वाहतूक भत्ता| Information About Transport Allowance

Table of Contents

प्रस्तावना :-

शासन निर्णय 03 जुन 2014 अन्वये वाहतूक भत्यामध्ये अंध / मुकबधीर/ अस्थिव्यंगाने अधु / कण्याच्या विकाराणे पिडीत असलेले कर्मचारी / पिडीत नसलेले कर्मचारी यांच्या वाहतूक भत्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. शासनाने कर्मचाऱ्याच्या निवासस्थानापासून कर्तव्य स्थानापर्यंतच्या प्रवासावरील खर्चाची भरपाई म्हणून सुधारीत दराने वाहतूक भत्ता (Transport Allowance) मंजूर केलेला आहे.

01 एप्रिल 2014 पासुन वाहतुक भत्ता

अ.क्र.कर्मचाऱ्यास अनुज्ञेय असलेले ग्रेड वेतनअ-1 आणि अ वर्ग शहरेइतर ठिकाणे
1रु.5400 किंवा त्याहुन अधिक2400/-1200 /-
2रु.4400 किंवा त्याहुन अधिक परंतु रु. 5400 पेक्षा कमी1200/-600 /-
3रु. 4400 पेक्षा कमी400/-400 /-
अंध / अस्थिव्यंगाने अधु / कण्याच्या विकाराणे पिडीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांकरीता

अ.क्र.कर्मचाऱ्यास अनुज्ञेय असलेले ग्रेड वेतनअ-1 आणि अ वर्ग शहरेइतर ठिकाणे
1रु.5400 किंवा त्याहुन अधिक4800 /-2400 /-
2रु.4400 किंवा त्याहुन अधिक परंतु रु. 5400 पेक्षा कमी2400 /-2000 /-
3रु. 4400 पेक्षा कमी2000 /-2000 /-

वाहतूक भत्याचे प्रदान करण्यासाठी कार्यपध्दती व तरतूदी खालील प्रमाणे

  • रजा, प्रशिक्षण,दौरा इत्यादी कारणांमुळे 30 दिवसांपेक्षा जास्त अनुपस्थितीच्या कालावधीसाठी हा भत्ता अनुज्ञेय नाही.

  • कर्तव्य स्थानापासून एक किलोमिटर अंतराच्या आत किंवा कर्तव्यस्थान आणि निवासस्थान हयांच्या एकत्र परिसरात शासकीय निवासस्थान पुरविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना हा भत्ता अनुज्ञेय असणार नाही.
  • ज्या कर्मचाऱ्यांना शासकीय वाहतूक सुविधा पुरविण्यात आली आहे,त्यांना हा भत्ता पुरविण्यात येणार नाही.

  • दि. 09 मे  2003 च्या शासन निर्णयानुसार 1. कर्तव्य स्थानापासून एक किलोमिटर अंतराच्या आत खाजगी निवासस्थानात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांही वाहतूक भत्ता अनुज्ञेय आहे.
  • 2. कर्तव्यस्थान आणि निवासस्थान यांच्या एकत्र परीसरात शासकीय निवासस्थान पुरविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यास कर्मचाऱ्याचे निवासस्थान आणि कर्तव्यथान यातील अंतर 1 किलोमीटर व त्यापेक्षा जास्त असले तरीही वाहतूक भत्ता अनुज्ञेय नाही.
  • 3. अनुपस्थितीचा कालावधी मोजताना अशा कालावधीला जोडून येणारे पुढील व मागील सुटीचे शनिवार,रविवार आणि सार्वजनिक व विशेष सुटया वगळण्यात याव्यात.
  • 4.निलंबन कालावधीत वाहतूक भत्ता अनुज्ञेय नाही.(निलंबन कालावधी कालांतराने कर्तव्य कालावधी म्हणून नियमित झाला तरी त्या कालावधीसाठी वाहतूक भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.)
  • 5.अनुपस्थितीचा कालावधी मोजतांना कॅलेंडर महिने स्वतंत्रपणे विचारात न घेता, तो सलगपणे विचारात घ्यावा. (मुळ शासन निर्णय पाहवा)
  • 6.दिर्घ सुटटीचा कालावधी 30 दिवसापेक्षा जास्त असेल तर वाहतूक भत्ता अनुज्ञेय नाही.

दिव्यांग / अपंग कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्याचे शासन निर्णय खालील प्रमाणे आहेत.

अ) शासन निर्णय 10/08/2015 अन्वये मुकबधीर शासकीय कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता मंजूर करणेबाबत. 1) मुकबधीर असल्याबाबत शासकीय रुग्णालयाच्या नाक-कान-घसा विभाग प्रमुखांचे शिफारस प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

2) शासकीय रुग्णालयाच्या नाक-कान-घसा विभाग प्रमुखांचे शिफारस प्रमाणपत्र ज्या दिवशी प्राप्त होईल त्या दिनांकापासून, अथवा या आदेशाच्या दिनांक यापैकी जो दिनांक नंतरचा असेल त्या दिनांकापासून सदर वाहतूक भत्ता मंजूर करण्यात येतो. वरील दोन अटींखेरीज, इतर अटी शासन निर्णय दिनांक 04.06.2001 च्या शासन परीपत्रकातील विद्यमान अटींही लागू राहतील.

ब) शासन निर्णय 03/04/2017 अन्वये अंधत्व असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता मंजूर करण्याबाबतच्या अंधत्वाची व्याख्या खालीलप्रमाणे सुधारीत करण्यात आलेली आहे. Blindness means a condition where a person has any of the following conditions, after a best correction-Total absence of sight; or Visual acuity less than 3/60 or less than 10/200 (Snellen)in the better eye with best possible correction; or Limitation of the field of vision subtending an angle of fewer than 10 degrees, अशी केलेली आहे.

अंध शासकीय कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता मंजूरीच्या प्रयोजनाकरीता वरीलप्रमाणे विहीत केलेल्या अंधत्वाचे शासकीय रुग्णालयाच्या नेत्रोपचार विभाग प्रमुखाचेवैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्यानंतर शासन निर्णय दिनांक 03.06.2014 व शासन शुद्दीपत्रक वित्त विभाग दिनांक 04.06.2014 नुसार विहीत केलेल्या विशेष दराने वाहतूक भत्ता अनुज्ञेय होते.

क) अस्थिव्यंगाने अधू /अपंग/ दिव्यांग असल्यांना 40 टकके आणि पाठीच्या कण्याच्या विकाराने 40 टक्के पेक्षा अधिक कायमचे आंशिक अपंगत्व असले पाहिजे.

वाहतूक भत्याबाबत सर्व शासन निर्णय

01 एप्रिल 2022 पासुन वाहतुक भत्ता

अ.क्र.कर्मचाऱ्यास अनुज्ञेय असलेले ग्रेड वेतनअ-1 आणि अ वर्ग शहरेइतर ठिकाणे
1एस -20 व त्यावरील वेतन स्तर ग्रेड पे 5400 वर5400/-2700 /-
2एस-7 ते एस -19 ग्रेड पे 2000-50002700/-1350 /-
3एस-1 ते एस -6 ग्रेड पे 1300-19001000/-675 /-
अंध / अस्थिव्यंगाने अधु / कण्याच्या विकाराणे पिडीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांकरीता

अ.क्र.कर्मचाऱ्यास अनुज्ञेय असलेले ग्रेड वेतनअ-1 आणि अ वर्ग शहरेइतर ठिकाणे
1एस -20 व त्यावरील वेतन स्तर ग्रेड पे 5400 वर10800 /-5400 /-
2एस-7 ते एस -19 ग्रेड पे 2000-50005400 /-2700 /-
3एस-1 ते एस -6 ग्रेड पे 1300-19002250 /-2250 /-

  • उपरोक्त एस-1 ते एस-6 या वेतन स्तरामधील 24 हजार 200 रुपये व त्यापेक्षा जास्त वेतन आहरित करणाऱ्या बृहन्मुंबई नागरी समूह, नागपूर नागरी समूह व पुणे नागरी मधील कार्यरत कर्मचाऱ्यांना 2700 रुपये व इतर ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांना 1350 रुपये इतका वाहतूक भत्ता मिळेल.
  • एस-1 ते एस-6 या वेतन स्तरामधील 24 हजार 200 व त्यापेक्षा जास्त वेतन आहरित करणाऱ्या बृहन्मुंबई नागरी समूह, नागपूर नागरी समूह व पुणे नागरी मधील कार्यरत कर्मचाऱ्यांना 5400 रुपये व इतर ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांना 2700 रुपये इतका वाहतुक भत्ता अनुज्ञेय राहील.

 

 

Leave a Reply