शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांना व्याज प्रदान करण्याबाबत | payment of interest

प्रस्तावना :- शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना उशीरा मिळाणाऱ्या प्रदानावर काही अटीच्या अधीन राहून व्याज देय ठरते.परंतू प्रशासकीय चूक नसेल तर व्याज देय होणार नाही.शासकिय अधिकारी /कर्मचारी यांना शासकीय काम करतांना कोणतेही अडचण येऊ नये. त्यांचा पगार तात्काळ मिळावा. सर्व भत्ते वेळेवर मिळावे. सेवानिवृत्तीच्या वेळी त्यांना सर्व प्रदाने ही तात्काळ देण्यात यावी. असे शासनाचे धोरण आहे. तरी पण काही कारणास्तव संबंधीतास वेळेवर काही प्रदाने दिली जात नाही. त्यासाठी शासनाने वेळेवर प्रदाने मिळण्यासाठी शासनाने काही शासन निर्गमित केले आहे. 

Table of Contents

1.विलंबाने सेवाउपदान व निवृतीवेतन प्रदान  केल्यामुळे व्याज अदा करण्याबाबत:-

अधिसूचना दि. 01/11/2008 अन्वये अ) जेथे सेवानिवृत्ती उपदानाचे/मृत्यु उपदानाचे प्रदान सेवानिवृत्तीच्या/ मृत्युच्या तारखेपासून तीन महिन्यानंतर करण्यात आले असेल,आणि रक्कम प्रदान करण्यातील विलंब हा प्रशासनिक चुकीमुळे झाला तर  तीन महिन्यानंतरच्या कालावधीसाठी सर्वसाधारण भविष्यनिर्वाह निधीच्या ठेवीवर लागू असल्याला व्याजदराप्रमाणे व्याज देय ठरते. परंतू स्वत: अधिकारी/कर्मचारी जबाबदार असेल तर व्याज मिळणर नाही. तसेच तात्पुरते उपादान देण्यात आले तर व्याज देय ठरणार नाही.

ब) जेथे निवृत्तीवेतनाचे /कुटूंब निवृत्तीवेतनाचे प्रदान ते देय झाल्याच्या तारखेपासून 6(सहा) महिन्यानंतर प्राधिकृत करण्यात आले असेल आणि रक्कम प्रदान करण्यातील विलंब हा प्रशासनिक कारणांमुळे झाला असेल तर सहा महिन्यानंतरच्या कालावधीसाठी सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीच्या ठेवीवर  लागू असलेल्या व्याजदराप्रमाणे व्याज देय ठरेल.

ज्या कालावधीसाठी तात्पुरते निवृत्त‍िवेतन प्रदान करण्यात आले असेल त्या कालावधीसाठी व्याज देय होणार नाही. परंतू तात्पुरते निवृत्तीवेतनाचे प्रदान बंद झाल्यानंतर सहा महिन्याचा कालावधी उलटल्यापासून अंतिम निवृत्तीवेतन प्राधिकृत करेपर्यंतचा कालावधी विहीत तरतूदीनुसार व्याज देय ठरते.

2.विलंबाने प्रदान करण्यात आलेल्या विमा / बचत निधी रकमेवर व्याज देण्याबाबत:-

शासन निर्णय दि. 27/05/1992दि.30/09/2008 अन्वये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त किंवा मृत झालेल्या अधिकारी/कर्मचारी यांना गट विमा योजनाची रक्कम ही ती सेवानिवृत्त किंवा मृत झाल्यापासून तीन महिन्यात देण्यात यावी. तसेच सेवानिवृत्तीच्या वेळी अधिकारी/कर्मचारी यांच्या विरुध्द विभागीय /न्यायिक कार्यवाही प्रलंबित असली तरी गट विमा योजनेची प्रदेय रक्कम सेवानिवृत्तीच्या दिनांकापासून तीन महिन्याच्या आत प्रदान करण्यात यावी. गट विमा योजनेची रक्कम तीन महिन्यात देण्यात आली नाही तर बचत निधीवर जे व्याज दिले जाते. त्या दराने व्याज अनुज्ञेय राहते.

3) विलंबाने प्रदान करण्यात आलेल्या भविष्य निर्वाह निधीवर व्याज देण्याबाबत:-

शासन निर्णय दि. 20/06/1996 नुसार  शिल्लक अर्जित /अर्धवेतनी रजेच्या संबंधीत रजा वेतनाच्या सममूल्य रोख रकमेच्या प्रदानासाठी झालेला विलंब प्रशासकीय कारणास्तव/प्रशासनिक चुकीमुळे किंवा संबंधित कर्मचाऱ्यांच्या नियंत्रणाबाहेरील कारणामुळे झालेला आहे असे स्पष्टपणे प्रस्थापित होत असेल अशा प्रकरणी विललंबाच्या कालावधीसाठी व्याज देण्य ठरविण्यात आले आहे.

नियमित प्रकरणी (विभागीय चौकशी प्रकरणे वगळून) शासकीय कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्त‍िच्या / सेवा समाप्तीच्या/मृत्युच्या दिनांकापासून एक महिन्यानंतरचा असेल तर. विलंबाच्या कालावधीसाठी सर्वसाधारण भविष्य निर्वा निधीच्या ठेवीवर लागू असलेलया व्याज दराप्रमाणे व्याज देय ठरविण्यात आले आहे.(सध्या वार्षीक दर हा सन 2021-22 साठी 7.1 टकके आहे.)

4) विलंबाने प्रदान करण्यात आलेलया वेतन महागाई भत्ता,इतर पूरक भत्ते तसेच वेतनवाढी ( आगावू वेतन वाढी आता देत नाही) इत्यादीच्या वित्तलब्धीवर व्याज प्रदान करण्याबाबत:-

शासन निर्णय दि. 22/11/1994 अन्वये विलंबाने प्रदान करण्यात आलेलया वेतन महागाई भत्ता,इतर पूरक भत्ते तसेच वेतनवाढी ( आगावू वेतन वाढी आता देत नाही) इत्यादीच्या वित्तलब्धीवर व्याज प्रदान करण्यात आले आहे.

1.महाराष्ट्र नागरी सेवा(सुधारीत वेतन) नियमानुसार वेतन निश्च‍िती.

2.पदोन्नती,मानीव दिनांक किंवा वेतन पुर्नरचनेनंतर वेतनश्रेणीची प्रर्नसुधारणा इत्यादीमुळे होणारी वेतन निश्च‍िती.

3.वेतनवाढी(आगावू वेतनवाढ बंद झाली आहे),महागाई भत्ता वाढ,प्रवास भत्ता इत्यादिमुळे मिळणाऱ्या रकमा या सर्व व्याज देय ठरविण्यात आले आहे. प्रशासकीय चूक असेल तरच व्याज देय ठरविण्यात आले आहे. मुळ शासन निर्णय वाचण्यात यावा.

सेवा निवृत्त होणारे अधिकारी /कर्मचारी यांचे  निवृत्तीवेतन कमीत कमी 6 महिणे आगोदर महालेखाकार यांना सादर करण्यात यावे. संबंधित अधिकारी/कर्मचारी यांचे प्राधिकार पत्र मिळाल्यानंतर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. प्रशासकीय कारणास्तव उशीर होऊ देण्यात येऊ नये.

 

Leave a Reply