प्रस्तावना:- Income Tax Return हे 2021-22 या वर्षासाठी आयकर रिटर्न प्रक्रिया सुरु होणार आहे. फॉर्म 16 प्रत्येक कर्मचाऱ्यास लवकर प्राप्त होईल. शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये असे भरपूर लोक आहेत. ज्यांचा पगार कराच्या कक्षेत येत नाही किंवा आला तरी income tax return भरण्याची आवश्यक्ता नाही. नाही भरले तर काय होईल. कर्मचारी income tax च्या कक्षेत येवो किंवा नाही. संबंधीतांनी income tax return भरलेच पाहिजे. जेव्हा Income Tax Office तसेच anti corruption च्या जाळयात फसल्यावर सर्वांत आधी income tax return भरल्याचे कागद पत्र मागतात. हे लक्षात असु दया.
आयकर कायदा 1961 कलम 139 नुसार प्रत्येक व्यक्ती ज्याचे उत्पन्न हे प्राथमिक पेक्षा अधिक आहे. त्याने income tax return भरणे गरजेचे आहे. income tax returnभरण्याचे खूप फायदे आहेत. income tax return भरणे हे जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येक व्यक्तीचे ज्यांचे करपात्र उत्पन्न भरावे. कोणत्याही प्रकारचे कर्ज व्यवहारासाठी कायदयाचे पाठबळ मिळते. आयकर कपात(टीडीएस) आयकर देयतेपेक्षा अधिक झाली असल्यास आयकर परतावा(रिफंड) घेण्यासाठी income tax return भरणे आवश्यक आहे.उत्पन्नाची वजावट घेण्यासाठी सुध्दा.
Table of Contents
income tax return भरण्याचे काही फायदे आहे. ते खालील प्रमाणे.
1.व्हिसासाठी income tax return आवश्यक आहे.
दुसऱ्या देशात जाण्यापूर्वी व्हिसा आवश्यक आहे. व्हिसासाठी अर्ज करताना, तुम्हाला आयकर रिटर्नसाठी विचारले जाते. व्हिसा चेक करणारी अधिकारी तीन चार वर्षाचे Income Tax Return ची मागणी करु शकते. याद्वारे संबंधीत व्यक्तीची आर्थिक स्थितीबददलची माहिती करुन घेतली जाते.
2.income tax return हा सर्वात महत्वाचा उत्पन्नाचा पुरावा मानला जातो.
आयकर रिटर्न भरल्यावर करदात्यांना प्रमाणपत्र मिळते. हा सरकारी पुरावा आहे, जो व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न दर्शवतो. तसेच क्रेडिट कार्ड, कर्ज अथवा स्वत:चे क्रेडिट सिध्द करण्यास मदत होते.
3.कर परतावा हवा असल्यास income tax return भरणे गरजेचे आहे.
अनेक वेळा पगारदार व्यक्तीचे उत्पन्न स्लॅब कराच्या कक्षेत येत नाही, तरीही काही कारणास्तव TDS कापला जातो. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला परतावा हवा असेल तर आयटीआर भरणे आवश्यक आहे.कर परताव्याचा दावा करण्यासाठी आयटीआर दाखल करावा लागतो. आयटीआर दाखल केल्यानंतर, आयकर विभाग त्याचे मूल्यांकन करते. जर तुमचा परतावा दिला जात असेल, तर विभाग त्यावर प्रक्रिया करतो आणि तुमच्या नोंदणीकृत बँक खात्यात टाकतो.
4.सहज कर्ज प्राप्त करता येते.
कर्ज घेताना तुमच्या उत्पन्नाचा पुरावा म्हणुन Income Tax Return मागितला जातो. घरबांधणीसाठी घेतलेल्या गृहकर्जाच्या बाबतीत उतपनाचा पुरावा म्हणून तीन वर्षांपर्यतंचा आयकर परतावा मागण्यात येतो. हे सर्व सरकारी आणि निमसरकारी बँकांना लागू आहे.तुम्ही ITR शिवाय कर्जासाठी अर्ज केल्यास बँकाही ते नाकारू शकतात. त्यामुळे दरवर्षी आयकर परतावा फाइल केल्यास कर्ज मिळण्यास सुलभ होते.
5.व्यवसास सुरू करण्यासाठी income tax return ची आवश्यक्ता असते.
स्वत:चा व्यवसाय सुरु करायचे असेल तर आयकर परतावा भरणे महत्वाचे आहे. कोणत्याही सरकारी विभागात Tender घ्यायचे असेल तर आयकर परतावा मागण्यात येतो.
6.विमा संरक्षणासाठी income tax return भरणे महत्वाचे आहे.
विमा कंपन्या अधिक विमा संरक्षण देण्याच्या अटीवर किंवा 1 कोटी रुपयांपर्यंतच्या मुदतीच्या योजनांवर आयकर परतावा( Income Tax Return) पाहतात. संबंधीताचे परतफेडीची स्थिती पाहण्यासाठी आयकर परतावा मागण्यात येते.
7.शेअर्समधील तोटा पुढे दाखवण्यासाठी income tax return भरण्याची आवश्यक्ता आहे.
शेअर्स किंवा म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठीही आयटीआर हा एक चांगला स्रोत आहे. नुकसान झाल्यास, तोटा पुढील वर्षासाठी पुढे दाखवण्यासाठी विहित मुदतीत आयकर विवरणपत्र भरणे आवश्यक आहे.पुढील वर्षात भांडवली नफा झाल्यास, तोटा नफ्याच्या तुलनेत समायोजित केला जाईल आणि तुम्हाला करात सूटमध्ये लाभ मिळेल.