कोषागार कार्यालयासंबंधीत माहिती | Information regarding treasury office

प्रस्तावना:- महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाअंतर्गत 1 फेब्रुवारी 1962 पासून लेखा व कोषागारे संचालनालयाची स्थापना केली आाहे. कोषागार कार्यालयावर(treasury office) नियंत्रण ठेवण्याचे काम संचालक,लेखा व कोषागारे, मुंबई यांचे कडे आहे. सर्व शासकीय जमा रकमा शासन खाती जमा करण्याचे काम केले जाते. योग्य लेखाशिर्षाखाली रकमा जमा करणे. कर्मचाऱ्याचे वेतन हे कोषागार कार्यालयामार्फतच केले जाते. https://mahakosh.gov.in ही प्रणाली तयार करण्यात आली अहे. अधिकारी /कर्मचाऱ्यास जे काही अग्रीम देय होते. ते कोषागार कार्यालयामार्फत देय होते. उदा:- 7610 लेखाशिर्षखाली देय सर्व अग्रीम. भविष्य निर्वाह निधी,गट विमा योजना,रजा रोखीकरण,इ.सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी यांचे सर्व सेवानिवृत्तीच्या रकमा हया कोषागारातून(treasury) दिल्या जातात उदा:- उपदान, इ. Budget Estimation, Allocation & Monitoring System या प्रणालीतून सर्व देय देण्यात येतात. फक्त अंशराशीकरण हे treasury office/कोषागार कार्यालयातून स्वत: दिल्या जाते.कोषागार कार्यालयातून खालील सेवा दिल्या जातात.

Table of Contents

1)BEAMS:-

Budget Estimation, Allocation & Monitoring System ( https://beams.Mahakosh.gov.in)  या प्रणालीतून देयक पारीत केले जाते. 7610 चे तसेच अन्य fund शासनाकडून येतात.ते या प्रणालीतून देय करण्यात येतात.

2)Bill Portal:-

शासन निर्णय दि. 02/03/2015 अन्वये “बील पोर्टल” प्रणालीची सर्व प्रक्रिया सांगीतली आहे. व दि.10/11/2020 नुसार संलग्न केलेली देयके “बील पोर्टल” प्रणालीवरच तयार करून अधिदान व लेखा कार्यालय / जिल्हा कोषागार कार्यालये / उपकोषागार कार्यालये यांना सादर करण्याचे आदेशीत आहे. देयके “बील पोर्टल” प्रणालीवर तयार होणाऱ्या देयकांची सूची खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.देयकाचे प्रकारMTR नमुना
11.दुरध्वनी (Telephone) 2.वीज (Electricity)3. पाणी (Water) 4. पेट्रोल, ऑईल,वंगण ( Petrol, Oil, Lubricant)5. मोटर वाहन दुरुस्ती (Vehicle Repair) 6. कंत्राटी सेवेतील अधिकारी, कर्मचारी यांचे मानधनावरील खर्च (उदिष्ट -१०) (Contractual Employee Honorarium Bill) 7. इतर सर्व आकस्मिक खर्च(उदिष्ट-१३) (Office Expenditure Bills)MTR-31
2सहाय्यक अनुदान, अर्थसहाय्य (Grant In Aid)MTR-44
3वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती (Medical Reimbursement)MTR-24 A
4वैद्यकीय तपासणी (IAS, IPS, IFS अधिकारी, राज्य शासकीय अधिकारी) (Health Check Up)MTR-24 A
5वैद्यकीय अग्रीम ( Medical Advance)MTR-31B
6उत्सव अग्रीम (Festival Advance)MTR-31B
7 प्रवास भत्ता अग्रीम (TA on Tour Advance)MTR-31B
8बदली/सेवानिवृत्ती प्रवास भत्ता अग्रीम (Transfer /Retirement TA Advance)MTR-31B
9प्रवास भत्ता (TA on Tour)MTR-18
10बदली प्रवास भत्ता (Transfer TA)MTR-18
11सेवानिवृत्ती नंतर देय होणारा प्रवास भत्ता (TA after Retirement)MTR-18
12स्वग्राम प्रवास सवलत /महाराष्ट्र दर्शन (LTC/Maharashtra Darshan)MTR-18
12शिष्यवृत्ती  व विदयावेतन (Scholarship and Stipend Bill)MTR-45
14साधी पावती (Simple Receipt Bill)MTR-45 A
15ठेव संलग्न विमा योजना (GPF Linked Insurance Scheme) MTR-52A
16भविष्य निर्वाह निधी आगाऊ रक्कम (परतावा योग्य, ना परतावा), अंतिम भविष्य निर्वाह निधी (वर्ग-1,2,3 फक्त) (GPF Refundable, Non-Refundable, Final Withdrawal) (Class-1,2,3 only)MTR-52
17गट विमा योजना (GIS)GIS-8
18सर्व प्रकारचे आकस्मिक खर्च (Contingency Bill without Sub-Voucher)MTR-28
19संक्षिप्त देयक (Abstract Contingency Bill)MTR-29
20संक्षिप्त देयकाचे तपशिलवार देयक (NPDC) BEAMS मधील DDO Assistant Login मध्ये NPDC येथे तपशीलवार देयक तयार केल्यानंतर DDO Final Login मध्ये Approve करावे.MTR-30

3) GRAS(Government Receipt Accounting System:-

ई पेमेंट व पेमेंट गेट वे चा वापर करण्यात येऊन शासकीय जमा  रकमांचे लेखांकन, ताळमेळ व व्यवस्थापन करण्यासाठी  आभासी कोषागार कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. सध्या “ग्रास” प्रणाली लागू करण्यात आली आहे. सदर प्रणालीचा online असल्यामुळे केव्हा व कुठेही ई-चलनाद्वारे रक्कम (24X7 याप्रमाणे) भरण्याची सुविधा प्राप्त आहे.या प्रणालीद्वारे शासनाच्या सर्व विभागांद्वारे वसूल करण्यात येणाऱ्या महसुली जमा रकमा ई पेमेंट व पेमेंट गेट वे चा वापर करुन परस्पर शासन खजिन्यात शीघ्रतेने जमा करण्यात येते.

शासन परिपत्रक दि. 08/07/2013 नुसार “ग्रास” च्या माध्यमातून शासन खाती जमा केलेल्या रकमांच्या लेखाकंनाबाबत.

शासन निर्णय दि. 13/08/2014 नुसार “ग्रास” प्रणालीद्वारे ईलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्रदान   करताना “0070 इतर प्रशासनिक सेवा” या मुख्य लेखानशर्षाखाली चुकून प्रदान झाल्यास त्या रकमांचा परतावा करण्याबाबत.

शासन निर्णय दि. 01/07/2016 नुसार शासकीय जमा लेखांकन प्रणाली (GRAS) द्वारे शासन खाती जमा होणाऱ्या रकमांचे लेखकंन, ताळमेळ, परतावा, ई-चलनांचे विरुपीकरण,  चुकीचे वर्गीकरण, इत्यादीबाबत सांबधीत विभागाने करावयाची कार्यवाही.

शासन निर्णय दि. 09/01/2020 नुसार “ग्रास” प्रणालीद्वारे ईलेक्ट्रॉनिक पध्दतीने चुकीचे/ दुबार/ अतिरिक्त प्रदान झाल्यास त्या रकमांचा परतावा करण्याबाबतची कार्यपध्दती.

शासन निर्णय दि. 20/04/2021 नुसार वन विभागामार्फत राज्य शासनाच्या एकत्रित निधीत जमा होणारा महसूल शासकीय जमा लेखा  प्रणालीवर(ग्रास) नोंदववणेबाबतची कार्यपध्दती.

4)सेवार्थ प्रणाली:-

सेवार्थ प्रणाली मधून अधिकारी /कर्मचारी यांचा वेतन काढण्यात येतो. सेवार्थ प्रणालीमधून नविन कर्मचाऱ्यांचा सेवार्थ आयडी तयार करण्यात यावी. त्यांची सर्व माहिती का एकदा सेवार्थ प्रणालीमध्ये भरली की, ज्या कार्यालयात सेवार्थ प्रणाली लागू आहे. त्यांना संबंधीत अधिकारी/कर्मचाऱ्यांची सर्व माहिती दिसते/मिळते. जेथे सेवार्थप्रणाली लागू नाही तेथे वेतन ते कार्यालय स्वत: काढते.

5)निवृत्तीवेतनवाहणी:-

निवृत्तीवेतनवाहणीवर सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांचे निवृत्तीवेतन दिले जाते. महालेखाकार यांच्या कडून मंजूर झाल्यानंतर कोषागार कार्यालयातून संबंधीत सेवानिवृत्त धारकास निवृत्तीवेतन दिले जाते.

शासन निर्णय दि.02/07/2015 नुसार निवृत्तीवेतन प्रकरण तयार करण्याकरीता सध्याच्या विविध प्रपत्रांमध्ये सुधारणा करुन एक नमुना तयार करणे तसेच निवृत्तीवेतन प्रकरणे ऑनलाईन पध्दतीने तयार करणे आनण इतर बदलांबाबत.

शासन निर्णय दि.07/05/2019 नुसार शासकीय कर्मचाऱ्याचे निधन झाल्यानंतर कुटुंब निवृतीवेतनाचा प्रस्ताव महालेखाकार कार्यालयाकडे नमुना-12 मध्ये पाठविण्यात येतो. तसेच निवृनिवेतिधारकाचे निधन झाल्यानंतर कुटूंब निवृत्तीवेतन सुरू करण्यासाठी कुटुंब निवृनिवेतिधारकाकडून अधिदान व लेखा कार्यालय/ कोषागार कार्यालयाकडे अर्ज केला जातो. या करीता सद्यास्थितीत आवश्यक माहिती प्रचलित नमुना-12 मध्ये तसेच इतर नमुन्यात सादर करण्यात येते. एप्रिल 2012 पासून निवृत्ती वेतन धारकांना दरमहा मिळालेले निवृत्ती वेतन पहाण्याकरीता Username व password खालीलप्रमाणे आहेत
User Name :- PENSIONER
password :- ifms123

6)वेतननिका :-

वेतननिकामधून वेतन आयोगाची पडताळणी तसेच सेवापुस्तकाची पडताळणी करण्यात येते. सध्या सातव्या वेतन आयोगाची वेतनपडताळणी करण्यात येत आहे. अधिकारी/कर्मचारी यांना चूकीची किंवा जास्त वेतन देण्यात येऊ नये. तसेच त्यांच्या सेवापुस्तकांत शासन निर्णय/परिपत्रकाप्रमाणे नोंदी घेण्यात आलय का? हे पाहण्याचे काम वेतनपडताळणी विभागाचे आहे. वेतनपडताळणी मार्गदर्शिका

7)कोशवाहिनी:-

कोशवाहीणी मधून देयकाबददलची माहिती मिळते. देयक पास झाले किंवा नाही. देयकाची सद्यास्थिती माहिती होते.तसेच head wise माहिती प्राप्त हेाते.

8)Cash Management Project (CMP) :-

CASH MANAGEMENT PRODUCT:-   Government Services

या प्रणालीद्वारे आता आदात्याच्या खात्यामध्ये थेट रक्कम करण्यात येते. त्यासाठी payee ची नोंदणी बीम्समध्ये करायला पाहिजे.

शासन निर्णय दि. 22/01/2013 नुसार Cash Management Project (CMP) या सुविधेद्वारे थेट आदात्याच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्याबाबत.

शासन निर्णय दि. 07/04/2021 नुसार Cash Management Project (CMP) प्रणालीमार्फत आहरण व संवितरण अधिकारी यांच्या बँक खात्यात थेट रकमा जमा  करणेबाबत.

शासन निर्णय दि.1/03/2020 नुसार ई-कुबेर (e-Kubler) प्रणालीमार्फत आहरण व संववतरण अविकारी यांच्या बँक खात्यात थेट रकमा जमा करणेबाबत.

शासन निर्णय दि.12/11/2021 नुसार ई-कुबेर (e-Kubler) प्रणालीमार्फत त्रयस्थ अदाता (Third Party) यांच्या बँक खात्यात थेट रकमा जमा करणेबाबत.

2 thoughts on “कोषागार कार्यालयासंबंधीत माहिती | Information regarding treasury office”

Leave a Reply