अतिरिक्त कार्यभार | विशेष वेतन | Special Pay

प्रस्तावना :- महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, 1981 मधील नियम 56 नुसार जेव्हा एखाद्या शासकीय कर्मचाऱ्यांकडे त्याच्या स्वत:च्या पदाव्यतीरिक्त दुसऱ्या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपतिण्यात येतो, तेव्हा  अशा दुसऱ्या पदाकरीता त्यास अतिरिक्त वेतन/ विशेष वेतन मंजूर करण्यात येते.स्वतःचा कार्यभार सांभाळून अतिरिक्त पदाचा कार्यभार धारण केलेला आहे.  त्याबाबत विशेष वेतन मंजूर करण्यात येत आहे.आपल्या पदाव्यतिरिक्त अतिरिक्त पदाचा कार्यभार सांभाळला आहे.

अ)धारण केलेले पद मुख्य पदास दुय्यम नाही.                                    

ब) कामामध्ये व जबाबदारीत वाढ झाली आहे.

क)  अतिरिक्त कार्यभाराचे पदास स्वतंत्र अधिकारीता आहे.

  • शासन निर्णय दि. 27/11/2011 अनुसार दोन किंवा अधिक पदांवरील नियुक्तीच्या कालावधीत अतिरिक्त वेतन/विशेष वेतनाच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे. (याममधील फक्त अटी पाहव्यात. हया नुसार विशेश वेतन दिले जात नाही.)

  • शासन निर्णय दि. 28/08/2013 अनुसार दोन किंवा अधिक पदांवरील नियुक्तीच्या कालावधीत अतिरिक्त वेतन/विशेष वेतनाच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे.

  • शासन निर्णय दि. 21/10/2013 अनुसार दोन किंवा अधिक पदांवरील नियुक्तीच्या कालावधीत अतिरिक्त वेतन/विशेष वेतनाच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे.(भाप्रसेसाठी)

  • शासन निर्णय दि. 01/06/2015 अनुसार दोन किंवा अधिक पदांवरील नियुक्तीच्या कालावधीत अतिरिक्त वेतन/विशेष वेतनाच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे. संबंधित अधिकारी/कर्मचारी आहरीत करीत असलेल्या वेतनाच्या (त्यांचे पे बँड मधील वेतन+ ग्रेड वेतन) 5% एवढ्या दराने अनुज्ञेय राहील. (हया शासन निर्णयानुसार कार्यवाही करावी)

  • शासन निर्णय दि. 05/09/2018 अनुसार अतिरिक्त कार्यभार सोपवितांना विचारात घ्यावयाच्या मागदर्शक सूचना सूचना देण्यात आाल्या आहे.

 

Leave a Reply