रेखाचित्र शाखा |Information about drawing branch

प्रस्तावना:- कृषी विभाग,बांधकाम विभाग,जलसंपदा विभाग व महानगरपालीका तसचे इतर  विभागात कार्यरत असलेले रेखाचित्र शाखेतील कर्मचारी यांचे पदनाम मुख्य आरेखक ,आरेखक श्रेणी-1,आरेखक श्रेणी-2 व आरेखक श्रेणी-3 इ. पदे कार्यरत आहे.

जलसंपदा विभागातील दि . 11/02/1988 च्या शासन निर्णयानुसार फक्त अनुरेखक यांना पदोन्नतीसाठीच विभागीय परीक्षा उत्तीर्ण अनिवार्य आहे. सरळ सेवेने लागलेलेल्या सहा आरेखकांना विभागीय परीक्षेची गरज नाही.

रेखा शाखेतील कर्मचाऱ्यांसाठी राज्य वेतन सुधारणा समितीच्या अहवालातील भाग 2 मधील शिफारशीची अमंलबजावणी करण्यातबाबतचा दिनांक-31/10/1998 चा शासन निर्णय.

शासन निर्णय 24/05/1999 नुसार अनुरेखक संवर्गातील पदांच्या वेतन निश्च‍िती संदर्भांत खुलासा देण्यात आला आहे.

राज्य वेतन सुधारणा समितीच्या अहवालाच्या भाग 1 मधील शिफारशीची अमंलबजावणी नुसार अनुरेखक संवर्गातील पदांच्या वेतन निश्च‍िती संदर्भात खुलासा करण्यात आला आहे.

शासन निर्णय 08/03/2004 नुसार राज्य वेतन सुधारणा समितीच्या अहवालाच्या भाग 1 मधील शिफारशीची अमंलबजावणी नुसार अनुरेखक संवर्गातील पदांच्या वेतन निश्च‍िती संदर्भात खुलासा करण्यात आला आहे.

शासन निर्णय 10/07/2006 नुसार राज्य वेतन सुधारणा समितीच्या अहवालाच्या भाग 1 मधील शिफारशीची अमंलबजावणी नुसार अनुरेखक संवर्गातील पदांच्या वेतन निश्च‍िती संदर्भात खुलासा करण्यात आला आहे.

शासन निर्णय 26/12/2007 नुसार सिंचन व्यवस्थान व बांधकाम कार्यप्रकरातील आस्थापनेसाठी निश्च‍ित केलेल्या सुधारित आकृतीबंधात रेखाचित्र शाखेतील मंजूर पदांमध्ये बदल करण्यात आला आहे.

शासन निर्णय 28/07/2009 नुसार रेखाचित्र संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या पदनामात बदल करण्यात आले आहे. बदल केलयाने कर्मचाऱ्याच्या कर्तव्य व जबाबदारामध्ये कोणतेही बदल करण्यात आले नाही.

जलसंपदा अधीसूचना दि. 02 एप्रील 2016 नुसार आरेखक,सहाय्यक आरेखक व अनुरेख यांचे सेवाप्रवेश तयार  करण्यात आले आहे.

ग्राम विकास विभागाचे दि.18 डिसेंबर 2019 च्या पत्रानुसार शा. नि. दि.01/04/2010 मधील नियम 2 व मधील तरतूद अनुरेखक / आरेखक संवर्गातील कर्मचाऱ्यांना लागू न करण्याबाबत न्यायाधिकरणाने अर्जदारांची मागणी मान्य करण्यात आली आहे.

शासन निर्णय दि.10/01/2019 नुसार मूळ अर्ज क्र. 465/2008 मधील कृषि व पदुम विभागाच्या कृषि विभागातर्गंत असलेल्या अनुरेखक संवर्गास दिनांक 01.01.1996 ते 31.03.2006 या कालावधीतील वेतनाची  थकबाकी अदा करण्याबाबत आदेशीत केलेल आहे.

शासन निर्णय दि.22/07/2021 नुसार मृद व जलसंधारण विभागातर्गंत कार्यरत आरेखक/सहा. आरेखकउ/अनुरेखक तसेच कालबद्ध पदोन्नती योजना व आश्वावसत प्रगती योजनेतर्गंत पदोन्नतीच्या पदाची वेतनश्रेणी पात्र असलेल्या अनुरेखक यांना पुन:सुधारित वेतनश्रेणीनुसार देय होणार दिनांक 01.01.1996 ते 31.03.2006 या कालावधीतील थकबाकी अदा करण्याबाबत आदेशीत केलेल आहे.

शासन निर्णय दि.02/06/2021 नुसार सार्वजनिक बांधकाम  विभागातर्गंत कार्यरत प्रमुख आरेखक/ आरेखक/सहायक आरेखक तसेच कालबद्ध पदोन्नती योजना व  आश्वासित प्रगती योजनेतर्गंत पदोन्नतीच्या पदाची वेतनश्रेणी पात्र असलेल्या अनुरेखक यांना पुन:सुधारित वेतनश्रेणीनुसार देय होणार दिनांक 01.01.1996 ते 31.03.2006 या कालावधीतील थकबाकी अदा करण्याबाबत आदेशीत केलेल आहे.

शासन निर्णय दि.09/08/2021 नुसार जलसंपदा विभागातील अनुरेखक/ आरेखक संवर्गास दि.01.01.1996 ते दि. 31.03.2006 या कालावधीतील वेतनाची थकबाकी अदा करण्याबाबत आदेशीत केलेल आहे.

शासन निर्णय दि.15/02/2022 नुसार उद्योग विभागाच्या अधिनस्त असलेल्या संचालक, शासन मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशने संचालनालय, मंबुई यांच्या अधिपत्याखालील अनुरेखक /कनिष्ठ आरेखक / वरिष्ठ आरेखक / प्रमुख आरेखक या संर्वगास विनांक 01/01/1996 ते विनांक 31/03/2006 या कालावधीतील वेतनाची थकबाकी अदा करण्याबाबत आदेशीत केलेल आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचा शासन निर्णय दि.19/07/2006 नुसार अनुरेखक या सवंर्गातील कर्मचाऱ्यांचा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या संवर्गात समावेश करण्यात आला आहे.

ग्राम विकास व जलसंधारण विभागाचा शासन निर्णय दि.05/08/2003 नुसार स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या संवर्गात अनुरेखक या सवंर्गातील कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

पाटबंधारे विभागाचा शासन निर्णय दि.20/12/2001 नुसार स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या संवर्गात अनुरेखक या सवंर्गातील कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

रेखा शाखा कार्यनियमावली सुचनापुस्तक

सचांलक लेखा व कोषागारे.वेतन पडताळणी पथक दि. 23/01/2020 व  वित्त विभाग यांचे पत्र दि. 09.01.2020 च्या पत्रानुसार जलसंपदा विभाग व सार्वजनिक बांधकमा विभागातील अनुरेख संवर्गातील कर्मचाऱ्यांना 7 वर्षाच्या सेवेनंतर अनुज्ञेय असलेली वरीष्ठ वेतन श्रेणी ही वेतनश्रेणीमधील सुधारणा ठरत नाही. अशा प्रकारची अनुज्ञेय केलेली वरिष्ठ वेतनश्रेणी ही शासन निर्णय  दि.01/04/2010 मधील नियम 2 (ब)(3) मधील तरतूदीनुसार अकार्यत्मक वेतनश्रेणी तसेच सुधारित सेवांगर्तत आश्वासीत प्रगती योजनेचा पहिला लाभ ठरत नाही. त्यामुळे शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग दि. 01.11.1995 मधील मुददा क्र.11 समोरील स्पष्टीकरण विचारात घेउुन अनुरेखक पदावरील कर्मचाऱ्यांना मा. न्यायाधिकरणाच्या दि.22.07.2016 च्या न्यायनिर्णयानुसार विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकीत पात्र ठरल्यास, त्यानुसार सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजनेचा यथास्थिती पहिला वा दुसारा अथवा तिसरा लाभ प्रकरणपरत्वे मंजूर करण्याबाबत आदेशीत आहे.

सदर लेख माहितीकरीता देत आहे. आ लेख या blog च्या Admin चा नाही..

मित्रहो आपल्यापैकी काही बंधु- भगिनी आदिवासी/नक्षली भागात कार्यरत आहेत आणि त्यामुळे त्यांना एकस्तर वरील पदाचे वेतन द्यावे असे शासनाने सुचित केलेले आहे. परंतू त्यात  येणाऱ्या अडचणी या विषयावर परवा दिवसभर उहापोह चालू होती. यासाठी ते वेतन कोणते मिळावे याची आपणास माहिती असणे अपेक्षित आहे व त्याचा अभ्यासही असणे गरजेचे आहे. आपल्या संवर्गात अनुरेखक ते आरेखकांपर्यंत एका प्रकारच्या पदास दोन पदनामे आणि दोन प्रकारच्या वेतनश्रेण्या आहेत. त्यामुळे आपले संवर्गाचे वेतनश्रेण्यांमध्ये थोडीफार गुंतागुत आहे व ती अनुभवी लिपीकांखेरीज अन्य लिपीकांना देखिल लगेच लक्षात येत नसल्याने ती प्रथमतः समजून घेणे गरजेचे आहे…
सरळ सेवेने भरती झालेल्या व पूर्वीच्या कार्यरत कर्मचाऱ्यांना सहाव्या आयोगामध्ये जे वेतन मिळते त्यामध्ये वेतन बॅन्डमधील मुळ वेतन अधिक ग्रेड पे मिळून एकूण वेतन असे आहे. त्यामुळे प्रत्येक पदावर नियुक्तीच्या वेळी कोणता ग्रेड पे असेल व अनुरेखकास ७, सहा. आरेखकास ५ आणि आरेखकास ४ वर्षानंतर कोणता ग्रेड पे मिळेल हेही माहीत असले पाहिजे असे वाटते…

अनुरेखक..ग्रे.पे.२०००(स.से.नियु.)
आरेखक श्रे.३..ग्रे.पे.२४०० (७ व.अ.सेवेनंतर)
१२ वर्षांच्या काल. पदोन्नतीनंतर..ग्रे.पे.४२००
…   …  …  …  …  …  … …  …
सहा.आरेखक..ग्रे.पे.२४००(स.से.नियु.)
आरेखक श्रे.२..ग्रे.पे.४२००(५ व.अ. सेवेनंतर)
१२ वर्षांच्या काल.पदोन्नतीनंतर..ग्रे.पे.४३००
…  …  …  …  …  …  …  …  …
आरेखक..ग्रे.पे.२८००(स.से.नियु.)
आरेखक श्रे.१..ग्रे.पे.४३००(४ व.अ.सेवेनंतर)
१२ वर्षांच्या काल.पदोन्नतीनंतर..ग्रे.पे.४४००
…  …  …  …  …  …  …  …  …
आता अनुरेखक म्हणून कार्यरत असल्यास आणि ७ वर्षांची अर्हताकारी सेवा झाली नसेल तर एकस्तर वरचे पदाचे वेतन देताना ग्रेड पे २००० ऐवजी २४०० हा सहा. आरेखकाचा असेल आणि ७  वर्षांची अर्हताकारी सेवा झालेनंतर आरेखक श्रे.३ हे पदनाम व ग्रे.पे.२४०० ऐवजी  ४२०० हा आरेखक श्रे.२ यांचा मिळेल. जो १२ वर्षांच्या कालबद्ध पदोन्नतीनंतरही लागू होतो…
…  …  …  …  …  …  …  …  …
याचप्रमाणे सहा.आरेखक असेल तर एकस्तर वरच्या पदाचे वेतन देताना ग्रे.पे.२४०० ऐवजी आरेखकाचा २८०० मिळेल आणि ५ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर मिळालेले आरेखक श्रे.२ हे पदनाम व ग्रे.पे.४२०० ऐवजी ४३०० मिळेल जो १२ वर्षांच्या कालबद्ध पदोन्नतीनंतरही लागू होतो…
…  …  …  …  …  …  …  …  …
याचप्रमाणे आरेखक असेल तर एकस्तर वरच्या पदाचे वेतन देताना ग्रे.पे.२८०० ऐवजी आरेखक श्रे.१ चा ४३०० मिळेल आणि ४ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर मिळालेले आरेखक श्रे.१ हे पदनाम व ग्रे.पे.४३०० ऐवजी प्र.आरेखकाचा ४४०० मिळेल जो १२ वर्षांच्या कालबद्ध पदोन्नतीनंतरही लागू होतो…

पदनाम बदलाच्या शा. निर्णयानुसार पदनाम बदल व केंद्राप्रमाणे अर्हताकारी सेवा ही संपूर्ण सेवेतील प्रथम पदावर किंवा हा निर्णय लागू झाला त्यावेळी जे कर्मचारी ज्या ज्या पदावर कार्यरत होते त्या पदावर एकदाच मोजायची होती आणि आहे. म्हणून एकस्तर वरील पदाची वेतनश्रेणी देताना ग्रे.पे. हा
१)अनुरेखक असाल तर सहा.आरेखकाचा मिळेल.
२)आरेखक श्रे.३ असाल तर आरेखक श्रे.२ चा मिळेल.
३)सहा.आरेखक असाल तर आरेखकाचा मिळेल.
४)आरेखक श्रे.२ असाल तर आरेखक श्रे.१ चा मिळेल.
५)आरेखक असाल तर आरेखक श्रे.१ चा मिळेल आणि
६)आरेखक श्रे.१ असाल तर प्र.आरेखकाचा मिळेल..

Leave a Reply