प्रस्तावना:- 2008 मध्ये हकीम समिती स्थापन केली होती. शासन निर्णयदि.27/02/2009 नुसार राज्य वेतन सुधारणा समितीच्या शिफारशी स्विकृत करण्यात आल्या आहे. शासनअधिसूचना दि.22/04/2009 च्या अधिसूचना नुसार दिनांक 01/01/2006 पासून साहवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. शासन परिपत्रक दि.29/04/2009 नुसार वेतन नियम-2009 नुसार वेतन निश्चितीबददल सूचना देण्यात आल्या आहे.
साहवा वेतन आयोग (sixth compensation commission) Infrmation about Sixth Pay CommissionInformation about Sixth Pay Commission
जोडपत्र-I जोडपत्र-3 शासननिर्णय दिनांक-09/06/2009 शासननिर्णय दिनांक-31/08/2009
शासननिर्णय दिनांक-05/05/2010 शासननिर्णय दिनांक-25/10/2011 शासननिर्णय दिनांक-26/12/2011
शासननिर्णय दिनांक-11/07/2012 शासननिर्णय दिनांक-11/02/2013 शासननिर्णय दिनांक-03/09/2013
म.ना.से.( सुधारीत वेतन ) नियम 2009
अ.क्र. | विषय | म.ना.से.(वेतन)नियम 1981 अन्वये नियम | सुधारीत वेतन नियम 2009 अन्वये नियम |
1 | सुधारीत वेतन संरचनेत प्रारंभिक वेतन निश्चीती | — | नियम क्र.7 |
2 | शासकिय सेवेत प्रथम नियुक्ती | नियम क्र. 10, 40 | नियम.8(जोडपत्र 3) |
3 | वरिष्ठ पदावर पदोन्नती | नियम क्र. 11 (1) | नियम क्र. 13 (अ)(1)/13(अ)(2) |
4 | समान जबाबदारीच्या पदावर बदली / नियुक्ती | नियम क्र. 11(2)(अ/ब/ड) |
|
5 | निवड श्रेणी लागु होणे | नियम क्र. 11(4) |
|
6 | पदोन्नती, पदावनती व पुन्हा पदोन्नती अशा प्रसंगी वेतनाचे नियमन | नियम क्र. 14(4) परंतुक |
|
7 | विकल्प दिल्यावर करावयाची वेतननिश्चीती | शासन निर्णय दि. 6/11/1984 | 13(ब)(1) |
8 | पदावनती | नियम क्र.12 | 12 |
9 | पदाच्या वेतनमानात बदल | नियम क्र. 15 |
|
10 | शिक्षा म्हणुन पदावनती | नियम क्र. 16 |
|
11 | परिविक्षाधिन नियुक्तीतील वेतनवाढी | नियम क्र. 39 (1) अपवाद |
|
12 | शिक्षा म्हणुन वेतनवाढ रोखणे | नियम क्र. 36 |
|
13 | मुदतपुर्व/आगाउ वेतनवाढ | नियम क्र. 40 |
|
14 | शिक्षा म्हणुन वेतन कपात करणे | नियम क्र. 42 |
|
15 | नियुक्त्याचे एकत्रीकरण / अतिरिक्त कार्यभार सोपविणे | नियम क्र. 56 |
|
1) सुधारीत वेतन संरचनेत प्रारंभिक वेतन निश्चीती
दिनांक 1 जाने वारी 2006 पासुन सुधारीत वेतन संरचना लागु करण्यासाठी सर्व कर्मचा-याबांबतीतदिनांक 1 जानेवारी 2006 रोजी सुधारीत वेतन श्रेणीतील वेतननिश्चीती विद्यमान वेतनश्रेणीतील मुळ वेतनास 1.86 ने गुणून येणा-या रकमेच्या पुढील 10 च्या टप्प्यातील रकमेवर करण्यात येईल. ही रक्कम पुर्णाकिंत करताना 50 पैसे अथवा त्यावरील रक्कम पुढील 10 रुपयाच्या पटीत पुर्णाकिंत करण्यात यावी.
जर वरील प्रमाणे येणारे वेतन सुधारीत वेतनश्रेणीतील किंवा टप्प्याहुन कमी असेल तर सुधारीत वेतनश्रेणीतील किमान टप्प्यावर वेतननिश्चीत केले जाईल.वरील प्रमाणे वेतनबँन्डमधिल वेतननिश्चीत करुन या वेतनबरोबरच विद्यमान वेतनश्रेणीतील विहित केलेले समुचित ग्रेड वेतनही अनुज्ञेय राहील.विद्यमान वेतनश्रेणीतील वेतनाबरोबर विशेष भत्ता/ विशेष वेतन मिळणा-या कर्मचा-याबाबतहीवरील प्रमाणे वेतननिश्चीती करण्यात येईल.
2. शासकिय सेवेत प्रथम नियुक्ती (नियम क्र.8) ( जोडपत्र -3)
एखाद्या व्यक्तीची शासकिय सेवेत प्रथम नियुक्ती झाल्यास नियम क्रमांक 40 च्या प्राधिकारानुसार उच्च प्रारंभिक वेतननिश्चीत केलेले नसेल तर तिला महाराष्ट्र नागरी सेवा ( सुधारीत वेतन ) नियम 2009 मधील नियम क्र. 8 अनुसार या नियमातील जोडपत्र -3 मध्ये दर्शविल्यानुसार त्याचे नियुक्तीच्या वेतन बँड मधील प्रारभिक वेतन व अनुज्ञेय ग्रेड वेतन मंजूर करण्यात येईल.
दिनांक | वेतनश्रेणी | शेरा |
| 5200-20200 |
|
1/01/2007 | 7510+2400 | जोडपत्र 3 ( म.ना.से. सुधारीत वेतन नियम2009मधिलनि.क्र. 8 ) |
2. उदाहरण :- सुधारीत वेतनसंरचनेतील वेतनबँड रु. 4440-7440 मध्ये खालील कर्मचारी वेतनग्रेड अनुसार नव्याने नियुक्त करण्यात आली.
1. श्री अ यांची ग्रेड पे रु. 1300/-
2. श्री ब यांची ग्रेड पे रु. 1400/-
3. श्री क यांची ग्रेड पे रु. 1600/-
4. श्री ड यांची ग्रेड पे रु.1650/-
5. श्री इ यांची ग्रेड पे रु. 1700/-
तर वरील कमर्चा-यांचे प्रारंभिक वेतन निश्चीत करा.
कर्मचारी | वेतनबँड मधिल वेतन | ग्रेड पे | एकुण वेतन |
अ | 4440 | 1300 | 5740 |
ब | 4440 | 1400 | 5840 |
क | 4840 | 1600 | 6440 |
ड | 4920 | 1650 | 6570 |
इ | 4920 | 1700 | 6620 |
3. वरिष्ठ पदावर पदोन्नती :- वरिष्ठ पदावर पदोन्नती झाल्यास (कर्मचा-यांच्या नविन पदावरील नियुक्तीमुळे जुन्या पदाच्या कर्तव्यापेक्षा अधिक महत्वाची कर्तव्ये किंवा जबाबदा-या येत असतील तर)
महाराष्ट्र नागरी सेवा नियम ( सुधारीत वेतन ) 2009 मधील नियम क्र. 13 (अ)(1) नुसार तो धारण करीत असेल त्या पदाच्या वेतनबँड मधील वेतन अधिक ग्रेड वेतनाच्या 3% इतकी वेतनवाढीची रक्कम पुढील 10 च्या पटीत पूर्णांकित करण्यात यावी. ही रक्कम वेतन बँड मधील विद्यमान वेतनात मिळविण्यात यावी आणि त्या वेतनावर पदोन्नतीच्या पदास लागु असलेले ग्रेड वेतन मंजूर करण्यात यावे. अशा पदोन्नतीच्या प्रसंगी वेतन बँड बदलत असलेल्या प्रकरणीही वरीलप्रमाणेच वेतननिश्चीती करण्यात येईल. तसेच वरील प्रमाणे गणना करुनही वरिष्ठ पदाच्या वेतन बँडचे किमान वेतन अधिक असेल तर अशा प्रसंगी वरिष्ठ पदाचे किमान वेतनावर त्याची प्रारंभिक वेतननिश्चीती केली जाईल.
दिनांक | वेतनश्रेणी (6 व्या वेतन आयोगानुसार ) | ||
|
| 5200-20200 ग्रेड पे-2400 | 9300-34800 ग्रेड पे-4200 |
1/01/06 |
| 7510+2400 |
|
1/07/06 |
| 7810+2400 |
|
1/07/07 |
| 8120+2400 |
|
1/06/08 पदोन्नती |
| 8440+2400 | 9300+4200 |
महाराष्ट्र नागरी सेवा ( सुधारीत वेतन ) नियम 2009 मधील नियम क्र. 13 (अ ) (2) नुसार पीबी-4 वेतनबँड (37400-67000) मधून उच्च प्रशासकिय श्रेणीत पदोन्नती मिळाल्यावर वेतनबँड मधील वेतन व ग्रेड वेतनावर 3% दराने पुढील 10 च्या पटीत घ्यावी व ती विद्यमान वेतनात मिळवावी. मात्र अशी वेतनवाढ देउन त्याच समुचित विद्यमान ग्रेड वेतनाची रक्कम मिळवून येणारी रक्कम रु. 80000/- पेक्षा अधिक असता कामा नये.
उदाहरण :-
श्री अ हा शासकिय कर्मचारी वेतनश्रेणी रु. 5500-175-9000 मध्ये दिनांक 1/08/2005 पासुन रु.8475/- वेतन घेत होता. त्याची वरिष्ठ पदावर वेतनश्रेणी रु. 6500-200-10500मध्ये पदोन्नती झाली त्याने वरिष्ठ पदाचा कार्यभार दिनांक 1/11/2005 रोजी स्विकारला. म.ना.से. ( सुधारीत वेतन ) नियम 2009 अनुसार रु. 6500-200-10500 या वरिष्ठ वेतनश्रेणीला सुधारीत वेतनसंरचनेत वेतनबँड रु. 9300-34800 व ग्रेड पे 4400/-मध्येसमाविष्ठ करण्यात आलेले आहे. त्यांनी दिनांक 1/01/2006 पासुन सुधारीत वेतन संरचनेनुसार वेतन घेण्याचे मान्य केले आहे. तर श्री च्अछ यांचे दिनांक 1/11/2006 चे वेतन काय राहील.
दिनांक | पहिले पद | दुसरे पद | नियम क्रमांक |
| 5500-175-9000 | 6500-200-10500 |
|
1/08/5 | 8475 |
|
|
1/11/05 | 8475+175=8650 | 8700/- | 11 (1) |
|
| 9300-34800 ग्रेड पे 4400 |
|
1/01/06 |
| 16190+4400 | 11 |
1/07/06 |
| 16810+4400 | 39 व सुधारीत नि.क्र.10 |
1/11/06 |
| 16810 +4400 | 13 (1) सुधारीत नियम |
7) महाराष्ट्र नागरी सेवा ( सुधारीत वेतन ) नियम 2009 मधिल नियम क्र. 13 (²Ö) (1) अनुसार विकल्प दिलेल्या शासकिय कर्मचा-यांच्या बाबतीत पदोन्नतीच्या दिनांकास त्याच्या वेतनबँड मधिल वेतनात बदल होणार नाही. मात्र त्यास पदोन्नतीच्या पदाचे ग्रेड वेतन त्या दिनांकापासुन मंजुर करण्यात करण्यात येईल त्यांनतर पुढील वेतनवाढीच्या दिनांकास म्हणजेच दिनांक 1 जुलै रोजी त्याचे वेतन निश्चीत करावे यावेळी प्रथम त्याला वार्षिक वेतनवाढ आणि दुसरी पदोन्नतीची वेतनवाढ अशा दोन वेतनवाढी देण्यात याव्यात या वेतनवाढी परिगणित करताना पदेान्नती पुर्वीचे मुळ वेतन विचारात घेण्यात यावे.
उदाहरण :-
विकल्पाशिवाय | ||
दिनांक | वेतनश्रेणी | वरिष्ठ वेतनश्रेणी |
| 5200-20200 ग्रेड पे 2800 | 9300-34800 ग्रेड पे 4300 |
1/07/2006 | 11160 +2800 |
|
11/02/2007 ( पदोन्नती ) | 11580 | 11580 + 4300 |
1/02/2008 |
| 120 +4300 नियम क्र.39 |
विकल्पासह | ||
दिनांक | वेतनश्रेणी | वरिष्ठ वेतनश्रेणी |
| 5200-20200 ग्रेड पे 2800 | 9300-34800 ग्रेड पे 4300 |
1/07/2006 | 11160 +2800 |
|
11/02/2007 ( पदोन्नती ) |
| 11160 +4300 |
1/07/2007 | (11580+2000) 3%=12020 | 12020+4300 नि.क्र.39 |
1/07/2008 |
| 12510+4300( नि.क्र.39 ) व नि.क्र 10 सुधारीत ) |
( 2 जानेवारीते 30 जुन दरम्याने पदोन्नती झाल्यास विकल्पाचा फायदा होतो. )
8. पदावनती ( नियम क्र. 12 ):-
आस्थापनेतील पदांची संख्या कमी केल्याने किंवा वरच्या पदावरील स्थानापन्न बढतीचा संपल्याने खालच्या पदावर पदावन्नत होणा-या शासकिय कर्मचा-याच्या बाबतीत त्याची वरच्या पदावर नियुक्ती झाली नसती तर त्याला खालच्या पदाच्या समयश्रेणीतील ज्या टप्प्यावर नियम क्रमांक 39 अन्वये अनुज्ञेय वेतन मिळाले असते त्या टप्प्यावर त्याच्या खालच्या पदावरील वेतननिश्चीत करण्यात यावे.
तथापीमनासे.(सुधारीत वेतन नियम ) 2009 मधिल नियम क्र.12 मधिल तरतुदीनुसार पदोन्नतीच्या पदाचे ग्रेड वेतन संबधित कर्मचा-याला पदोन्नतीच्या दिनांकापासुन अनुज्ञेय ठरते म्हणुन अशा कर्मचा-याची पदावनती झाल्यास तसेच ही पदावनती नियम क्र. 12 मधिल तरतुदी नुसार असेल तर वेतनबॅड मधिल वेतनामध्ये आवश्यक नसेल तर बदल होणार नाही मात्र ग्रेड वेतन खालच्या पदाचे संबधित कर्मचा-याला मंजुर करता येईल म्हणजेच जर त्या कर्मचा-यांची पदोन्नती झाली नसती तर त्याला जे वेतन मिळाले असते ते वेतन सुरु होईल.
उदाहरण :-
श्रीअ कर्मचारी वेतनश्रेणी रु. 4000-100-6000/- मध्ये दिनांक 1/07/2000 पासुन रु. 5700/- इतके वेतन घेत होते. दिनांक 1/09/2000 पासुन त्यांची वरिष्ठ पद वेतनश्रेणी रु. 5500-175-9000/- मध्ये पदोन्नती झाली. दिनांक 1/10/2002 पासुन त्यांना त्याच्या जुन्या पदावर पदावनत करण्यात आले त्यांच्या जुन्या पदावरील वेतननिश्चीती करा.
उत्तर :-
दिनांक | वेतनश्रेणी | वरिष्ठ वेतनश्रेणी | दिनांक | वेतनश्रेणी |
| 4000-100-6000 | 5500-175-9000 |
| 4000-100-6000 |
1/07/2000 | 5700 |
| 1/07/2000 | 5700 |
1/09/2000 | 5700 +100 | 5850 नियम क्र. 11(1)(अ) | 1/07/2001 | 5800 |
1/09/2001 |
| 6025 नियम क्र.39 | 1/07/2002 | 5900 |
1/09/2002 |
| 6200 नियम क्र.39 | 1/07/2003 | 6000 |
5) पदोन्नती, पदावनती व पुन्हा व पदोन्नती अशाप्रसंगी वेतनाचे नियमन ( नियम क्र.11 (4) परंतुक )
पोट नियम 11 (1) व 11 (2) हे दोन्हीही लागु होणा-या प्रकरणामध्ये जर शासकिय कर्मचारी जर शासकिय कमर्चा-यांने पुर्वी तेच पद त्याच वेतनश्रेणीत किंवा समरुप श्रेणीतील अन्य पद धारण केले असेल तर नियम क्रमांक 14 मध्ये तरतुद केली असेल त खेरीज करुन इतर बाबतील विशेष वेतन किंवा वैयक्तिक वेतन अथवा नियम क्र. 9 (36) (3) प्रमाणे शासनाने घोषित केलेली इतर वित्तलब्धी वगळुन जे वेतन त्याला अशा लगतपुर्वी मिळाले असेल त्या वेतनापेक्षा त्याचे प्रारंभिक वेतन कमी असणार नाही . त्याला अशा प्रकारे लगतपुर्वी अथवा त्यापुर्वीच्या कोणत्याही प्रसंगी ते वेतन मिळाले असेल तो कालावधी समयश्रेणीतील जो टप्पा त्या वेतनवाढी एकढा असेल त्या टप्प्यावरील वेतनवाढीच्या प्रयोजनासाठी जेस धरण्यात येईल.
नविनवेतन संरचनेत चार ते पाच विद्यमान वेतनश्रेणीचे एकाच सुधारीत वेतनश्रेणीत रुपांतर करण्यात आल्यामुळे कर्मचा-याची पदोन्नती, पदावनती, पदावनतीमुळे वेतन बँडमध्ये ( पीबी-1,पीबी-2,पीबी-3) इ. मध्ये सहसा बदल होणार नाही. सतेच नविन वेतन बँडमध्ये वार्षिक वेतननिश्चीती रक्कम निश्चीत केलेली नसुन ती कर्मचारी घेत असलेल्या वेतन बँड मधिल वेतन अधिक अनुज्ञेय ग्रेड वेतनाच्या बेरजेवर तीन टक्के दराने वार्षिक वेतनवाढ अनुज्ञेय आहे.