शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या प्रतिनियुक्तीने नियुक्तीसाठी अटी व शर्ती

प्रस्तावना:- राज्य शासनाच्या विविध विभागात / विभागाच्या अधिपत्याखालील मंडळे/ महामंडळातील पदांवर विविध विभागांकडून प्रतिनियुक्तीने नेमणूका केल्या जातात. शासकीय कर्मचाऱ्यांची , सेवाप्रवेश नियमातील तरतूदीनुसार तसेच प्रशासकीय विभागाने त्यांच्या अधिपत्याखालील  मंडळे/महामंडळे,शासकीय कार्यालये (नगरपालीका/ महानगरपालीका), अन्य राज्य शासनाच्या वा केंद्र शासकीय कार्यालयातील/अधिपत्याखालील महामंडळे/ कंपन्या इत्यादीमधील पदे थेट नियुक्तीने न भरता राज्य शासन सेवेतील  त्याच अथवा समकक्ष पदावरुन प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात येते. तसेच आपआपल्या विभागाने काढले शासन निर्णय तसेच परिपत्रक पाहावे.

शासन निर्णय दि.17/12/2016 नुसार शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या प्रतिनियुक्तीने नियुक्तीसाठी अटी व शर्ती आणि नियुक्तीची कार्यपध्दती याबाबतच्या धोरण ठरविण्यात आले आहे.

दि.17.12.2016 च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने प्रतिनियुकती धोरणानुसार प्रशासकीय विभागांनी करावयाच्या कार्यवाही संदर्भातील सूचना पुस्तिका

शासन निर्णय दि.31/08/2016 नुसार मंत्रालयीन संवर्गातील अधिकारी / कर्मचारी यांच्या प्रतिनियुक्तीबाबत.

शासन निर्णय दि.16/02/2018 नुसार दि.17/12/2016 च्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्यात आल्या आहे.(शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या प्रतिनियुक्तीने नियुक्तीसाठी अटी व शर्ती आणि नियुक्तीची कार्यपध्दती याबाबतच्या धोरणामध्ये सुधारणा )

शासन निर्णय दि.28/07/2021 नुसार शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या प्रतिनियुक्तीने नियुक्तीसाठी अटी व शर्ती आणि नियुक्तीची कार्यपध्दती याबाबतच्या धोरणामध्ये सुधारणा करण्यात आल्या आहे. दि. 17/12/2016 च्या शासन निर्णयातील परि.५ (क) मध्ये पुढील मुद्दा क्र.(5) नव्याने अतंर्भूत करण्यात आला आहे.

Leave a Reply