शेअर बाजार|can govt employees invest in the share market?

अ) शेअर बाजार/Share Market म्हणजे काय ?

शेअर बाजारच्या मदतीने सामान्य मनुष्य सुद्धा मोठ-मोठ्या कंपन्यांमध्ये हिस्सेदारी मिळवू शकतो. परंतु शेअर बाजार एक अशी जागा जिथे बरेच लोग पैसे कमवतात तर बरेच लोक आपले पैसे गमावून पण टाकतात. शेअर मार्केटमध्ये आर्थिक जोखीम असते, म्हणून नवीन लोकांना long term ट्रेडिंग करण्याची सल्ला दिली जाते. जे लोक जोखीम घ्यायला तयार असतील त्यांनीच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला हवी. असे म्हटले जाते. नाही तर शेअर मार्केट/Share Market पासून दूर राहावे. सेबी सारख्या शासकीय प्राधिकरणाद्वारे शेअर बाजारावर लक्ष ठेवले जाते. आता पहिल्या पेक्षा पारदर्शकता जास्त आली आहे.

शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी किंवा त्यात उतरण्यापूर्वी सर्व शंकांचे निरसन योग्य प्रकारे होणे आवश्यक आहे.शेअर खरीदी करण्या अगोदर तुम्ही शेअर्स मार्केट विषयी माहिती करून घ्या व त्याचा चांगला अभ्यास करा.ज्या कंपनीचे शेअर आपण घेऊ इच्छित,त्या कंपनीचा चांगला अभ्यास करावा. तिचा मागील वर्षीच रेकॉर्ड बघवा . किती नफा किती तोटा झाला आहे ते बघाव. कंपनीचे येणाऱ्या व त्या पुढचे वर्षाचे ध्येय काय आहेत.तसेच ते ती पूर्ण करण्यासाठी काय करत आहेत.ह्याला कंपनी चे फंडामेंटल अनॅलिसिस असा म्हणतात. हे अनॅलिसिस करून झाल्यावर जर आपण यात आपली रिस्क ओळखून गुंतवणूक करू शकत असाल.तरच त्या कंपनीचे शेअर तुम्ही खरेदी करावेत.या सोबतच झी बिझनेस,सीएनबीसी,एनडीटीव्ही बिझनेस या सारखे न्यूज चॅनेल देखील पाहू शकता त्याचशी निघडीत घडामोडींची संपूर्ण शेअर मार्केट/Share Market बद्दल बेसिक माहिती मिळेल.

ब) Share Market /शेअर मार्केट मध्ये शासकीय कर्मचारी पैसा गुंतवणूक करु शकतो का?

होय. पण काही अटी लागू आहेत. महाराष्ट्र नागरी सेवा(वर्तणूक) नियम-1979 च्या नियम 17 नुसार

1) कोणताही शासकीय कर्मचारी कोणत्याही रोख्यामध्ये,शेअरमध्ये किंवा इतर गुंतवणुकीमध्ये पैस गुंतविणार नाही. याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे कि, शेअर्स,कर्जरोखे किंवा इतर गुंतवणुकी यांची वारवांर खरेदी करणे किंवा विक्री करणे किंवा दोन्ही बाबी करणे हे, या पोटनियमाच्या अर्थानुसार सटटा मान्यात येईल.

2) कोणताही शासकीय कर्मचारी, त्याच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला किंवा त्याच्या वतीन कोणत्याही व्यक्तीला,ज्या गुंतवणूकीमुळे त्याचे कार्यालयीन काम पार पाडण्याबाबत अडचण येऊ शकेल किंवा दबाव येऊ शकेल अशी कोणतीही गुंतवणूक करु देणार नाही किंवा करण्यास परवानगी देणार नाही.

*सेंट्रल सिविल सर्विसेज या सीसीएस (कंडक्ट) नियम-1964 :- सेंट्रल सिविल सर्विसेज या सीसीएस (कंडक्ट) नियम-1964 मध्ये केंद्र सरकार सुधारणा केली आहे. शेयर आणि म्यूचुअल फंडशी संबंधीत 26  वर्ष जुना नियम बदला आहे. कार्मिक मंत्रालय च्या आदेशानुसारआत सरकारी कर्मचाऱ्यांना सहा महिन्याचे मुळ वेतना(बेसिक सॅलरी) नुसार म्यूचुअल फंड और शेयर  खरीदता येते. आगोदर या नियमा मध्ये गट अ  आणि ब या अधिकाऱ्यांसाठी शेअर,प्रतिभूती,डिबेचर किंवा म्यूचुअल फंड योजनामध्ये  एक वर्षामध्ये0 50,000 रुपये पेखा अधिक लेनदेन करता येत नव्हते. 50000 हजारच्या वर लेनदेन केले तर कार्यालयास अवगत करावे लागते किंवा त्याचा खुलासा दयावा लागत होता. तसेच गट क व ड ही सीमा 25000/- रुपये होती. यामध्ये आता बदल करण्यात आला आहे. कोणताही शासकीय कर्मचारी डिमॅट खाते काढू शकतो आणि शेअर बाजारात गुंतवणूक करु शकतो.(Delivery Based Investment)

क) शासकीय कर्मचारी डिमॅट खाते काढू शकतो का?

 होय काढू शकतो. शासकीय कर्मचाऱ्यास शेअर घेता येत म्हणजे डिमॅट खाते काढता येते. जो पर्यंत डिमॅट खाते उघडत नाही. तो पर्यंत शेअर घेता येणार नाही. डिमॅट खात्याचा उपयोग शेअर्सची खरेदी विक्री करण्यासाठी केला जातो. ज्याप्रमाणे बँक खात्यात पैसे ठवले जातात. अगदी त्याच प्रमाणे डिमॅट खात्यामध्ये शेअर्स ठेवले जातात. डिमॅटमध्ये भौतिक स्वरुपातील शेअर्स  ठवले जातात. डिमॅट खात्याच्या साहाय्याने कोणत्याही स्टॉकचे शेअर्स खरेदी विक्री करता येते तसेच हे खाते बॅक खात्याप्रमाणे कार्य करते. ऑनलाईन खाते उघडण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता आवश्यक्ता असते जसे की, पॅन कार्ड,बॅक खाते, आधार कार्ड,वैयक्तीक चेक किंवा बॅक स्टेटमेंट, कागदावर स्वत:ची सही.  

1) डिमॅट खात्यामुळे शेअर्सची चोरी होण्याची शक्यता नाही,कारण शेअर्स इलेक्ट्रॉनिक स्वरुपात तसेच ऑनलाईन असल्यामुळे पूर्णपणे सुरक्षीत आहे. पूर्वीप्रमाणे शेअर्सची प्रमाणपत्रे नसतात.

2. खरेदी केलेले शेअर्स विकण्यासाठी पूर्वीची प्रक्रिया वेळ खाऊ व मोठी होती.  आता सर्व काही ऑनलाईन झाल्याने  काही मिनिटात शेअर्स खरेदी-विक्री करु शकता.

डीमॅट खाते ऑनलॉईन काढण्याची लींक देण्यात येत आहे.

 1. Zerodha Demat Account

 2. Upstox Demat Account

 3. Groww Demat Account

ऑनलाईन खाते काढण्याआगोदर सर्व माहिती घेण्यात यावी. आजकाल शुन्य रुपयात खाते निघते.

ड) स्वत:च्या डिमॅट खात्यावर ट्रेडींग करता येत नाही

तुम्ही Intraday Trading करु शकत नाही. वारवारं गुतंवणूक करुन शकत नाही. म्हणजेच आज घेतला शेअर आजच विकणे. तसेचIntraday ला business म्हटल आहे. शासकीय कर्मचारी व्यवसाय करुन शकत नाही. Intraday Trading ला नियमित मार्केट पाहवे लागते. शासकीय कर्मचारी यांचे आदय कर्तव्य् शासकीय कर्तव्य आहे. आपल्या कर्तव्याच्या वेळी पर्सनल कार्य उचीत नाही. Delivery करु शकता. Delivery मध्ये शेअर किती दिवस, महिणे, वर्षासाठी ठेवू शकता. तसेच फयुचर आणि ऑपशन ट्रेडींग सुध्दा करुन शकत नाही.

ड) गुंतवणूक करतांना काळजी घेतली पाहिजे:- 1) Social Media वरुन पैसे गुंतवणूक करु नये. पैसे गुंतवणूक करण्यासाठी आधी संपूर्ण माहिती घेण्यात यावी.

2) गुंतवणूक दीर्घ कालावधीसाठी करण्यात यावी. कमी कालावधीसाठी गुंतवणूक करु नाही. नुकसान होण्याची शक्यता असते.

3) “Don`t put all eggs in a basket” हया म्हणीनुसार गुंतवणूक वेगवेगळया कंपनीतील शअर्स मध्ये करावी. साधारत: 10 ते 15 कंपण्यामध्ये करण्यात यावी.

4) शेअर मार्केट रोज बघु नये. कारण मार्केट मध्ये रोज चढउतार होत असतो.

5) शेअर मार्केट मध्ये जे पैसे शिल्लक आहे,तेच गुंतवावे. एकाच वेळीच सर्व पैसे गुंतवणूक करु नये.

6) कर्ज काढून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करु नये.

7) शेअर मार्केट खाली आले तर पॅनीक होऊ नये. संयम ठेवावा. आपल्या सदसदबुध्दीचा उपयोग करावा.

 

Leave a Reply