पारपत्र सुविधेसाठी “ना-हरकत प्रमाणपत्र” | passport for government employees

प्रस्तावना:- भारतीय पारपत्र / Passport हे भारताच्या राष्ट्रपतींनी भारताच्या नागरिकांच्या परदेश गमनासाठी दिलेला परवाना आहे. पासपोर्टधारक भारतीय पासपोर्ट ॲक्ट (१९६७) नुसार, आंतरराष्ट्रीय स्तरावर भ्रमण करणास सक्षम असतो. मात्र हा परवाना बाळगणाऱ्याला परकीय देशात प्रवेश मिळण्यासाठी त्या देशाने दिलेला ‘व्हिसा’ असणे आवश्यक असते. नेपाळ, भूतान आणि बाली या काही देशांत प्रवेश करण्यासाठी व्हिसा लागत नाही.

देशाच्या बाहेर जायचे असल्यास तुमच्या जवळ पासपोर्ट असणे गरजेचे असते. त्याचबरोबर व्हिसा असणेही आवश्यक असते. पासपोर्ट असताना व्हिसाची गरज का भासते? असा प्रश्न अनेकांना पडतो. काही असे देश आहेत की तिथे जाण्यासाठी अगोदर व्हिसा काढावा लागतो. पासपोर्ट हे सरकारी दस्तावेज आहे. पासपोर्टमध्ये संबधित व्यक्तीचे नाव, फोटो, नागरिकत्व, पत्ता, पालकांचे नाव, लिंग, व्यवसाय आणि इतर माहिती दिली जाते. त्यासाठी पासपोर्ट तयार करण्यासाठी मोठा कालावधी लागतो.

प्रत्येक प्रक्रिया लक्षपूर्वक पार पाडली जाते. यासाठीच परदेशात महत्वाचे ओळखपत्र म्हणून पासपोर्ट स्वीकारले जाते. व्हिसा म्हणजे एखाद्या व्यक्तीस बाहेरच्या देशात राहण्यासाठी दिलेली परवानगी असते. जर तुम्हाला अमेरिकेला जायचे असेल तर अमेरिकेचा व्हिसा घेऊनच आपण त्या देशात जाऊ शकतो. 

शासन निर्णय दिनांक 30/09/1985 नुसार राज्य /केंद्र शासनाच्य कर्मचाऱ्यांस किंवा सांविधिक संस्था अथवा सार्वजनिक उपक्रम यांच्या कर्मचाऱ्यांस त्यांच्या विभागाकडून “ना-हरकत प्रमाणपत्र” मिळवून ते मूळ प्रतीत सादर करावे लागते.

1) संबंधित कर्मचाऱ्याविरुध्द विभागीय चौकशी प्रलंबित आहे किंवा विभागीय चौकशी करण्याचे ठरले आहे. किंवा कसे.

2) संबंधित कर्मचाऱ्यांविरुध्द दक्षता प्रकरण प्रलंबित आहे किंवा तसे प्रकरण विचाराधीन आहे किंवा कसे.

3) सुरक्षिततेच्या बाबतीत शासनाच्या अभिलेखात अर्जदाराविरुध्द आक्षेपार्ह असा विश्वसनीय पुरावा आहे किंवा कसे.

शासनास ना हरकत प्रमाणपत्रासाठी खालीलप्रमाणे कागदपत्र लागतात.

1. आधार कार्डाची छायाप्रत.(Aadhar website)

2.. Annexure “G”(passport website)

3. मतदान/कार्यालयाच्या ओळखपत्राची छायाप्रत.

4. साक्षांकित फोटो (दोन)

6. ना विभागीय चौकशी प्रमाणपत्र.

7. पॅन कार्डची प्रत.(pancard website)

भारतामध्ये तीन प्रकारची पारपत्रे प्रचलित आहेत.[२]

Table of Contents

१) पर्सनल पासपोर्ट:-

 यालाच Ordinary Passport असे देखील म्हणतात. हा दिसायला गडद निळा कव्हर चा असतो. सामान्य नागरिकाला सामान्य प्रवास करण्यासाठी म्हणून दिले जाते, जसे की सुट्टीतील, अभ्यास आणि व्यवसाय ट्रिप. हा “P” पासपोर्ट आहे. P म्हणजे पर्सनल.

२) डिप्लोमॅटिक पासपोर्ट:- 

हा दिसायला मायऑन कव्हर चा असतो. भारतीय राजनैतिक, जारीक सदस्य, केंद्रीय कौन्सिल ऑफ मंत्री, काही उच्च दर्जाचे सरकारी अधिकारी आणि राजनयिक कौशल्यांचे सदस्य यांना हे पासपोर्ट देण्यात येते. तसेच विनंती केल्यावर अधिकृत व्यवसायावर प्रवास करणार्याला, उच्च-रँकिंग स्टेट-लेव्हल अधिकार्यांनाही हे दिले जाऊ शकते. हा “D” पासपोर्ट आहे. D म्हणजे डिप्लोमॅटिक.

३) ऑफिशियल पासपोर्ट:-

हा पांढऱ्या रंगाचे पासपोर्ट असतो. अधिकृत व्यवसायावर भारत सरकारचे प्रतिनिधित्व करणार्‍या व्यक्तींना दिले जाते. हा “S” पासपोर्ट आहे. S म्हणजे सर्विस.१९९५ मध्ये, २६ युरोपियन देशांनी एकमेकांशी विना सीमा नियंत्रणाशिवाय जाणे येण्यास करार केला होता. परंतु विमान प्रवाशांना कधी कधी ओळखण्यासाठी पासपोर्ट देखील विचारू शकतात.

व्हिसा देखील अनेक प्रकारचे आहेत.

) टूरिस्ट व्हिसा इतर देशामध्ये प्रवासासाठी जायचे असल्यास टूरिस्ट व्हिसा जारी केला जातो. पर्यटकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रवासी व्हिसा देणारे अनेक देश आहेत.  

) ट्रान्झिट व्हिसा हा एक अल्पकालीन व्हिसा आहे.

) बिझनेस व्हिसा हा व्हिसा व्यावसायिक हेतूंसाठी जारी केला जातो.

) वर्कर व्हिसा – हा व्हिसा कायम कामगारांना देण्यात येतो. जेणेकरुन ते कायदेशीररित्या कार्य करू शकतील.

) फियांसी व्हिसा –  हा व्हिसा त्याला देण्यात येतो, ज्याचा विवाह दुसऱ्या देशातील व्यक्तीशी ठरला आहे आणि त्याला या देशात जायचे आहे. जर एखाद्या व्यक्तीला भारतातील महिलेशी विवाह करायचा असेल तर त्याला हा व्हिसा देण्यात येतो.

पारपत्राचा उपयोग हा जसा बाहेर देशात जाण्यासाठी होतो. तसाच त्याचा उपयोग हा आपल्या देशात ओळखपत्र म्हणून तसेच Address Proof म्हणून सुध्दा केला जातो. पारपत्र हे एक संदेशील Document आहे. ते पूर्ण चौकशी केल्याशिवाय मिळत नाही. पण आता पारपत्र काढणे सोपे झाले आहे. सर्व काही online झाले आहे.

केंद्र शासनाने पारपत्रासाठी खूप ठिकाणी आता सुविधा दिल्या आहेत. पारपत्राचे आधुनिकरण करण्यात आले आहे. त्यामुळे पारपत्र काढण्यासाठी होणारा त्रास कमी झाला आहे. जुन्या काळात रांगेत उभे राऊन ही प्रक्रिया करावी लागत होती. ती आता नाही.

Leave a Reply