वैयक्तिक संगणक /लॅपटॉप/टॅबलेट संगणक अग्रिम |Personal computer advance For Government Employees

प्रस्तावना :- कार्यालयीन कामकाज आता पूर्णत: संगणीकृत झाले आहे.त्यामुळे कर्मचारी हा संगणक साक्षर असला पाहिजे.हा शासनाचा उददेश आहे. 1990 च्या दशकात संगणक क्रांती भारतात झाली तेव्हापासून संगणकाचा वापर शासकीय कामकाजाचा एक भाग झाला आहे. सुरवातीला कर्मचारी यांना संगणक प्रशिक्षण देण्यासाठी शासन खर्च करत असे. त्यातुन संगणक अग्रिमाला 1193 पासुन वर्ग अ साठी सुरवात झाली आहे. आता अ ते ड कर्मचारी यांना अग्रिम देण्यात येते.

शासन निर्णयदि.01/04/1993 नुसार वर्ग अ अधिकारी यांना वैयक्त‍िक संगणक खरेदी करण्यासाठी रुपये 45000/- हजार  किंवा संगणकाची जी किंमत असेल तेवढे अग्रिम मंजूर करण्यात येत.

शासन निर्णयदि.01/07/2006 नुसार शासकीय वर्ग-2 व वर्ग-क यांना वैयक्त‍िक संगणक खरेदी करण्यासाठी अग्रिम मंजूर करणेबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.या आगोदर फक्त वर्ग अ साठी संगणक अग्रिम मंजूर करण्यात येत होते.

शासन निर्णयदि.03/02/2012 नुसार शासकीय  गट अ‍ ते गट ड (वाहन चालकासह) मधील अधिकारी / कर्मचारी यांना  वैयक्तिक संगणक /लॅपटॉप/टॅबलेट संगणक खरेदी करण्यासाठी अग्रिम मंजूर करणेबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.या आगोदर फक्त गट अ ते गट क साठी संगणक अग्रिम मंजूर करण्यात येत होते.

शासन निर्णय दिनांक 12/04/2023 नुसार “महराष्ट्र शासनाच्या सेवेत  असलेल्या भारतीय सेवेतील सनदी अधिकारी (IAS), भारतीय सेवेतील पोलीस अधिकारी (IPS), भारतीय सेवेतील वन अधिकारी (IFS) यांना गरजेनुसार ई-गव्हर्नन्स चालनाकरीता लॅपटॉप/आयपॅड/टॅबलेट पुरिठा माहिती तंत्रज्ञान विभागाच्या आर्थिक तरतूदीतून मंजूर करण्यात यावी. सदर खरेदी रू. १२००००/- (रूपये एक लाख वीस हजार फक्त) या कमला मर्यादेत असावी.

वैयक्तिक संगणक /लॅपटॉप/टॅबलेट संगणक खरेदीसाठी अटी व शर्ती खालील प्रमाणे आहे.

1. ज्या कर्मचारी यांना संगणक / लॅपटॉप / टॅबलेट संगणक अग्रिम मंजूर करावण्याचे आहे, अशा  कर्मचारी यांची  शासनाच्या सेवेतील  नियुक्ती संबंधित पदाच्या सेवाभरती नियमानुसार करण्यात आलेली असली पाहिजे आणि अशाप्रकारे करण्यात आलेल्या  नियुक्तीनंतर कमीत कमी 5 वर्षांची सलग सेवा झाली असली पाहीजे. सदर अग्रिम कर्मचारी यांना सेवेत कालावधी एकदाच देय आहे.

2. अग्रिमाची रक्कम जास्तीत जास्त रुपये 20000/- मंजूर करण्यात येते. किंवा संगणकाची प्रत्यक्ष किंमत.

3. अग्रिमाची वुसली अग्रिम मंजूरीच्या पुढील लगतच्या महिन्यापासून जास्तीत जास्त 40 हप्त्यांत करावी. तथापी एखादी कर्मचारी  नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त होणार असेल तर सेवानिवृत्तीपूर्वी संपूर्ण अग्रिमाची वसूली करता येईल.

4. दिनांक 01.05.2001 रोजी  किंवा त्यांनतर दोनपेक्षा अधिक अपत्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यास (दुसऱ्या वेळेस दुसऱ्या आपत्यांचा अपवाद वगळता) या अग्रिमाचा लाभ घेता येणार नाही.

5. सदर अग्रिम कर्मचाऱ्याने त्याच कारणासाठी वापरल्याच्या प्रमाणपत्राची एक प्रत कार्यालय प्रमुख यांनी सदर कर्मचाऱ्यांकडून प्राप्त करुन घ्यावी. तसेच  मुंबई वित्तीय नियमातील फॉर्म नं.20 मधील करारपत्र, फॉर्म नं. 21 मधील गहाणखत्याच्या प्रति व प्रतिभूती बंधपत्राच्या प्रती सबंधित कर्मचारी यांच्याकडून प्राप्त  करुन घेऊन मंजूरी अधिकारी कार्यालयाच्या  अभिलेख्यामध्ये  जतन करण्यात याव्या.

6. गहाणखतामध्ये वैयक्तिक संगणकाचा मेक/मॉडेल इत्यादींचा क्रमांक स्पष्टपणे नमूद करण्यात आला पाहिजे.

7. संगणक खरेदीसाठी जीएसटी किंवा जो कर असेल त्यासाठी वेगळा अग्रिम मंजूर करण्यात येत नाही.

8. दिनांक 01.05.2001 रोजी  किंवा त्यांनतर दोनपेक्षा अधिक अपत्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यास (दुसऱ्या वेळेस दुसऱ्या आपत्यांचा अपवाद वगळता) या अग्रिमाचा लाभ घेता येणार नाही.

9. मुंबई वित्तीय नियम-1959 मधील  नियम 136, 137 व 139 च्या अधीन राहून व वित्तीय विभाग, शासन निर्णय  दि.03/02/2012 मधील सूचना  व विहित नियम/अटींच्या अधीन राहून वितरीत करण्याची दक्षता मंजुरी देण्यात यावी.

10. कर्मचारी खरेदी करणार असलेल्या संगणकाची  किंमत प्रमाणीत अग्रिमापेक्षा कमी असल्यास संगणकाच्या किंमती इतकेच अग्रिम कर्मचाऱ्यास मंजूर करण्यात यावे. तसे शासनास त्वरीत कळविण्यात यावे. तसेच जर काही कारणास्तव सदर अग्रिम मंजूर करण्यात येत नसेल अथवा नाकारण्यात येत असेल तरीही शासनास त्वरीत कळविण्यात यावे.

11. प्रत्येक कार्यालयाने उद्दीष्ट निहाय केलेला दर महिन्याचा प्रत्यक्ष खर्च हा महालेखापाल यांच्या लेखयामध्ये दर्शविनिण्यात आलेल्या खर्चाशी तंतोतांत जुळण्यासाठी http://agmaha.cag.gov.in या वेबसाईटवर दरमहा मासिक खर्चमेळाचे काम ऑनलाईन करण्यात यावे.

12. मंजूर नियंत्रक अधिकारी यांनी उपलेखाशीर्षनिहाय  उदिदष्टनिहाय मासिक खर्चाचे नियोजन करुन संगणीकीय

अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे ( BDS) तरतुदीचे वाटप आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना करावे. सदर अनुदानातून केला जाणारा खर्च मासिक निधी विवरणपत्रानुसार संगणकीय अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे (BDS) दरमहा त्या त्या म‍हिन्याचा खर्च त्याच महिन्यांमध्ये करण्यात यावा. तो मंजूर तरतुदींच्या मयादेत करण्यात यावा.

13. वैयक्तिक संगणक /लॅपटॉप/टॅबलेट संगणक अग्रिम हा शासकीय सेवेतील कालावधीत एकदाच अनुज्ञेय करण्यात येतें.

14. वैयक्तिक संगणक /लॅपटॉप/टॅबलेट संगणक अग्रिमाची नोंद सेवापुस्तकात घेण्यात यावी.

15.  वैयक्तिक संगणक /लॅपटॉप/टॅबलेट संगणक खरेदी करण्यासाठीकरावयाच्या अग्रिम अर्जाचा नमुना

16. संगणक अग्रिमाची वसुली 7610-शासकीय कर्मचारी इ.ना कर्ज, 204- इतर आगाऊ रकमा (7610 504 100) या जमा शीर्षाखाली जमा करावी.

17. शासन निर्णयदि. 19/03/2002 अन्वये शासकीय कर्मचारी यांनी विमा विमा संचनालयाकडे उतारवा किंवा नाही.

18. शासन निर्णयदि. 17/06/1998 अन्वये c व्याजरहीत आहे.

19. शासन निर्णयदि. 25/01/2000 नुसार कर्मचाऱ्यांने संगणक एक महिन्यात खरेदी करावा किंवा अग्रिमाचा गैरवापर केला तर त्यांच्या कडून संपूर्ण अग्रिम 11.75 टक्के व्याज दराने एकरकमी वसुल करावी. 

Leave a Reply