प्रवास भत्ता व दैनिक भत्याचे शासन निर्णय|travelling and daily allowance

भाग -दोन

प्रस्तावना :-शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना शासकीय कामासाठी दौरे करावे लागतात. या दौऱ्यांसाठी शासन निर्णय दि.03.03.2010 नुसार प्रवास भत्ता व दैनिक भत्ता अटी व शर्तीनुसार लागू करण्यात आलेला आहे. तसेच शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यास प्रशिक्षणासाठी सुध्दा हा खर्च दिला जातो. शासनाने ठरवून दिलेल्या अधिकारी वर्गास विमान प्रवासाचे भाडे सुध्दा देण्यात येते. रेल्वे व बस सेवेचे तिकीट वर्गवारी नुसार देण्यात येते. हा प्रवास भत्ता व दैनिक भत्ता साहव्या वेतनातील ग्रेड पे नुसार देय ठरविण्यात आला आहे. सातव्या वेतन आयोगानुसार अदयापपर्यंत सुधारणा करण्यात आली नाही. भविष्यात यामध्ये सुधारणा होऊ शकते.कर्मचारी प्रत्यक्ष धारण करत असलेल्या पदाचे ग्रेड वेतन विचारात घ्यावे.आप्रयोअंतर्गत मंजूर केलेले ग्रेड वेतन विचारात घेण्यात येऊ नये.मात्र ज्या पदांच्या बाबतीत विशिष्ट कालावधीच्या सेवेनंतर अकार्यात्मक उच्च वेतन संरचनेतील ग्रेड वेतन विचारात घ्यावे.

Table of Contents

1.किलोमीटर भत्ता (मुंबई नागरी सेवा नियम मधील नियम नियम 414 (1) व (2) )

स्वत:च्या मालकीचे वाहन किंवा भाडयाच्या वाहनातून केलेल्या प्रवासासाठी अनुज्ञेय असलेल्या किलोमीटर भत्याचे दर खालीलप्रमाणे आहेत.

अ.क्र.श्रेणीशासकीय कर्मचारी धारण करीत असलेल्या पदाचे ग्रेड वेतनमोटर कार / जीपमोटर-सायकल/स्कुटर/ ॲटरिक्षा.मोपेड / लुनाअन्य वाहने
पेट्रोलडिझेल
1प्रथम श्रेणीरु. 6600/- व त्याहुन अधीक **9.007.003.501.75
2व्दितीय श्रेणीअ) रु. 4400/- व त्याहुन अधीक मात्र रु. 6600/- पेक्षा कमी**9.007.003.501.751.00
ब) रु. 4200/- व त्याहुन अधीक मात्र रु. 4400/- पेक्षा कमी3.501.751.00
3तृतीय श्रेणीरु. 4200/- पेक्षा कमी1.751.00

1.ज्या ग्रेड वेतनाच्या समोर किलोमीटर भत्याचे दर दर्शविण्यात आले आहेत. त्या ग्रेड वेतन मर्यादेतील अधिकारी त्या प्रकारचे वाहन बाळगण्यास पात्र आहे.

**2. ग्रेड वेतनगटातील अधिकारी टॅक्सीने प्रवास केल्यास स्तंभ 3 मधील दराने किलोमीटर भत्ता मिळण्यास पात्र आहे.

2.वाहनभत्ता (मुंबई नागरी सेवा नियम मधील नियम 388 )

शासन निर्णय दि. 23/09/2013 नुसार शासकीय कर्मचाऱ्याने,त्याची दैनंदिन कर्तव्ये पार पाडताना, त्याच्या कार्यक्षेत्रात केलेल्या प्रवासासाठी मंजूर करण्यात येणाऱ्या वाहन भत्यात सुधारणा करण्यात आली आहे.

अ.क्र.मासिक सरासरी किलोमिटरमोटर कारमोटरसायकल / स्कुटर / ॲटरिक्षा.मोपेड / लुनाअन्य वाहने
पेट्रोलडिझल
रुपयेरुपयेरुपयेरुपयेरुपये
1201 – 3001250/-855/-420/-375/-250/-
2301 – 4501750/-1195/-630/-570/-375/-
3451 – 6002625/-1790/-880/-790/-525/-
4601 – 8003500/-2390/-1170/-1050/-700/-
5801 पेक्षा अधीक4500/-3070/-1670/-1350/-1000/-

3.सायकल भत्ता (मुंबई नागरी सेवा नियम मधील नियम 389 )

सायकल भत्याचा दर रु. 60 प्रतिमाह करण्यात येत आहे.

4.प्रवास भत्ता देयके सादर करतांना आवश्यक तपासणी सूची

अ.क्र.प्रवास भत्ता देयकेनियम व शासन निर्णय /परिपत्रक 
1देयके म.को.नि. नमुना 18 मध्ये तयार  केलेले आहे. देयक बिल पोर्टलमध्ये तयार करण्यात आलेले आहे.म.को.नि. 249

 

2प्रवास भत्ता देयकात कर्मचाऱ्यांचे नांव, पदनाम, वेतन,महिना,तारीख,वेळ व प्रवासाचे कारण याचा तपशिल नमुद केला आहे.म.को.नि. 152(3)

 

3दौऱ्यांवरील प्रवासाचा कालावधी व सवलतीचा कालावधीत दौऱ्याच्या ठिकाणी विहित केलेल्या दराने दैनिक भत्ता  परिगणना केली आहे.शा.निर्णय दि.03/03/2010
4एकाच दौऱ्यावर अनेक ठिकाणी भेटी दिल्या असून प्रवासाच्या कालावधीसाठी पुढील मुक्कामाचे ठिकाण लक्षात घेऊन दैनिक भत्याची परिगणना केली आहे.मात्र परतीच्या प्रवासासाठी ज्या मुक्कामापासून प्रवासाला केला तेथील अनुज्ञेय दराने दैनिक भत्ता परिगणीत केला आहे.शा.निर्णय दि.03/03/2010
5अनुसूचित दर आकारणाऱ्या हॉटेलमध्ये वास्तव करुन अनुज्ञेय असलेले दैनिक भत्याचे दर सुधारीत केल्यानुसार मागणी परिगणित केली आहे. शा. निर्णय दि. 02/05/2013
6ज्या शहरासाठी अ वर्ग किंवा ब वर्गाच्या शहरास अनुज्ञेय असलेल्या दैनिक भत्याच्या दराने मागणी केली आहे ते शहर अ वर्ग व ब वर्ग शहरांच्या यादीतील आहेशा. निर्णय दि. 03/03/2010
7देशातील इतर राज्याच्या राजधान्यांसाठी दैनिक भत्ता मुंबईसाठी विहित केलेल्या दराने परिगणीत केला आहे.
8खास दैनिक भत्ता अनुज्ञेय होण्यासाठी लॉजिंग किंवा बोर्डींग अथवा लॉजिंग व बोर्डींग दोन्ही समाविष्ट असलेली अनुसूची दर आकारणाऱ्या हॉटेलची पावती जोडली आहे. व पावतीची रक्कमही सर्वसाधारणपणे अनुज्ञेय दैनिक भत्यापेक्षा अधिक आहे.
9मुखालय शहराच्या हददीत 8 कि.मी पहिकडे केलेल्या प्रवासाठी अनुज्ञेय दराच्या 50% दराने दैनिक भत्याची मागणी केलेली आहे.शासन निर्णय दि.10.01.2007
10राजधाणी एक्सप्रेसने /भोजनाची/नाश्त्याची व्यवस्था असलेल्या रेल्वे गाडीने प्रवास केला असून प्रवास कालावधीत अनुज्ञेय दराच्या 50 % दैनिक भत्ता प्रमाणे मागणी सादर केली आहे.शासन निर्णय दि.04.12.1999
11भाडयाने घेतलेल्या /खाजगी/शासकीय वाहनाने प्रवास लेलेला असून सवलतीच्या तासाची मागणी केलेली नाही.शासन निर्णय दि. 11.08.1977
12देयकातील संबंधीत रकान्यात प्रवासाचा हेतू नमूद केला आहे.मुं.ना.से. नि. 599
13कोर्टात हजर राहिल्याबददल प्रवासभत्ता देयक सादर केलेले आहे. त्या अनुषंगाने कोर्टात हजर असल्याचे प्रमाणपत्र देयकासोबत जोडले आहे.मुं.ना.से. नि. 536
14कर्मचाऱ्याचे मुख्यालय व प्रशिक्षण वर्ग एकाच महानगरपालिका/नगरपालिकाच्या हददीत असल्याने मुक्काम भत्याऐवजी हातखर्ची भत्याची मागणी केलेली आहे. श.नि.दि. 15.06.1978
15अधिकारी/कर्मचारी यांनी केलेला प्रवास पहिल्या वर्गाने वातानुकुलीत/शयनयान/AC चेअर कारने केला असून देयकात तिकीट क्रमांक नमुद केलेला आहे.शासननिर्णय दि. 06.10.2002
16रेल्वेमध्ये (कोणत्याही) भोजनाची व नाश्त्याची विनामुल्य सोय असल्यामुळे प्रवास कालावधीचा 50 % दैनिक भत्ता प्रवासभत्ता देयकातून कमी करण्यात आला आहे.शा. निर्णय दि.03.03.2010 परि. 4.2तक्ता  ब टीप-2
17सेवानिवृत्त कर्मचारी न्यायालयात विभागीय चौकशीच्या कामी साक्ष देण्यासाठी उपस्थित राहिले असल्याने अशा प्रकरणी सेवानिवृत्त होण्यापूर्वी सदर व्यक्ती घेत असलेल्या संवर्गातील शासकीय कर्मचाऱ्यास दौऱ्यासाठी मिळणाऱ्या दराने प्रवासभत्ता आणि दैनिक भत्ता देयकात मागणी केली आहे. आणि ती बरोबर आहे.अधिसूचना दि. 21.05.2005
18मालकीच्या अथवा भाडयाच्या वाहनाने प्रवास केलेला असुन प्रवासाठी किलोमीटर भत्याचे दर बरोबर आहेत.शा. निर्णय दि.03.03.2010 परि. 5
19मागील तीन महिन्याच्या आत सादर केली नसल्याने विलंबांची कारणे देयकात नमुद आहेत.म.को.नि 151(4)
20मागणी एक वर्षापेक्षा जुनी असल्याने सक्षम अधिकाऱ्यांचे मंजूरी आदेश देयक सोबत जोडले आहेत.म.को.नि 151, वित्तीय नियम 39(ब)
21प्रवास भत्ता अग्रीम हा संपूर्ण प्रवास खर्च आणि दैनिक भत्याच्या 80 % च्या मर्यादेत आहे.म.को.नि 142
22प्रवासाचे तिकीट रदद करतांना आकारण्यात येणाऱ्या शुल्काची(Cancellation Charge)प्रतिपूर्तीशा. निर्णय दि.10.06.2004
23विभागीय चौकशी प्रकरणी सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यास प्रवासभत्ताशा. निर्णय दि. 31.10.1998
24शासकीय कर्मचाऱ्यांनी ज्या वेळी रेल्वेच्या प्रथम वर्गाने वा कोणत्याही वातानुकूल वर्गाने प्रवास केला असेल, त्यावेळी प्रवासभता देयकात तिकिट क्रमांक,दिनांक इ. तपशील नमूद करणे आवश्यक राहील.शा.निर्णय दि.06/10/2002
25कर्मचाऱ्यांने राज्याबाहेर प्रवास केला असेल तर खातेप्रमुखांची मंजूरी आदेश आवश्यक असेल. 

 

26जेथे प्रवासाची दोन्ही ठिकाणे रेल्वेने जोडलेली आहे. व टॅक्सीची सेवा उपलब्ध आहे. व त्याचे दर प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी मंजूर केलेले आहे.अशा ठिकाणी टॅक्सीची पावती जोडलेली आहे.ही सवलत ज्यांना पहिल्या वर्गाने प्रवास करणे अनुज्ञेय आहे त्यांचे साठीच आहे.397(अ)
27

विभागीय परीक्षांना उपस्थित राहण्याकरीता प्रवास भत्ता /मुक्काम भत्ता देय करण्यात आला आहे.

शा.निर्णय दि.09/05/1989
28

शासकीय वाहनाने केलेल्या दौऱ्याच्या प्रकरणी सवलतीचा कालावधी अनुदेय नाही

शा. निर्णय दि. 08/06/2001

2 thoughts on “प्रवास भत्ता व दैनिक भत्याचे शासन निर्णय|travelling and daily allowance”

Leave a Reply