अ.क्र. | वर्ष | मोटार-कार व्याज दर | मोटार-सायकल/स्कूटर/ मोपेड/तीन चाकी स्वंयचलित सायकल व्याज दर | शासन निर्णय दिनांक |
1 | 01/04/2003 ते 31/03/2009 | 11.5% | 8% | |
2 | 01/04/2010 ते 31/03/2011 | 12% | 9% | |
3 | 01/04/2011 ते 16/10/2023 | 11.5% | 9% | |
4 | 17/10/2023 ते आजपर्यंत
|
टीप :- सायकलचा व्याज दर देण्यात आला नाही. आता सायकल साठी व्याज आकारण्यात येत नाही.
उदा :- श्री राऊत यांना 01/04/2015 रोजी रुपये 60000/- मेाटार-सायकल अग्रिम मिळाले. राऊत यांना मुददल व व्याजासह किती रक्कम शासनास जमा करावे लागेल.मोटार कार/सायकलसाठी व्याजाचा दर हा 01/04/2015 रोजी 9% होता.
= शा.नि. 2014 प्रमाणे अग्रिमाची वसूली व्याजासह 60 समान मासिक हप्त्यांमध्ये करण्यात यावी. प्रथम अग्रिम व नंतर व्याज वसूल करण्यात यावे.
श्री राऊत यांचे मासिक मुददल रुपये 1200/- प्रमाणे 50 हप्त्यात कपात करण्यात आली आहे. व्याजाची परिगणना खालील प्रमाणे करण्यात येत आहे.
मोटार सायकल व्याजाची परिगणना | |||||
= | N(N+1) | X | M | X | R |
2 | 12 | 100 | |||
= | 50(51) | X | 1200 | X | 9 |
2 | 12 | 100 | |||
= | 1275 | X | 10800 | ||
1200 | |||||
= | 13770000 | ||||
1200 | |||||
= | 11475 | ||||
व्याजाची परिगणना केल्यानंतर रुपये-11475 व्याज आले आहे. व्याजाचा हप्ता 11475/9=1275. श्री राऊत यांना 1275 प्रमाणे 9 हपत्यात वसुली करण्यात येईल. मुददलाचे 1200 x 50 =60000/- व 1275 x 9 = 11475/- एकूण 59 हत्यात =60000+11475 = 71475/- एवढी रक्कम (मुददल व व्याज) श्री राऊत यांच्या पगारातून कपात करण्यात येईल.
टीप :- जो पर्यंत अग्रिम धारकाच्या खात्यात अग्रिम जमा होत नाही. तो पर्यंत मुददलाची रक्कम कपात करता येत नाही.
उदा:- श्री राऊत यांचा अग्रिमाचा आदेश शासनाकडून दिनांक 01.04.2015 रोजी आला आहे. श्री राऊत यांच्या खात्यात (cmpद्वारे) दिनांक 15.06.2015 रोजी अग्रिम जमा केले असेल तर जुलै-2015 देय ऑगस्ट-2015 च्या पगारातून मुददल कपात करण्यात येईल.
अग्रिम मंजूर करताना मंबई वित्तीय नियम,1959मधील नियम 124 (बी) व वित्त विभाग,शासन निर्णय क्र. अग्रिम-1095/प्र.क्र.70/95/विनियम, दि.26.9.1997 मध्ये नमूद, तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार लागू ठरणाऱ्या दंडनीय व्याजाचा उल्लेख मंजूरीच्या आदेशात करण्यात यावा.
1 thought on “मोटार कार/सायकलची व्याजाची परिगणना|Motorcycle |Motor Car Interest”