प्रस्तावना :- शासन अधिसूचना दिनांक 30 /12/2021 नुसार केंद्र शासन भविष्य निर्वाह निधी वर व्याज दर निश्चित करत असते. केंद शासन जे व्याज दर आपल्या कर्मचाऱ्यास देते. तेच व्याज दर राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यास राज्य शासन देत असते. सदयास्थितीत व्याज दर त्रेमासिक ठरविण्यात येत आहे. माहे. 1 जानेवारी 2022 पासून केंद शासनाच्या वित्त मंत्रालयाकडून भविष्य निर्वाह निधीच्या जमा रकमेवर व्याज अदा करण्यासाठी वेळावेळी जे व्याज दर निश्चित केले जाते. तेच व्याज दर राज्य शासनास लागू करण्यात आले आहे. भविष्य निर्वाह निधीचे व्याज दर पाहण्यासाठी केंद्रशासनाची website देण्यात येत आहे. https://dea.gov.in/budgetdivision/interest-rates
शासन निर्णय दिनांक 01/12/2023 नुसार सदर वर्गणीची रक्कम रु. पाच लाखापेक्षा जास्त होत असेल तर, उर्वरीत महिन्यांची वर्गणी जमा करणे थांबवावे. अशा वर्गणीदारासाठी उर्वरित महिन्यांसाठी कमीत कमी 6 % वर्गणी वजा करावयाची अट शिथील करण्यात यावी.
सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीचे व्याज दर खालीप्रमाणे आहे.
अ.क्र. | वर्ष (महिणे) | व्याजाचा दर | |
1 | 1 एप्रील-2021 ते 30 जून-2021 | 7.1% टक्के | |
2 | 1 जुलै-2021 ते 30 सप्टेबंर-2021 | 7.1% टक्के | |
3 | 1 ऑक्टोबंर-2021 ते 31 डिसेबंर-2021 | 7.1% टक्के | |
4 | 1 जानेवारी-2022 ते 31 मार्च-2022 | 7.1% टक्के | केंद्र शासनाची Website |
खूप छान माहतीपूर्ण साईट आहे.
धन्यवाद सर