जुन्या निवृत्तिवेतनाचा(old pension)अशत: लाभ देय ?

Table of Contents

प्रस्तावना:-

शासन निर्णय दिनांक 31.10.2005 व दिनांक 27.08.2014 अन्वये दिनांक 01.11.2005 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनुक्रमे परिभारित अंशदान निवृत्तिवेतन योजना(DCPS)/राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली(NPS) लागू करण्यात आली आहे. परिभारित अंशदान निवृत्तिवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, 1982, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिावेतनाचे अंशराशीकरण) नियम, 1984 व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीचे लाभ अनुज्ञेय ठरत नाहीत.

केंद्र शासनाच्या सेवेतील राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवेत कार्यरत असतांना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला मृत्यू उपदान, रुग्णता सेवानिवृत्ति झालेल्या कर्मचाऱ्यास सेवा उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान अनुज्ञेय केले आहे. त्याच धर्तीवर परिभारित अंशदान निवृत्तिवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्गचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्ति झालेल्या कर्गचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवारनिवृत्ति उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्ति होणाऱ्या कर्गचाऱ्यांना सेवा उपदान दिनांक 31/03/2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार लागू करण्यात आले आहे. सध्या 14 लाख रुपये मर्यादेपर्यंत उपदानाची रक्कम देण्यात येते.

 जुन्या निवृत्तिवेतन चा(old pension)अशत: लाभ देय ?

(अ) सेवेत असतांना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुटुंबनिवृत्तिवेतन आणि मृत्यू उपदान,
(ब) रुग्णता सेवानिवृत्ति झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवा उपदान लागू करण्यात येत आहे.
त्यानुसार सदर कुटुंबनिवृत्तिवेतनधारकास व रुग्णता निवृत्तिवेतनधारकास महाराष्ट् नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, 1982 मधील तरतुदीप्रमाणे कुटुंबनिवृत्तिवेतन / रुग्णता निवृत्तिवेतन लागू होईल.
(क)तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान लागू करण्यात येत आहे.
सेवा उपदान व मृत्यु उपदानासाठी महाराष्ट् नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, 1982 मधील तरतूदी लागू राहतील.
*शासन निर्णय दिनांक:-29.09.2018 अन्वये लागू करण्यात आलेली सानुग्रह अनुदान योजना या शासन निर्णयाच्या दिनांकापासून बंद करण्यात येत आहे. सानुग्रह अनुदानासाठी प्राप्त झालेले अर्ज विचारात घेण्यास तसेच प्रलंबित प्रकरणे बंद करण्यात आली आहे.
* सदर योजनामध्ये नमुना-1,नमुना-2 व नमुना-3 दिलेले आहे. सदर योजना स्विकारायची असेल तर शासन निर्णय लागू झाल्यापासून एक महिण्याच्या आत मध्ये नमुना भरुन देण्यात यावा. तसचे जे अधिकारी/कर्मचारी नविन रुजू होणार आहे. त्यांनी रुजू झाल्यापासून आठ दिवसात नमुना भरुन देण्यात यावा.(म्हणजेच याचा अर्थ असा निघतो की दोन्ही पैकी एकाची निवड करायची आहे. जुनी किंवा नविन)

नमुना-1 :- जे शासकीय कर्मचारी महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, 1982 प्रमाणे कुटुंबनिवृत्तिवेतन किंवा रुग्णता निवृत्तिीवेतन अनुज्ञेय करण्याबाबतचा विकल्प सादर करतील, त्यांनी नमुना-1 प्रमाणे कुटुंबाचा तपशील सादर करणे अनिवार्य आहे.

नमुना-2 :- राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत सध्या कार्यरत असलेल्या व यापुढे शासकीय सेवेत नियुक्त होणारा कर्मचारी यांनी त्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास किंवा रुग्णता सेवानिवृत्ति झाल्यास, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, 1982 प्रमाणे कुटुंबनिवृत्तिवेतन किंवा रुग्णता निवृत्तिवेतन अनुज्ञेय करण्याबाबत अथवा राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत त्याची कायम निवृत्तिवेतन लेखा क्रमांक (PRAN) मध्ये जमा असलेली संचित रक्कम निवृत्तिवेतन PFRDA यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार अनुक्रमे कुटुंबास किंवा त्याला मिळण्याबबातचा नमुना-2 मध्ये विकल्प कार्यालय प्रमुखाकडे सादर करवा.

नमुना-3:- दिनांक 01.11.2005 ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास मृत्यू उपदान, कुटुंबनिवृत्तिवेतनाची थकबाकी तसेच मिळण्यासाठी सदर शासन निर्णयातील नमुना-3 मधील विकल्प कार्यालय प्रमुखाकडे सादर करण्यात यावा.

सदर योजना ही केंद्र शासनाप्रमाणे महाराष्ट्रात लागू करण्यात आली आहे. सध्या केंद्र शासनाकडून एनपीएस मध्ये बदल करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात यामध्ये अजून बदल होऊ शकते महाराष्ट्र शासनाने सुध्दा नविन व जुन्या निवृत्ति वेतनासाठी समिती स्थापना केली आहे. केंद्र शासनाने जुनी निवृत्तिवेतन योजना लागू केली तर महाराष्ट्र शासन तात्काळ लागू करेल असे वाटते. नाही तर एकच मिशन जुनी पेन्शन!

Leave a Reply