )

2. उदाहरण :- सुधारीत वेतनसंरचनेतील  वेतनबँड रु. 4440-7440 मध्ये खालील कर्मचारी वेतनग्रेड अनुसार नव्याने नियुक्त करण्यात आली.

1.   श्री यांची ग्रेड पे रु. 1300/-

2.   श्री यांची ग्रेड पे रु. 1400/-

3.   श्री यांची ग्रेड पे रु. 1600/-

4.   श्री यांची ग्रेड पे रु.1650/-

5.   श्री यांची ग्रेड पे रु. 1700/-

तर वरील कमर्चा-यांचे प्रारंभिक वेतन निश्चीत करा.

कर्मचारी

वेतनबँड मधिल वेतन

ग्रेड पे

एकुण वेतन

4440

1300

5740

4440

1400

5840

4840

1600

6440

4920

1650

6570

4920

1700

6620

3. वरिष्ठ पदावर पदोन्नती :-      वरिष्ठ पदावर पदोन्नती झाल्यास (कर्मचा-यांच्या नविन पदावरील नियुक्तीमुळे जुन्या पदाच्या कर्तव्यापेक्षा अधिक महत्वाची कर्तव्ये किंवा जबाबदा-या येत असतील तर)

महाराष्ट्र नागरी सेवा नियम ( सुधारीत वेतन ) 2009 मधील नियम क्र. 13 (अ)(1) नुसार तो धारण करीत असेल त्या पदाच्या वेतनबँड मधील वेतन अधिक ग्रेड वेतनाच्या 3%  इतकी वेतनवाढीची रक्कम पुढील 10 च्या पटीत पूर्णांकित करण्यात यावी. ही रक्कम वेतन बँड मधील विद्यमान वेतनात मिळविण्यात यावी आणि त्या वेतनावर पदोन्नतीच्या पदास लागु असलेले ग्रेड वेतन मंजूर करण्यात यावे. अशा पदोन्नतीच्या प्रसंगी वेतन बँड बदलत असलेल्या प्रकरणीही वरीलप्रमाणेच वेतननिश्चीती करण्यात येईल.  तसेच वरील प्रमाणे गणना करुनही  वरिष्ठ पदाच्या वेतन बँडचे किमान वेतन अधिक असेल तर अशा प्रसंगी वरिष्ठ पदाचे किमान वेतनावर त्याची प्रारंभिक वेतननिश्चीती केली जाईल.

दिनांक

वेतनश्रेणी (6 व्या वेतन आयोगानुसार )

 

 

5200-20200

ग्रेड पे-2400

9300-34800

ग्रेड पे-4200

1/01/06

 

7510+2400

 

1/07/06

 

7810+2400

 

1/07/07

 

8120+2400

 

1/06/08

पदोन्नती

 

8440+2400

9300+4200

       महाराष्ट्र नागरी सेवा ( सुधारीत वेतन ) नियम 2009 मधील नियम क्र. 13 (अ ) (2) नुसार पीबी-4 वेतनबँड (37400-67000) मधून उच्च प्रशासकिय श्रेणीत पदोन्नती मिळाल्यावर वेतनबँड मधील वेतन ग्रेड वेतनावर  3% दराने पुढील  10 च्या पटीत घ्यावी ती विद्यमान वेतनात मिळवावी. मात्र अशी वेतनवाढ देउन त्याच समुचित विद्यमान ग्रेड वेतनाची रक्कम मिळवून येणारी रक्कम रु. 80000/-  पेक्षा अधिक असता कामा नये.

उदाहरण :-

        श्री हा शासकिय कर्मचारी वेतनश्रेणी रु. 5500-175-9000 मध्ये दिनांक 1/08/2005 पासुन रु.8475/- वेतन घेत होता.  त्याची वरिष्ठ पदावर वेतनश्रेणी रु. 6500-200-10500मध्ये पदोन्नती झाली  त्याने वरिष्ठ पदाचा कार्यभार दिनांक 1/11/2005 रोजी स्विकारला. म.ना.से. ( सुधारीत वेतन ) नियम 2009  अनुसार रु. 6500-200-10500 या वरिष्ठ वेतनश्रेणीला सुधारीत वेतनसंरचनेत वेतनबँड  रु. 9300-34800 ग्रेड पे 4400/-मध्येसमाविष्ठ करण्यात आलेले आहे. त्यांनी दिनांक 1/01/2006 पासुन सुधारीत वेतन संरचनेनुसार वेतन घेण्याचे मान्य केले आहे. तर श्री च्अछ यांचे दिनांक 1/11/2006 चे वेतन काय राहील.

दिनांक

पहिले पद

दुसरे पद

नियम क्रमांक

 

5500-175-9000

6500-200-10500

 

1/08/5

8475

 

 

1/11/05

8475+175=8650

8700/-

11 (1)

 

 

9300-34800 ग्रेड पे 4400

 

1/01/06

 

16190+4400

11

1/07/06

 

16810+4400

39 सुधारीत नि.क्र.10

1/11/06

 

16810 +4400

13 (1) सुधारीत नियम

 

7) महाराष्ट्र नागरी सेवा ( सुधारीत वेतन ) नियम 2009 मधिल नियम क्र. 13 (²Ö) (1) अनुसार विकल्प दिलेल्या शासकिय कर्मचा-यांच्या बाबतीत पदोन्नतीच्या दिनांकास त्याच्या वेतनबँड मधिल वेतनात बदल होणार नाही. मात्र त्यास पदोन्नतीच्या पदाचे ग्रेड वेतन त्या दिनांकापासुन मंजुर करण्यात करण्यात येईल त्यांनतर पुढील वेतनवाढीच्या दिनांकास म्हणजेच दिनांक 1 जुलै रोजी त्याचे वेतन निश्चीत करावे यावेळी प्रथम त्याला वार्षिक वेतनवाढ आणि दुसरी पदोन्नतीची वेतनवाढ अशा दोन वेतनवाढी देण्यात याव्यात या वेतनवाढी परिगणित करताना पदेान्नती पुर्वीचे मुळ वेतन विचारात घेण्यात यावे.

 उदाहरण :-

विकल्पाशिवाय

दिनांक

वेतनश्रेणी

वरिष्ठ वेतनश्रेणी

 

5200-20200 ग्रेड पे 2800

9300-34800 ग्रेड पे 4300

1/07/2006

11160 +2800

 

11/02/2007                ( पदोन्नती )

11580

11580 + 4300

 1/02/2008

 

120 +4300 नियम क्र.39

विकल्पासह

दिनांक

वेतनश्रेणी

वरिष्ठ वेतनश्रेणी

 

5200-20200 ग्रेड पे 2800

9300-34800 ग्रेड पे 4300

1/07/2006

 11160 +2800

 

11/02/2007                ( पदोन्नती )

 

11160 +4300 

 1/07/2007

(11580+2000) 3%=12020

12020+4300 नि.क्र.39

1/07/2008

 

12510+4300( नि.क्र.39 ) नि.क्र 10 सुधारीत )

 ( 2 जानेवारीते 30 जुन दरम्याने पदोन्नती झाल्यास विकल्पाचा फायदा होतो. )

 8. पदावनती ( नियम क्र. 12 ):-

         आस्थापनेतील पदांची संख्या कमी केल्याने किंवा वरच्या पदावरील स्थानापन्न बढतीचा संपल्याने खालच्या पदावर पदावन्नत होणा-या शासकिय कर्मचा-याच्या बाबतीत त्याची वरच्या पदावर नियुक्ती झाली नसती तर त्याला खालच्या पदाच्या समयश्रेणीतील ज्या टप्प्यावर नियम क्रमांक 39 अन्वये अनुज्ञेय वेतन मिळाले असते त्या टप्प्यावर त्याच्या खालच्या पदावरील वेतननिश्चीत करण्यात यावे.

          तथापीमनासे.(सुधारीत वेतन नियम ) 2009 मधिल नियम क्र.12 मधिल तरतुदीनुसार पदोन्नतीच्या पदाचे ग्रेड वेतन संबधित कर्मचा-याला पदोन्नतीच्या दिनांकापासुन अनुज्ञेय ठरते म्हणुन अशा कर्मचा-याची पदावनती झाल्यास तसेच ही पदावनती नियम क्र. 12 मधिल तरतुदी नुसार असेल तर वेतनबॅड मधिल वेतनामध्ये आवश्यक नसेल तर बदल होणार नाही मात्र ग्रेड वेतन खालच्या पदाचे संबधित कर्मचा-याला मंजुर करता येईल म्हणजेच जर त्या कर्मचा-यांची पदोन्नती झाली नसती तर त्याला जे वेतन मिळाले असते ते वेतन सुरु होईल.

उदाहरण :-

        श्री कर्मचारी वेतनश्रेणी रु. 4000-100-6000/- मध्ये दिनांक 1/07/2000 पासुन रु. 5700/- इतके वेतन घेत होते. दिनांक 1/09/2000 पासुन त्यांची वरिष्ठ पद वेतनश्रेणी रु. 5500-175-9000/- मध्ये पदोन्नती झाली. दिनांक 1/10/2002 पासुन त्यांना त्याच्या जुन्या पदावर पदावनत करण्यात आले त्यांच्या जुन्या पदावरील वेतननिश्चीती करा.

उत्तर :-

दिनांक

वेतनश्रेणी

वरिष्ठ वेतनश्रेणी

दिनांक

वेतनश्रेणी

 

4000-100-6000

5500-175-9000

 

4000-100-6000

1/07/2000

5700

 

1/07/2000

5700

1/09/2000

5700 +100

5850 नियम क्र. 11(1)(अ)

1/07/2001

5800

1/09/2001

 

6025 नियम क्र.39

1/07/2002

5900

1/09/2002

 

6200  नियम क्र.39

1/07/2003

6000

 

 5) पदोन्नती, पदावनती पुन्हा पदोन्नती  अशाप्रसंगी वेतनाचे नियमन ( नियम क्र.11 (4)  परंतुक )

          पोट नियम 11 (1) 11 (2) हे दोन्हीही लागु होणा-या प्रकरणामध्ये जर शासकिय कर्मचारी जर शासकिय कमर्चा-यांने पुर्वी तेच पद त्याच वेतनश्रेणीत किंवा समरुप श्रेणीतील अन्य पद धारण केले असेल तर नियम क्रमांक 14 मध्ये तरतुद केली असेल खेरीज करुन  इतर बाबतील विशेष वेतन किंवा वैयक्तिक वेतन अथवा नियम क्र. 9 (36) (3) प्रमाणे शासनाने घोषित केलेली इतर वित्तलब्धी वगळुन जे वेतन त्याला अशा लगतपुर्वी मिळाले असेल त्या वेतनापेक्षा त्याचे प्रारंभिक वेतन कमी असणार नाही . त्याला अशा प्रकारे लगतपुर्वी अथवा त्यापुर्वीच्या कोणत्याही प्रसंगी ते वेतन मिळाले असेल तो कालावधी समयश्रेणीतील जो टप्पा त्या वेतनवाढी एकढा असेल त्या टप्प्यावरील वेतनवाढीच्या प्रयोजनासाठी जेस धरण्यात येईल.

          नविनवेतन संरचनेत चार ते पाच विद्यमान वेतनश्रेणीचे एकाच सुधारीत वेतनश्रेणीत रुपांतर करण्यात आल्यामुळे कर्मचा-याची पदोन्नती, पदावनती, पदावनतीमुळे वेतन बँडमध्ये ( पीबी-1,पीबी-2,पीबी-3)  इ. मध्ये सहसा बदल होणार नाही.  सतेच नविन वेतन बँडमध्ये वार्षिक वेतननिश्चीती रक्कम निश्चीत केलेली नसुन ती कर्मचारी घेत असलेल्या वेतन बँड मधिल वेतन अधिक अनुज्ञेय ग्रेड वेतनाच्या बेरजेवर तीन टक्के दराने वार्षिक वेतनवाढ अनुज्ञेय आहे.

 

उदाहरण :-

        श्री हे कर्मचारी वेतनश्रेणी रु. 1640-60-2600 दरो-75-2900 या वेतनश्रेणीत दिनांक 1/07/1994 पासुन रु.2240/- इतके वेतन घेत होते. त्यांना दिनांक 1/04/1994 पासुन वरिष्ठ पद वेतनश्रेणी रु. 2000-60-2300दरो-75-3200-100-3500 मध्ये पदोन्नती देण्यात आली. मात्र पुढे दिनांक 1/06/1995 पासुन पुन्हा वरिष्ठ पदावर पदोन्नती देण्यात आली तर त्यांची वेळोवेळी वेतननिश्चीती कशी होईल ते स्पष्ट करा.

दिनांक

पहिले पद

दुसरे पद

नियम क्रमांक

 

1640-60-2600 दरो-75-2900

2000-60-2300 दरो-7-3200-100-3500

 

1/07/94

2240/-

 

 

1/09/94

(2240+60)

2375/-

11(1)(अ)

1/06/95

2240/-

 

12

1/07/95

2300/-

 

39

1/09/95

(2300+60)

2375/-

11 (1)

1/12/95

 

2450

11(4) परंतुक

10)  शिक्षा म्हणुन पदावनती  नियम क्र.16

शिक्षा म्हणुन खालच्या पदावर प्रत्यावर्तन झाल्याने वेतन शासकीय कर्मचा-याला शिक्षा म्हणुन उच्च वेतनश्रेणीतुन निम्न वेतनश्रेणीत अथवा वरच्या पदावरुन खालच्या पदावर पदावनती करण्याचा आदेश देणारा अधिकारी त्यास योग्य वाटेल त्याप्रमाणे त्या कर्मचा-याला निम्नश्रेणीत किंवा खालच्या पदावर वेतनश्रेणीत कमाल वेतनापेक्षा अधिक नसेल असे कोणतेही वेतन घेण्याची परवानगी देऊ शकेल.

12)  शिक्षा म्हणून वेतनवाढ रोखणे :- (नियम क्रमांक 36)

       महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 मधील संबधीत तरतुदीन्वये शिक्षा म्हणून वेतनवाढ रोखण्यात आलेली नसेल तर सर्वसाधारणपणे ती वेतनवाढ क्रमप्राप्त म्हणून दिली जाईल. वेतनवाढ रोखण्याचे आदेश देताना ती रोखून ठेवणारा प्राधिकारी पुढील बाबी आदेशात नमूद करेल.

1.   वेतनवाढ रोखून ठेवण्याचा कालावधी.

2.   वेतनवाढ स्थगितीचा परिणाम म्हणून आगामी वेतनवाढी लांबणीवर पडतील किंवा नाही.

3.   ज्या कालावधीसाठी वेतनवाढ रोखुन धरण्यात येईल तो कालावधी पुर्ण होण्यापुर्वी त्यातुन मध्यतरीच्या कालावधीतील कोणत्याही रजेचा काळ वगळला जाईल अथवा नाही.

उदा. वेतनश्रेणी रु 9300-34800 ग्रेड पे 4300 मध्ये काम करणारे श्री हे कर्मचारी दि.1/5/07 पासुन रु 11160 वेतन घेत होते. शिक्षा म्हणुन त्यांच्या 2 वेतनवाढी रोखण्यात आल्या सदर कर्मचा-याची वेतन निश्चिती खालील बाबीच्या आधारे करा.

†)  वेतनवाढी रोखण्याचा पुढील वेतनवाढीवर कायम परिणाम होईल.

²Ö) वेतनवाढी रोखयाचा पुढील वेतनवाढीवर कायम परिणाम होणार नाही.

टिप :-  29 दिवसांपपर्यंत रजेमध्ये वेतनवाढीवर फरक पडत नाही.

उत्तर :-

दिनांक

पुढील वेतनवाढीवर कायमचा परिणाम होवुन

पुढील वेतनवाढीवर कायमचा परिणाम होता

नियम

1/05/2007

11160

11160

(11,6,30 )

1/05/2008

11160

11160

36,12,10

1/05/2009

11160

12610

36

1/05/2010

11630

12610

36 36

1)  वेतनवाढीसाठीजमेस धरावयाची सेवा :- 

वेतनवाढीसाठी पुढील तरतुदींच्या अधीन राहुन खालील नमुद केलेल्या कालावधी वेतनवाढीसाठी जमेस धरण्यात येईल.

1.   ज्या पदावर शासकिय कर्मचाऱ्याचा धारणाधिकार असेल अशा पदास लागु होत असलेल्या वेतनश्रेणीतील वेतनसंरचनेत / वेतनवाढीसाठी किंवा नियम 11,14,20,44  च्या तरतुदींच्या अधिन राहुन समयश्रेणीतील एखाद्या पदावरील कर्तव्याचा संपुर्ण कालावधी त्या समयश्रेणीतील वेतनवाढीस जमेस धरण्यात येईल. मात्र महाराष्ट्र नागरी सेवा ( सेवेच्या सर्वसाधारण शर्ती ) नियम क्र. 1981 मधिल नियम क्र. 27 च्या पोट नियम क्र. 1 मधिल कमी वेतनाच्या पदावरील सेवा विचारात घेतली जाणार नाही.

2.   महाराष्ट्र नागरी सेवा ( रजा ) नियम क्र. 1981 मधिल वैद्यकिय कारणाशिवाय घेतलेली रजा वगळुण अन्य कोणत्याही प्रकारची रजा वेतनवाढीसाठी जमेस धरण्यात येईल.

3.   भारतात / भारताबाहेरील स्वियेत्तर सेवेचा कालावधी

4.   प्रशिक्षणासाठी व्यतीत केलेला कालावधी

5.   पदग्रहण अवधी जर महाराष्ट्र नागरी सेवा ( पदग्रहन अवधी ) नियम क्र. 1981 मधिल नियम क्र. 10 (1) खालील अनुज्ञेय असेल तर

2)  परिविक्षाधिननियुक्तीतील दुसरी वेतनवाढ :- नियम क्र. 39 (1)(अपवाद )

काही संवर्गामध्ये कर्मचा-यांच्या नेमणुका परिविक्षाधिन तत्वार प्रथम दोन वर्षासाठी करण्यात येतात परिविक्षाधिन कालावधीत प्रशिक्षण विभागीय परिक्षा उत्तिर्ण झाल्यांतर आणि समाधान कारणरित्या काम केल्यानंतरच अशा नेमणुका पुढे दिर्घ  कालावधीसाठी ठेवण्यात येतात अशा प्रकरणात परिविक्षाधिन काळात नियुक्तीनंतर एक वर्षाने पहिली वेतनवाढ नियमीतपणे दयावी. तथापी दुसरी किंवा त्यापुढील वेतनवाढी निर्धारीत विभागीय  प्रशिक्षण परिक्षा उत्तिर्ण झाल्याशिवाय आणि त्यांचे काम समाधानकारक असल्याशिवाय देण्यात येवु नयेत.

          संबधित कर्मचा-यांच्या नेमणुकीच्या अटी शर्ती अनुसार तो विभागीय प्रशिक्षण अथवा परिक्षा विहित कालावधीत उत्तीर्ण होवु शकला नाही तर त्याचा परिविक्षाधिन कालावधी विशेष बाब म्हणुन वाढविला जातो जेव्हा तो परीक्षा उत्तिर्ण होतो तेव्हा त्याचा परिविक्षाधिन काळ समाप्त करुन नेमणुकीच्या दिनांकापासुन त्याच्या सर्व वेतनवाढी नियमीत केल्या जातील त्याला वेतनवाढीतील फरकसुध्दा दिला जाईल.

          परंतु कर्मचा-याने असमाधकारक काम केले असेल  या कारणास्तव परिविक्षाधिन कालावधी वाढविण्यात आला असेल तर काम समाधानकार झाल्यानंतर परिविक्षाधिन काळ समाप्त करण्यात येईल. मात्र परिविक्षाधिन काळ जेव्हा समाप्त केला जातो तेथुन पुढे दुसरी वार्षिक वेतनवाढ नंतरच्या वेतनवाढी मंजुर केल्या जातील.

        शासन परिपत्रक क्र.वेपुर 1209/प्र.क्र.69/ सेवा-9/ दिनांक 29/04/2009 अन्वये वित्त विभागाने महाराष्ट्र नागरी सेवा  (सुधारीत नियम ) 2009  च्या वेतननिश्चीती नुसार संबधी सुचना प्रसुत केल्या आहेत. त्यातील परिच्छेद क्र. 10 मध्ये नमुद केलेनुसार दिनांक 1/07/2006  रोजी देय वेतनवाढ तसेच त्यापुढील वार्षिक वेतनवाढी महाराष्ट्र नागरी सेवा ( वेतन ) नियम 1981 च्या नियम क्रमांक 36 39 मधिल तरतुदींच्या अधीन राहतील.

उदाहरण :-

        वेतनश्रेणी रु. 9300-34800 ग्रेड पे 4600  मध्ये दिनांक 1/10/2007 पासुन श्री या दोन अधिका-यांची नेमणुक प्रथम दोन वर्षासाठी परिविक्षाधिन तत्वावर करण्यात आली श्री विभागीय परिक्षा उत्तीर्ण झाल्याने आणि श्री यांचे काम समाधानकारक नसल्याने  दोघांचाही परिविक्षाधिन कालावधी एक वर्षाने वाढविण्यात आला नंतर तो पुर्ण झाल्याने समाप्त करण्यात आला तर श्री श्री या दोघांचाही वेळोवेळी होणारी वेतननिश्चीती करा.

दिनांक

श्री यांचे वेतन

श्री यांचे वेतन

नियम क्रमांक

1/10/2007

12540/-

12540/-

10

1/07/2008

13060

13060/-

39

1/10/2009

13060 (13590)

13060

39 (1) अपवाद

1/07/2010

1440

13590

39 (1) अपवाद

4) समान जबाबदारीच्या पदावर बदली अथवा नियुक्ती :- नियम क्र. 11(2) (†,²Ö,›ü )

                 महाराष्ट्र नागरी सेवा ( वेतन ) नियम 1981 मधिल नियम क्रमांक 11 (2) अनुसार नविन पदावर नियुक्ती अथवा बदलीमुळेअधिक महत्वाची कर्तव्य किंवा जबाबदा-या येत नसतील तेव्हा,

) नविन पदाच्या समयश्रेणीतील त्याच्या जुन्या पदाच्या वेतनाएवढया रकमेचा टप्पा एक असेलतर त्याच टप्प्यावर त्याचे वेतननिश्चीत होईल.

ब) असा कोणताही टप्पा येत नसेल तर त्याच्या जुन्या पदाच्या वेतनाच्या पुढील टप्प्यावर नविन वेतनश्रेणीत वेतननिश्चीत केले जाईल.

) नविन पदाच्या समयश्रेणीतील किमान वेतन जुन्या पदावरील तो घेत असलेल्या वेतनाच्या टप्प्यापेक्षा अधिक असेल तर ते किमान वेतन त्याला प्रारंभिक वेतन मिळेल.

14) शिक्षा म्हणुन वेतन कपात करणे :- नियम क्र. 42

         अशी घटणा घडली असेल तर ज्या टप्प्या पर्यंत वेतन खाली आणले असेल तो टप्पा आणि अशी शिक्षा कोणत्या तारखेपासुन किती कालावधी पर्यंत लागु राहणार आहे याबाबतचा आदेशात स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे. तसेच वेतनकपातीलच्या या शिक्षेचा भविष्यातील पुढील वेतनवाढीवर परिणाम होणार  किंवा नाही यापैकी जे अपेक्षित असेल ते आदेशात स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे. त्यानुसार संबधित कमर्चा-यांने वेतननिश्चीत करण्यात येईल.

15) नियुक्त्यांचे एकत्रिकरण /अतिरिक्त कार्यभार सोपविणे:- नियम क्र.56

         स्वत:च्या पदावरील कर्तव्य जबाबदा-या पार पाडीत असताना रिक्त पदाचा कार्यभार एखाद्या कर्मचा-यावर सोपविण्यात आला तर त्याला स्वत:च्या वेतनाशिवाय दुसऱ्या पदावरील कर्तव्य जबाबादारी पाडण्यासाठी पुढील प्रमाणे वेतननिश्चीती करण्यात यावे.

          ज्या पदाचा अतिरिक्त कार्यभार कर्मचा-याकडे सोपविण्यात आला असेल त्या पदावरील त्याची रितसर पदोन्नती किंवा नियुक्ती झाली असतील तर त्याला नियम क्रमांक 11(1)  किंवा 11 (2) अनुसार वेतन मिळाले पाहीजे.

सूचना :- वरील हे पीपीटी वरुन तयार करण्यात आले आहे.

Leave a Reply