शासकीय/निमशासकीय कार्यालयात विद्यमान मा. राष्ट्रपती श्रीम. द्रौपदी मुर्मू यांचे छायाचित्र /“ हॅलो” ऐवजी “वंदे मातरम” या अभिवादनाने करण्याबाबत.

प्रस्तावना:- शासकीय/निमशासकीय कार्यालयात विद्यमान मा. राष्ट्रपती श्रीम. द्रौपदी मुर्मू यांचे छायाचित्र प्रदर्शित करण्याबाबत व “स्वातंत्रयाचा अमृत महोत्सव” च्या औचित्यानुसार शासकीय कार्यालयांतील दूरध्वनी/ भ्रमणध्वनीवर अभ्यागतांशी किंवा सहकारी अधिकारी/ कर्मचारी यांच्याशी करावयाच्या संभाषणाची सुरुवात “ हॅलो” ऐवजी “वंदे मातरम” या अभिवादनाने करण्याबाबत शासन  निर्णय/परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.

Table of Contents

अ)शासकीय/निमशासकीय कार्यालयात विद्यमान मा. राष्ट्रपती श्रीम. द्रौपदी मुर्मू यांचे छायाचित्र प्रदर्शित करण्याबाबत..

1.विद्यमान मा. राष्ट्रपती तसेच मा. पांतप्रधान यांचे छायाचित्र शासकीय/निमशासकीय कार्यालयात लावण्याच्या संकेतानुसार मा. राष्ट्रपती श्रीम. द्रौपदी मुर्मू यांचे शासनाने विहीत केलेल्या 16” X 22” आकाराचे रांगीत छायाचित्र मा. मुख्यमांत्री, मा. मंत्री, मा. राज्यमंत्री यांची दालने तसेच सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयामध्ये लावण्यात यावे. असे सामान्य प्रशासन विभागाचा दिनांक 30/09/2022 च्या शासन निर्णयानुसार सूचित केले आहे.

  1. मा. राष्ट्रपती श्रीम. द्रौपदी मुर्मू यांचे छायाचित्र मध्यवर्ती शासकीय मुद्रणालय मुबई /नागपूर/पुणे /औरांगाबाद / कोल्हापूर यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात आले आहे. संबंधित विभाग/कार्यालये यांनी संबंधित शासकीय मुद्रणालयाकडे संपर्क साधावा. शासकीय मुद्रणालयांनी मागणीनुसार छायाचित्राचा पुरवठा करावा.
  2. सर्व मंत्रालयीन विभागांना सुचित करण्यात येते की, त्यांनी त्यांच्या नियंत्रणाखालील विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख यांना त्यांच्या आवश्यक्तेनुसार छायाचित्राची प्रत संबंधीत शासकीय मुद्रणलयातून प्राप्त करणेबाबत व छायाचित्राची चौकट (फ्रेम) करून कार्यालयांमधून प्रदर्शित करण्याबाबत सूचना द्याव्यात. छायाचित्र व चौकट (फ्रेम) प्र‍ित्यर्थचा खर्च संबंधीत शासकीय विभाग/कार्यालयांना मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून भागवण्यात यावा.

ब)“स्वातंत्रयाचा अमृत महोत्सव” च्या औचित्यानुसार शासकीय कार्यालयांतील दूरध्वनी/ भ्रमणध्वनीवर अभ्यागतांशी किंवा सहकारी अधिकारी/कर्मचारी यांच्याशी करावयाच्या संभाषणाची सुरुवात “ हॅलो” ऐवजी “वंदे मातरम” या अभिवादनाने करण्याबाबत.

 “स्वातंत्रयाचा अमृत महोत्सव” हे औचित्य साधून सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयांत दूरध्वनी/भ्रमणध्वनीवरील संवादाची सुरुवात “ हॅलो” ऐवजी “वंदे मातरम” या अभिवादनाने करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 01/10/2022 रोजी शासन परिपत्रक निर्गमित केले आहे. “वंदे मातरम” या अभिवादनाने दूरध्वनीवरील संवादाची सुरुवात करणे बंधनकारक नसले तरी या आवाहनास प्रतिसाद देऊन “वंदे मातरम” या अभिवादनाने दूरध्वनीवरील संवादाची सुरुवात स्वयंप्रेरणेने करण्याबाबत सर्व विभागांनी व कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या अधिपत्याखालील सर्व अधिकारी/कर्मचारी यांना प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले आहे.

सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना खालील प्रमाणे आहे.

  1. सर्व शासकीय /निमशासकीय कार्यालये,शासन सहाय्यित/अनुदानित/अर्थसहाय्यित व इतर स्वरुपाचे साहाय्य असणारी कार्यालये,स्थानिक स्वराज्य संस्था,शाळा/महाविद्यालये व शैक्षणिक संस्था तसेच शासन अंगीकृत सर्व प्रकल्प / उपक्रम/आस्थापना येथील कार्यालयांत दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनीवर अभ्यागत किंवा सहकारी यांनी संवाद साधल्यास “ हॅलो” ऐवजी “वंदे मातरम” या अभिवादनाने सुरुवात करण्यात यावी. तसेच त्यांनी त्यांच्या वैयक्तिक भ्रमणध्वनीवर संवाद साधतानाही “वंदे मातरम” असे अभिवादन करण्यास सर्व संबंधितांना प्रोत्साहित करण्यात यावे.
  2. कार्यालयांत/संस्थांमध्ये येणाऱ्या अभ्यागतांनाही सार्वजनिक जीवनात “वंदे मातरम” ने अभिवादन करण्याबाबत जाणीव जागृती करावी.
  3. ज्या ठिकाणी स्वयंचलित दूरध्वनी यंत्रणा अस्तिवात आहे. त्या ठिकाणीही हा बदल करण्यात यावा.
  4. विविध बैठकांमध्ये वक्त्यांनी सुरुवात करताना ती “वंदे मातरम” या शब्दांनी करावी. यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे.
  5. व्यापक बैठकांमध्ये वक्त्यांनी सुरुवात करताना ती “वंदे मातरम” अभिवादनाचा अधिकाधिक वापर करावा. उदा. राज्य परिवहन महामंडळाच्या स्थानकांवरील उध्दोषणांची सुरुवात,अंगणवाडी,आरोग्यसेविका यांच्याकडून विविध समाजघटकांशी होणाऱ्या दैनंदिन संवादाची सुरुवात इ.

अभियानाची प्रचार आणि प्रसिध्दी

  1. “वंदे मातरम” अभिवादन अभियानासाठी वृतपत्रे,वाहिन्या,समाज माध्यमे इत्यादींमधून महासंचालक,माहिती व जनसंपर्क संचालनालय यांनी माहिती प्रसृत करावी तसेच “वंदे मातरम” अभिवादन वापराबाबत जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी दृक-श्राव्य माध्यमातून प्रचार-प्रसार करावा.
  2. “वंदे मातरम” या अभिवादनात्मक शब्दांनी सर्वांनी संभाषण, सभेस सुरुवात करण्यासाठी जाणीव जागृती व प्रचार प्रसिध्द करण्यासाठी स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी यांनीही विशेष अभियान राबवावे.
  3. लघुचित्रपटांच्या माध्यमातून “वंदे मातरम” अभिवादनाबाबत जाणीव जागृती करावी.
  4. “वंदे मातरम” हा फक्त नारा किंवा अभिवादन नसून यामागील राष्ट्रभक्तीचा जाज्वल्य इतिहास नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करावा.

*सर्व शासकीय कार्यालये / निमशासकीय कार्यालये, शायकीय अनुदानित व विनाअनुदानित कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, विद्यापीठे,शाळा, महाविद्यालये,शैक्षणिक संस्था तसेच शासन अंगीकृत उपक्रम व आस्थापना यांना “वंदे मातरम”   अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन शासन परिपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

Leave a Reply