सण अग्रिम|Festival Advance For Maharashtra Government Employees

प्रस्तावना:- शासकीय कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय उत्सव  तसेच धार्मिक सण/उत्सवाचा खर्च भागविण्यासाठी कर्मचाऱ्यांस शासनाकडून सण अग्रिम दिले जाते़. उदा. खालीप्रमाणे. 1.शासन निर्णय दि. 23/10/2018 नुसार साहव्या वेतन आयोगापासून सुधारण्या करण्यात आलेल्या वेतन संरचनेतील ज्या अराजपत्रित  राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या ग्रेड वेतन ₹4,800/-(रु.चार हजार आठशे) पेक्षा अधिक नाही अशा अरापत्र‍ित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना ₹12,500/- (रु.बारा हजार पाचशे फक्त) सण अग्रिम अनुज्ञेय  करण्यात आला आहे. तसेच सातव्या वेतन आयोगानुसार  एस-17 (47600-151100) पेक्षा अधिक नाही. अशा कर्मचाऱ्यास सण अग्रिम मंजूर करता येईल. सन 2018 नंतर सण अग्रिमाची रक्कम वाढविण्यात आली नाही.

2. सण अग्रिम फक्त पुढील सणांना  1. दिवाळी 2. रमझान ईद 3.ख्रिसमस 4. पारसी नववर्ष 5. संवत्सरी 6. रोश-होशना 7. वैशाखी पौर्णीमा (भगवान बुध्द जयांती) 8. स्वांतत्र्य दिन 9. प्रजासत्ताक दिन 10. डॉ.आांबेडकर जयंती तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून वेळावेळी घोषित करण्यात येणाऱ्या सर्वांसाठीच अनुज्ञेय राहील.

3.सण अग्रिम हे 10  हप्त्यात वसुल करण्यात येते.

4.सण अग्रिमासाठीआवेदन पत्र

5.मुंबई वित्तीय नियम-1959 मधील नियम क्रमांक 142(जे) मधील अटी व शर्ती प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.    

6.सण अग्रिम बील पोर्टल प्रणाली मधुन तयार करण्याची कार्यपद्धती     

7.https://billportal.mahakosh.gov.in/BillPortal/

Leave a Reply