सुधारीत सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना| Assured Progress Scheme under Revised Services

 6 व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारीत सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजनाचा शासन निर्णय दि.01/04/2010 रोजी निर्गमीत करण्यात आला. दि.01/10/2006 पासून यांची अमंबजावणी करण्याचे आदेशीत करण्यात आले आहे. कमाल वेतन बँड पी बी-3 (रु.15600-39100) ग्रेड पे 5400 पर्यंत वेतन घेणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांना लागू करण्यात आला आहे. पात्र अधि/कर्म यांना संपूर्ण सेवाकालावधीत कमाल दोन वेळा पदोन्नतीच्या पदाची वेतनरचना मंजूर करण्यात येते.
  या योजनेचा पहीला लाभ हा पदोन्नतीची संधी असलेल्या कर्मचाऱ्यांस 12 वर्षाच्या नियमित सेवेनंतर पदोन्नतीच्या पदाची वेतनसंरचना मंजूर करण्यात येते. दुसरा लाभ हा पहिल्या लाभानंतर 12 वर्षाची नियमित सेवा पूर्ण केलेल्या अधि/कर्म यांना दुसरा लाभ देय करण्यात आला आहे. पदोन्नतीच्या नियमांनुसार विकल्प देता येते. वेतन नियम 11(1)(अ) नुसार कार्यवाही करण्यात यावी. लाभ काढून घेतल्यावर वेतन नियम 12 नुसार कार्यवाही करण्यात यावी. अटी व शर्ती शासन निर्णयात पाहा.
 
शासन निर्णय दि.01/07/20011नुसार सुधारीत सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजनाच्या मुदयांचे स्पष्टीकरण

         शा. निर्णय दि.19/01/2013 शासकीय अधि/कर्म यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग अथवा तत्सम निवड मंडळामार्फत नामनिर्देशाने/सराळसेवेने दुसऱ्या शासकीय पदावर नेमणूक झाल्यास त्या अधि/कर्मची नियुक्ती पूर्वीची सेवा आश्वासीत प्रगती योजनेसाठी ग्राहय  धरतांना शासकीय कर्मचारी यांनी विहित मार्गाने अर्ज केलेला असावा. म ना से(वेतन) नियम-1981 मधील नियम 14 नुसार 24 तासांपेक्षा अधिक खंड असू नये. विहीत मार्गान कार्यमुक्त आले असावे. पद हे समकक्ष असावे उच्च किंवा कनिष्ठ पदावर झाल्यास पूर्वीची सेवा आप्रयोसाठी ग्राहय धरता येणार नाही.

        शासन निर्णय दि.23/12/2015 अन्वये सुधारीत सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजनाचा पहिला/दुसरा अथवा दोन्ही लाभ मंजूर केल्यानंतर प्रत्यक्ष पदोन्नती नाकारलेल्या अथवा पदोन्नतीस अपात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या लाभाची वसूली करण्यात येवू नये. 

 

        शासन निर्णय दि.16/07/2016 अन्वये मूळ विभागात सेवांतर्गत आश्वासीत प्रगती प्रगती योजना/ सुधारीत सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजनेचे लाभ घेऊन अतीरिकक्त ठरलेल्या व नवीन विभागात समोवशनाने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना देखील नवीन विभागातील पदोन्नतीच्या साखळीतील पदासाठी विहीत केलेली विभागीय परीक्षा / अर्हता परीक्षा उत्तीर्ण केल्याच्या तारखेपासून नवीन विभागात त्यांनी धारण केलेल्या पदास, पदोन्नतीच्या साखळीतील पदाच्या वेतनश्रेणीत वेतन निश्च‍ितीचा लाभ देय ठरते.

 

     शासन निर्णय दि.09/12/2016 अन्वये सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेसंदर्भातील मुद्यांचे स्पष्टीकरण करण्यात आले आहे.

        शासन निर्णय दि.11/05/2017 अन्वये सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेसंदर्भातील मुद्यांचे स्पष्टीकरण पुन्हा करण्यात आले आहे.

    शासन निर्णय दि.15/12/2017 अन्वये विभागीय चौकशी/ न्यायालयीन प्रकरण प्रलंवित असलेल्या अविकारी/कर्मचाऱ्यांना पदोन्नती देताना अमंलबजावणी करण्याची कार्यपध्दती.

1 thought on “सुधारीत सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना| Assured Progress Scheme under Revised Services”

Leave a Reply