Table of Contents
वैद्यकीय प्रतिपूर्ती प्रस्तावना:-
वैद्यकीय प्रतिपूर्ती हा संविधानाने दिलेला हक्क आहे. असे म्हणणे वावगे ठरणार नाही. कोंवीड मुळे याची जाणीव जास्त झाली आहे. कोवीडमुळे वैद्यकीय क्षेत्राकडे शासनाकडून जास्त लक्ष देण्यात आले आहे. कर्मचारी जर सुदृढ असेल तर तो चांगल्या प्रकारे काम करेल. व शासनाच्या योजना योग्य पध्दतीने कार्यन्वयीत होईल. कधी कधी अचानक जीवनात असा काही प्रसंग येतो की आपल्याला शारिरीक व्याधी लागते. अचानक घडणाऱ्या घटनाला आपण काही करुन शकत नाही. त्यामुळे याचे नियोजन करता येत नाही. उदा:- उचानक रक्तदाब /अचानक होणारा अपघात. कार्यालयाने सुध्दा वैद्यकीय प्रतिपूर्ती मंजूर करतांना मानवी दृष्टीकोन ठेवण्यात यावा. संबंधीत कर्मचारी यांचे देयक शासनाच्या नियमानुसार (जेथे नियम शिथील करता येईल तेथे करावे) करावे. काही वेळेस अचानक परिस्थीती उद्वभवते तेव्हा कार्यालयाला कळविणे तेवढे सोपे नसते. रुग्ण/बीमार व्यक्ती कसे कळवणार, तेव्हा त्याची परिस्थीती नसते. कधी कधी घरातील व्यक्तींना काही माहित नसते. हे सुध्दा कार्यालयाने समजून घ्यावे. क्षुल्लक कारणासाठी वैद्यकीय देयक परत करु नये. सबंधीत कर्मचाऱ्याला बोलवून किरकोऴ त्रुटी दुरस्त्या करता येत असेल तर त्या करुन घ्यावा.
नियोजन:- वैद्यकीय प्रतिपूर्तीचे जेथे नियोजन करता येते तेथे केले पाहिजे. उदा:- एखादया कर्मचाऱ्याला कीडणीची समस्या असेल व डॉक्टरांनी शस्त्रक्रीया सांगतली तर कर्मचाऱ्याने त्यांचे नियोजन करावे. कार्यालयातील लिपीकाकडून सर्व माहिती घ्यावी. त्या पध्दतीने सर्व कागद पत्र तयार करावे.त्यामुळे संबंधीत कर्मचाऱ्यास कोणताही नाहक त्रास होणार नाही.ज्या काळात कर्मचारी रुग्णालयात अंतररुग्ण म्हणुन असतेा त्याच काळाचे देयक मिळते. उदा- दि.01.01.2021 ते 10.01.2021 रोजीचे जे काही देयक असेल तेवढेच मिळेल. दि.31.12.2020 रोजीचे व आगोदचे तसेच 11.01.2021 रोजीचे व त्यानंतरचे कोणतेही देयक मिळणार नाही. हे लक्षात ठेवण्यात यावे. शासन निर्णयानुसार ज्या रोगाला बाहयरुग्ण म्हणुन मान्यता देण्यात आली आहे ते देयक कर्मचाऱ्याला मिळू शकते.
महाराष्ट्र राज्य सेवा(वैद्यकीय देखभाल) नियम-1961 :-
शासकीय कर्मचारी व त्यांच्यावर अवलंबून असलेले कुटूंबाला वैद्यकीय खर्च प्रतिपूती मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य सेवा(वैद्यकीय देखभाल) नियम-1961 दिनांक-09/05/1961 अन्वये तयार करण्यात आलेलेा आहे व या नियमामध्ये शासनाकडून वारवांर सुधारणा करण्यात आलेल्या आहे.
1) व्याख्या :- 1) रुग्ण म्हणजे शासकीय कर्मचारी किंवा कुटूंबातील कोणताही व्यक्ती.
2) शासकीय कर्मचारी :- रोजंदारीवरील कर्मचारी वगळता पूर्ण वेळ तत्वावर नेमलेली कोणतेही व्यक्ती, मग ती सेवेत कायम असो वा तात्पुरती असो आणि त्यामध्ये-
अ) रजेवर अथवा निलंबित असलेला शासकीय कर्मचारी.
ड) एक वर्षापेक्षा कमी नसलेली सेवा झालेले व मासिक दराने वेतन घेणारे कार्यव्ययी आस्थापनेवर(Wrok Charge ) नेमलेले कर्मचारी यांचा समावेश होतो.
2) कुटूंब:- अ) शासकीय कर्मचाऱ्यांची पती किंवा पत्नी.
ब) शासकीय कर्मचा-यांवर अवलंबून असलेलेऔरस मुले/ सावत्र मुले /कायदेशीर दत्तक घेतलेली मुले
क) शासकीय कर्मचाऱ्यांवर पूर्णपणे अवलंबून असलेले आई-वडील (शासन निर्णय दि.02/08/2019 नुसार मुळ निवृत्तीवेतन 9000/- त्यावरील महागाई भत्ता)
ड) महिला कर्मचारी यांना तिच्या आई-वडील किंवा सासु-सासऱ्यांची कोणाचीही एकाची निवड करता येईल.
इ) शासकीय कर्मचाऱ्यांवर पूर्णपणे अवलांबून असलेला 18 वर्षाखालील भाऊ व अविवाहीत बहीण तसेच घटस्फोटीत बहीण(वयाची अट लागू नाही)
ई)शासन निर्णय दि 20/11/2000 नुसार शासकीय कर्मचाऱ्याला वैद्यकीय लाभासाठी दोन हयात आपत्याचा समावेश करण्यात आलेला आहे. दोन पेक्षा जास्त आपत्य झाल्यास प्रतिपूर्तीचा लाभ देय होणार नाही.कर्मचाऱ्याला एक आपत्य असेल व त्यांनतर जुळे(दोन) आपत्य झाले तरी त्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती मिळेल.
ए) शासन अधिसूचना दि. 28/3/2005 अन्वये शासकीय सेवेत लागतांना लहान कुटुंब प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
3) प्राधिकृत वैद्यकीय देखभाल अधिकारी :- शासन निर्णय दि.20/08/1999 नुसार ठरविण्यात आलेले वैद्यकीय अधिकारी. कर्मचारी महाराष्ट्रात कुठेही बिमार झाला असेल. अथवा कुठल्याही दवाखान्यात दाखल झाला असेल तरी त्या कर्मचाऱ्याला ज्या ठिकाणी कर्मचारी कार्यरत आहे. तेथील प्राधिकृत वैद्यकीय देखभाल अधिकारी यांच्या कडून रोग Verify करुन घेण्यात येते.
4) शासकीय/मान्यताप्राप्त रुगणालय :- शासनाच्या नियंत्रणाखाली असणारे कोणतेही शासकीय रुग्णालय किंवा वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेले रुग्णालय(जिल्हा परिषद,नगरपरीषद, महानगरपालीका,पोलीस रुग्णालय) येथील प्रतिपूर्ती मिळते. शासन निर्णयदि.19/03/2005 व शा.स दि. 17/12/2020(कोवीडचा सहभाग) नुसार 28 आकस्मिक आजार खालीलप्रमाणे-
1) हदयविकाराचा झटका(Cardiac emergency) प्रमास्तिक सहंनी(cerabrel vascular) फुप्फुसाच्या विकाराचा झटका
(Pulmonary emergency ) ॲन्जिओग्रॉफी चाचणी
2) अति रक्तदाब (Hypertension)
3) धुनुर्वात (Titanus)
4) घटसर्प (Diphtheria)
5) अपघात (Accident)आघात संलक्षण (Shock Syndrome) हदयाशी आणि रक्तवाहिनीशी संबंधीत (Cardiological and Vascular)
6) गर्भपात (Abortion)
7) तीव्र उदर वेदना/आंत्र अवरोध (Acute abdominal pains/Intestinal obstruction)
8) जोरदार रक्तस्त्राव (Severe – Hemorrhage)
9गस्ट्रो-एन्ट्रायटिस (Gastro-Entrietis)
10) विषमज्वर (Typhoid)
11) निश्चतेनावस्था (Coma)
12) मनोविकृतीची सुरवात (Onset of psychiatric disorder)
13डोळयातील दृष्टीपटल सरकणे (Retinal detachment in the eye)
14) स्त्रीरोगशास्त्र आणि प्रसुतीशास्त्र संबंधित यांच्याशी आकस्मिक आजार (Gynaecological and obstetric emergency)
15) जननमुत्र आकस्मिक आजार (Genito-urinary emergency)
16) वायू कोष (Gas Gangrine)
17) कान,नाक किंवा घसा यामध्ये विजातीय पदार्थ गेल्यामुळे निर्माण झालेले आकस्मिक आजार (foreign body in ear, nose, throat emergency)
18) ज्यामध्ये तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते अशा जन्मजात असंगती (Cogenital Anamolies requiring urgent surgical intervention)
19) ब्रेन टयुमर (Brain Tumour)
20) भाजणे (Burns)
21) इपिलेप्सी (Epilepsy)
22) ॲक्यूट ग्लॅकोना (Acute Glaucoma)
23) स्पायपनस स्कॉड(मज्जारज्जू) संबंधात आकस्मिक आजार
24) उष्माघात
25) रक्तासंबंधातील आजार
26) प्राणी चावल्यामुळे होणारी विषबाधा
27) रसायनामुळे होणारी विषबाधा
28) कोवीड-19 [covid-19] वैद्यकीय खर्च प्रतिपूतीसाठी रुग्णाचे कोविड-19 बाधीत असल्योन वैद्यकीय अहवालात नमूद असले पाहीजे. तसेच, रुग्णाच्या रक्तातील SPO2 (प्राणवायू पातळी) ही 95 टक्के पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
शासन निर्णय दि.19/03/2005 नुसार 5 गंभीर व शासन निर्णय दि. 27/03/2020 नुसार 6 अवयव प्रत्यारोपन व काही नवीन आजाराचा समावेश गंभीर आजारात करण्यात आला आहे. एकूण सध्या 11 गंभीर आजार आहे.11 गंभीर आजार खालीलप्रमाणे-
1) हदय शस्त्रक्रियांची प्रकरणे(Heart Surgery)
2) हदय उपमार्ग शस्त्रक्रिया (Bye Pass Surgery)
3) ॲन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया
4) मुत्रपिंड प्रतिपोषण शस्त्रक्रिया
5) कर्करोग (Cancer)
6) यकृत प्रतिरोपण( Liver Transplant)
7) हदय प्रतिरोपण( Heart Transplant)
8) फुप्फुस प्रतिरोपण( Lung Transplant)
9) अस्थिमज्जा प्रतिरोपण( Bone Marrow Transplant)
10) कर्णावर्त प्रतिरोपण(Cochlear Transplant)
11) हदय व फप्फुस प्रतिरोपण (एकत्र)( Heart & Lung Transplant (Together))
आकस्मीक(शासकीय / शासन मान्यता) व गंभीर यांची शासन मान्यता प्राप्त खाजगी रुग्णालयात उपचार घेतले तऱ प्रतिपूती मिळते.शासननिर्णय दि. 11/10 /2013 नुसार काही शासन मान्यता रुग्नालयाची यादी देण्यात आली आहे.
5) प्रतिपूर्तीसाठी मागणी सादर करणे: –
अ) शासकीय कर्मचारी यांनी वैद्यकीय खर्चाच्या अनुज्ञेय असणाऱ्या प्रतिपूर्तीच्या सर्व मागण्या उपचार पूर्ण झाल्यापासून एक वर्षाच्या आत वैद्यकीय खर्च प्रतिपूती देयकाची मागणी कार्यालयाकडे करणे आवश्यक आहे.
ब) शासकीय कर्मचाऱ्याचे वेतन व भत्ते ज्या लेखाशिर्षाखाली खर्ची घालण्यात येते त्याच लेखाशिर्षाखाली वैद्यकीय खर्च प्रतिपूती देयके खर्ची घालण्यात यावे.
क) कर्मचाऱ्याचा मृत्यु झाल्यास वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीची देय व अनुज्ञेय रक्कम त्यांच्या कायदेशीर वारसास देण्यात येईल.
6) वैद्यकीय देयकाचे प्रकार, अधिकार प्रधान व नमुने खालीलप्रमाणे आहेत.
अ.क्र. | रुग्णालयाचा प्रकार | शासकीय रुग्णालय | |||||
1 | शासकीय रुग्णालय | बाहय रुग्ण /अंतर रुग्ण उपचाराचे देयक | |||||
2 | शासन मान्यता खाजगी /खाजगी रुग्णालय | अ)शासकिय खाजगी रुग्णालय (पाच + सहा = अकरा गंभीर आजार) ब) खाजगी रुग्णालय (27 गांभीर आजार) | |||||
3 | वैद्यकीय अग्रीम
| शासकिय खाजगी रुग्णालय (पाच + सहा = अकरा गंभीर आजार) | |||||
4 | विशिष्ट आजाराचे वैद्यकीय खर्च प्रतिपूती | मधूमेह, डायलेसिस | |||||
वैद्यकीय प्रतीपुर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीच्या अधिकारांत सुधारणा करण्याचा शासन निर्णय दि. 06/06/2019 | |||||||
अ.क्र. | सक्षम प्राधिकारी |
| |||||
1 | मंत्रालयीन प्रशासकीय विभाग प्रमुख
| रुपये-3,00,000/-(अक्षरी रुपये तीन लक्ष) वरील प्रकरणे. | |||||
2 | विभाग प्रमुख
| रुपये -2,00,000/-(अक्षरी रुपये दोन लक्ष) वरील परंतु रुपये-3,00,000/-(अक्षरी रुपये तीन लक्ष) पर्यंतची प्रकरणे. | |||||
3 | प्रादेशिक विभाग प्रमुख
| रुपये-2,00,000/-(अक्षरी रुपये दोन लक्ष) पर्यंतची प्रकरणे. | |||||
वैद्यकीय देयके तयार करण्यासाठी खालील नमुने वापरण्यात यावे. | |||||||
अ.क्र. | रुग्णालय व उपचार प्रकार | नमुना | |||||
1 | शासकीय रुग्णालय बाहय रुग्ण उपचार | परिशिष्ट 1,तपासणी सुची, नमुना अ संबंधीत का.पत्रे | |||||
2 | शासकीय रुग्णालय अंतररुग्ण उपचार | परिशिष्ट 1,तपासणी सुची, नमुना ब संबंधीत का.पत्रे | |||||
4 | खाजगी रुग्णालय | परिशिष्ट 1,तपासणी सुची, नमुना क व ड संबंधीत .पत्रे | |||||
वैद्यकीय अग्रिम | कर्मचाऱ्यांचा अर्ज, कुटुंब प्रमाणपत्र, रुग्णालयाच्या खर्चाचे अदांजपत्रक व शस्त्रक्रियेची तारीखचे प्रमाणपत्र. | ||||||
7) वैद्यकीय प्रतिपूतीसाठी कागदपत्रे व प्रकीया:- i)तपासणी सूची(शासन निर्णय दि.06/09/2014 व जलसंपदा विभाग शासन निर्णय दि. 06/09/2017 नुसार कागदपत्र जोडण्यात यावी.) ii) परिशिष्ट-1 iii) नमुना-अ(बाहयरुग्ण), नमुना- ब(अंतररुग्ण),नमुना-क व नमुना-ड iv) वैद्यकीय खर्चाची परिगणना v) कुटूंब मर्यादा प्रमाणपत्र vi)वास्तव प्रमाणपत्र vii)अवंलबिता प्रमाणपत्र vii) पंतप्रधान, मुख्यमंत्री तसेच अन्य संस्थेकडुन आर्थीक सहाय्य न मिळणे बाबत. viii) मेडीक्लेम विमा नसल्या बाबतचे प्रमाणपत्र ix) नर्सींग चार्च बाबतचे प्रमाणपत्र x)नमुना सूची xi) डॉक्टरांच्या सही चे प्रमाणपत्र xi) Medicine of List
ज्या ठिकाणी कर्मचारी कार्यरत आहे तेथील जिल्हा शल्यचिकित्सक / अधिष्ठताकडून कार्यालयाने आजार प्रमाणित करुन घेण्यात यावे. मगच नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी. त्यानंतर कार्यालयाने वैद्यकीय देखभाल नियम व शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्यात यावी.(टीप -आपआपल्या कार्यालयाप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी)
*शासकीय कर्मचारी शासनाच्या कामानिमित्त जर दुसऱ्या राज्यात गेला व तेथे बिमार पडता तर त्याला त्याची प्रतिपूर्ती मिळेल अन्यथा नाही. तसेच शासन निर्णयानुसार मान्यता दिलेले रुग्णालयालची प्रतिपूर्ती देय ठरते.
* काही खाजगी रुग्णालयांमध्ये वास्तवाचे प्रकार दर्शविण्यासाठी वेगवेगळया शब्दाचा वापर केला जातो.(ए,ए1,बी, स्पेशल, डिलक्स इ.) या शब्दाचा वापर केला जात असतो. शासन निर्णय दि 2005 मध्ये दर्शविण्यात आलेल्या वास्तवाशी जुळून घेऊन तेथील डॉक्टरांकडून सही घेऊन शा नि 2005 नुसार प्रमाणपत्र घेण्यात यावे.
बील पोर्टलवर जाऊन वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक तयार करावे. 24 A वर Click दाबावे पुढील माहिती मिळेलUser Manual दिले आहे. वैद्यकीय प्रतिपूर्ती चे पुस्तक
औषधोपचारावरील खर्चाची प्रतिपूर्ती व वास्तवाचा खर्च प्रतिपूर्ती
अ.क्र. | खर्चाचा तपशील | शासकीय रुग्णालय | शासनमान्य खाजगी रुग्णालय | खाजगी रुग्णालय |
1 | रुग्णालयातील खर्च | 100% | 100% | 90% |
2 | वास्तवाचा खर्च | 100% | खालील प्रमाणे | |
3 | बाहेरुण खरेदी केलेली और्षधे | 100% | 100% | 90% |
4 | एम आर आय, सीटी स्कॅन,रकत तपासणी, क्ष-किरण, इ.) | 100% | 100% | 90% |
वैद्यकिय खर्चाची परिगणना | |||||||||||||||||||||||||||||||||||
(संदर्भ – सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय, मुंबई शासन निर्णय क्र. एमएजी- 2005/9/प्र.क्र.1/ आरोग्य 3, दिनांक 19.03.2005 प्रमाणे) | |||||||||||||||||||||||||||||||||||
कर्मचा-याचे नांव | – | श्री कांतराव जगनराव वानखडे(काल्पनीक नाव) | |||||||||||||||||||||||||||||||||
रुग्णाचे नांव | – | श्री कांतराव जगनराव वानखडे(काल्पनीक नाव) | |||||||||||||||||||||||||||||||||
रुग्णाशी असलेले नाते | – | स्वत: | |||||||||||||||||||||||||||||||||
रुग्णालयातील वास्तव्याचा काळ | – | दि .01.01.2021 पासुन 10.01.2021 पर्यंत | |||||||||||||||||||||||||||||||||
रुग्णालयाचे नांव | – | पुणे हॉस्पीटल पुणे(काल्पनीक) | |||||||||||||||||||||||||||||||||
आजाराचे नांव/ क्रमांक | – | रक्तासंबंधातील आजार /क्रमांक – 25 |
अ.क्र. | तपशिल | एकुण खर्च | |||||||||||||||||||||||||||||||
1 | 2 | 3 | |||||||||||||||||||||||||||||||
1 | एकुण खर्च |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 140500 | |||||||||
2 | नादेय खर्च |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 3500 | |||||||||
3 | प्रत्यक्ष खर्च (1-2) |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 137000 | |||||||||||
4 | प्रत्यक्ष खर्चापैकी वास्तव्याचा खर्च (Bed Charges) |
|
|
|
|
|
|
|
|
|
| 10000 | |||||||||||||||||||||
5 | प्रत्यक्ष खर्चापैकी औषधोपचाराचा खर्च (3-4) |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 127000 | |||||||||||||||||||
6 | औषधोपचारासाठी अनुज्ञेय खर्चाचे प्रमाण |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| |||||||||||||||||
| (शासनमान्य रुग्णालयातील औषधोपचाराच्या खर्चाची 100% प्रतिपुर्ती) |
|
| ||||||||||||||||||||||||||||||
| (औषधोपचारावरील प्रत्यक्ष खर्चापैकी प्रतिपुर्तीचे प्रमाण 90%) |
|
| ||||||||||||||||||||||||||||||
| 127000 | x | 90% | = | 114300 | रु. | 114300 |
| 114300 | ||||||||||||||||||||||||
7 | रुग्णालयात वास्तव्याचे दिवस | 1800/- | प्रती दिवस या दराने | 10 दिवस | |||||||||||||||||||||||||||||
8 | वास्तव्यासाठी केलेला खर्च |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 10000 | |||||||||||||||||||
| 9 |
| रुग्णालयातील वास्तव्यासाठी अनुज्ञेय खर्चाचे प्रमाण- |
| |||||||||||||||||||||||||||||
|
| अ.क्र. | वास्तव्याचा प्रकार | प्रत्यक्षखर्च | अनुज्ञेय रक्कम | देय रक्कम |
|
| |||||||||||||||||||||||||
|
| 1 | जनरल वार्ड (सर्वसामान्य कक्ष). | 10000 | 95% | 9500 |
| ||||||||||||||||||||||||||
|
| 2 | जनरल वार्डच्या (सर्वसामान्य कक्षाच्या) बाजुचा बाथरुम नसलेला कक्ष. | 0 | 90% | 0 |
| ||||||||||||||||||||||||||
|
|
|
| ||||||||||||||||||||||||||||||
|
|
|
| ||||||||||||||||||||||||||||||
|
| 3 | बाथरुमसह स्वतंत्र कक्ष | 0 | 75% | 0 |
| ||||||||||||||||||||||||||
|
| 4 | बाथरुमसह डबलबेड कक्ष | 0 | 75% | 0 |
|
| |||||||||||||||||||||||||
|
| 5 | बाथरुमसह वातानुकुलीत कक्ष (विमान प्रवास सवलत अनुज्ञेय असलेल्या कर्मचा-यासाठी). | 0 | 75% | 0 |
|
| |||||||||||||||||||||||||
|
|
|
| ||||||||||||||||||||||||||||||
|
|
|
| ||||||||||||||||||||||||||||||
|
| 6 | अतिदक्षता कक्ष. | 0 | 100% | 0 |
|
|
| ||||||||||||||||||||||||
|
|
| वास्तव्यापोटी एकुण देय रक्कम – | 9500 |
|
|
| ||||||||||||||||||||||||||
10 | एकुण देय खर्च (6 + 9) | + | 114300 | ||||||||||||||||||||||||||||||
9500 | |||||||||||||||||||||||||||||||||
123800 | |||||||||||||||||||||||||||||||||
एकूण रुपये:- 123800/- अक्षरी रुपये( एक लक्ष तेवीस हजार आठशे)
8) वैद्यकीय अग्रीम : –शासन निर्णय दि.19/03/2005 नुसार 5 गंभीर आजार तसेच शासन निर्णय दि.10.02.2006 नुसार 1 लक्ष 50 हजार अग्रीम देय आहे व शासन निर्णय दि. 27/03/2020 नुसार 6 गंभीर(अवयव प्रत्यारोपन व काही नवीन आजाराचा समावेश केला आहे. अग्रीमाची रकक्म शासन निर्णयानुसार देय) आजार एकूण 11 गभीर आजारा करीता सध्या वैद्यकीय अग्रीम देय ठरते. गंभीर आजासाठी खर्चाची 100% प्रतिपूर्ती अनुज्ञेय आहे. यासाठीशासन मान्यता खाजगी रुग्णालय आंतररुग्ण म्हणुन उपचार केले असावे. शासन निर्णय दि. 2013 नुसार शासन मान्य खाजगी रुग्णालयाची यादी देण्यात आली आहे.दोन्ही शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार अग्रीम मंजूर करण्यात येते.
अ. अग्रीमासोबत रुग्णालयाचे शस्त्रक्रियेचा दिनांक व शस्त्रक्रियेकरीता सांभाव्य खर्च दर्शविणारे पत्र जोडणे आवश्यक आहे. तसेच अग्रीमाचा धनादेश ज्या रुग्णालयात रुग्ण आहे. त्या रुग्णालयाच्या नावाने धनादेश देणे आवश्यक आहे.
ब. शस्त्रक्रियेचा दिनांकाच्या 15 दिवसाआधी देण्यात येते.
क. ज्या कारणासाठी अग्रीम मंजूर करण्यासाठी आले आहे, त्याच कारणासाठी त्याचा उपयोग झाला आहे हे पाहण्याची जबाबदी कार्यालयाची आहे. काही अटी व शर्ती शासन निर्णयात पाहण्यात यावे.
10) मधुमेह, डायलेसिस व प्रसूती आजारावरील खर्च प्रतिपूर्ती :-
अ)मधुमेह: – शासन निर्णय17/08/1999 नुसार कर्मचारी यांनी मधुमेह प्राथमिक अवस्थेत असतांनाच वैद्यकीय अधिकारी यांच्या कडून प्रमाणपत्र घ्यावे.औषधापचोरासाठी त्या प्रमाणपत्राचा उपयोग करावा. तसेच दरवर्षी नविन प्रमाणपत्र घेण्याची आवश्यक्ता नाही.
ब)डायलेसीस :-शासननिर्णय दि 13/07/2006 नुसार शासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटूंबातील सदस्याचे मूत्रपिंड निकामी झाल्यावर,मूत्रपिंउ प्रतिरोपण शस्त्रक्रियेपूर्वी व अयशस्वी शस्त्रक्रियेनंतर डायलिसीस करवून घेतल्यास त्यावरील वैद्यकीयी प्रतिपूती अनुज्ञेय ठरविण्यात आली आहे.
क) प्रसुती वरील खर्चाची प्रतीपूर्ती :- शासन निर्णय दि.21/08/1999 नुसार स्त्री कर्मचारी अथवा कर्मचारी यांची पत्नी यांना प्रसुतीपूर्वी शासकीय/जिल्हा परीषद/नगरपालीका/ महानगरपालीका येथील रुग्णालयात गर्भधारणेनंतर पहिल्या 2 ते 3 महिन्यांत नांव नोंदविणे आवश्यक आहे. नांव नोंदविले नसल्यास प्रसूतीच्यावेळी आकस्मिक परिस्थिती निर्माण झाल्यास, खाजगी रुग्णालयातील प्रतिपूर्ती देय राहणार नाही. एकूण 28 आकस्मिक आजारामध्ये स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र हा रोग दर्शविण्यात आला आहे.शासन निर्णय दि.25/09/2014 नुसार कोणत्याही आजाराच्या बाबतीत वैद्यकीय खर्चाची कमाल मर्यादा सदर शासन निर्णय नि. २१ ऑगस्ट१९९९ अधिक्रमीत करण्यात आला आहे.
11) संकीर्ण माहिती :-अ) शासन निर्णय दि.28/9/2016 अन्वये शासकीय कर्मचाऱ्यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी कर्कंरोग या गांभीर आजारावर शासकीय व शासन मान्य खाजगी रुग्णालय वगळून इतर खाजगी रुग्णालयात घेतलेल्या उपचाराच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतीपूर्तीला मंजूरी देण्यात आली आहे. शासनाकडून खर्चाचे दर ठरविण्यात आलेले आहे.
आ)जलसंपदा विभागाचे शासन पत्र दि.28/06/2021 अनुसार खालील ना देय बाबी देयकातून वगळण्यात याव्यात
Admission/Registration Fee, Miscellaneous Charges, Dietary Charges, B.P Blade, Easy Bath, Tena Bed Single, Under Pad, All Type Gloves, Body Wipes, ViscoDVT Stocking, Oral Care Kit, Mucos Extracter, Shaving Brush, Tooth Brush, Tooth Paste, Bacterial, Filter, Face Mask, Hand Switching Pencil, Skin Stapler, Eco Bath Wipe, Tissue Roll, Cologne Liquid(Eau De), Diaper, Plain Sheet, HME Filter, Mouth Wash, Surgical Blade, Nasal Oxygen Set, Olive Oil, K-Stall Powder, Bisleri/Mineral Water, Mackintosh, Counter T.S. Strips, Camera over, Maquet Filter, Body/Surface Disinfectants(i.e Bactorub Blue), Lister Blade इत्यादी बाकी शासन निर्णयात पाहण्यात यावे.
- शासन निर्णय दिनांक 01/12/2023 नुसार वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीच्या देयकांची परिगणना करताना वजाती करावयाच्या ना-देय बाबींबाबत
वैद्यकीय प्रतिपूर्तीचे बिल जमा झाल्यानंतर त्यावर इन्कम टॅक्स लागू आहे का..?
ho
For point 11 B, Request you to kindly provide G.R. or order in which non payable items are listed. I have searched with Jalsampada vibhaag order dated 28-6-2021 but no results.