तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना

प्रस्तावना:- कालबध्द योजना व सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना हया दोन योजना संपूर्ण सेवा कालावधीत एक लाभाच्या योजना होती व मूळ नियुक्तीपासुन 12 वर्षाच्या नियमित सेवा पूर्ण केल्यानंतर व पात्रतेनुसार अनुज्ञेय करण्यात आली. सुधारीत सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना ही संपूर्ण सेवा कालावधीत दोन लाभाची योजना आहे.यामध्ये पहीला लाभ 12 वर्षानंतर मिळत होता. दुसरा लाभ हा पहीला लाभाच्या 12+12=24 वर्षानंतर मिळतो. पात्रतेच्या निकषानुसार मिळतात.

वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार 7 व्या वेतन आयोगामध्ये सुधारणा करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार शासन निर्णय दि. 02/03/2019 निर्गमित करण्यात आला आहे. ( शासन निर्णय दि.30/09/2022 नुसार सातव्या वेतन आयोगामध्ये, तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गंत  आश्वासित प्रगती योजनेच्या अनुज्ञेयतेबाबत सुधारणा करण्यात आली आहे.)त्यामध्ये 10,20 व 30 वर्षाच्या नियमित सेवेनंतरची तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना हि दिनांक 01.01.2016 पासुन आमलांत आण्यात आली आहे.

साहव्या वेतनाच्या 5400/- ग्रेड पे आणि सातव्या वेतन आयोगाचा वेतन स्तर एस-20 पर्यंत मर्यादीत करण्यात आली आहे. महणजे 5400/- ग्रेड पे अधि/कर्म 6600/- ग्रेड पे सातव्या वेतनानुसार एस-20 वरुन स्तर एस-23 मध्ये आप्रयो देय राहील. परंतु 5500/-ग्रेड पे व 7 व्या वेतन आयोगानुसार स्तर एस-21 मध्ये वेतन घेणाऱ्या अधि/कर्म यांना नवीन योजनेअंतर्गत लाभ अनुज्ञेय राहणार नाही.

संपूर्ण सेवा काळात तीन वेळा या योजनेचा लाभ देण्यात येतो. तीन कार्यात्मक पदोन्नत्या मिळाल्या वर एकही लाभ अनुज्ञेय राहणार नाही. अटी व शर्ती हया पदोन्नतीच्या नियमानुसार राहील. विभागीय चौकशी व न्यायिक प्रकरण प्रलंबित नसणे बाबत शा नि. दि. 15.12.2017 नुसार कार्यवाही करण्यात यावी.

ज्या अधि/कर्म यांना दि.01.01.2016 पूर्वी पहीला व दुसरा लाभ मंजूर करण्यात आला आहे. अशा अधि/कर्म यांना खालील तक्त्यात नमुद केल्यानुसार दुसरा व तीसरा लाभ अनुज्ञेय होतो. जे अधि/कर्म पूर्वीच्या योजनानुसार पहिला व दुसरा लाभ घेतला आहे. व दि.01.01.2016 पूर्वीच सेवानिवृत्ती /मृत्यु झाला आहे. त्यांना 12+8 व 24+6  याप्रमाणे सुआप्रयोजनेचा लाभ लागू होणार नाही

दि.01.01.2016 पूर्वी 12 वा 4 वर्षाच्या सेवेनंतर घेतलेला लाभ

दुसऱ्या लाभाची अनुज्ञेयता

तिसऱ्या लाभाची अनुज्ञेयता

पहीला लाभ

पहिल्या लाभापासून आठ वर्षा नंतर (12+8)

दुसऱ्या लाभापासून दहा वर्षा नंतर (12+8)

दुसरा लाभ

लागू नाही

दुसऱ्या लाभापासून सहा वर्षा नंतर (24+6)

गोपनीय अहवाल प्रतवारीच्या सरासरीचा निकष सामान्य प्रशासन विभागाने विहीत केलयाप्रमाणे राहील. शासननिर्णय दि.01.08.2019 पाहवा.

रोजंदारीवरील,कार्यव्ययी आस्थापनेवरील, कंत्राटी तत्वावरील व तदर्थ नियुक्त करण्यात आलेल्या अधि/कर्म यांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय करता येणार नाही.

टीप- मुळ शासन निर्णय पाहण्यात यावा. काही शासन निर्णय साहव्या वेतन आयोगाच्या सुधारीत सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजनामध्ये देण्यात आले आहे. ते पाहावे.

9 thoughts on “तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना”

  1. मला सामान्य प्रशासन विभाग चा 1.8.2019 चा सुधारित आस्वाशीत प्रगती योजना लाभ 10,20,30 बाबत शासन निर्णय पाहिजे

    Reply
  2. Sir what about sports men who have won medals for Maharashtra and are having special promotions.if 10,20,30 scheme is applied there will be no difference between them and their batchmates please guide us

    Reply
  3. मी 2013 ला शासकीय सेवेत रुजू झालो, मी 2022 ला वाहनचालक मधून लिपिक मध्ये संवर्ग बदल केला तर मला अश्वसित प्रगती योजनेचा पहिला लाभ केव्हा मिळणार?
    2023 ला की 2032 ला??

    Reply
  4. Mi 11.09.2001 la Bharti zala.mala 03.02.2016 la pratham niymit padontti million v 31.12.2021 la dusari padonnatti tr ya yojnecha mala labh milel ka.

    Reply

Leave a Reply