प्रस्तावना:– भांडार शाखेचे काम हे कार्यालयामध्ये मागणी- पुरवठा करण्यासारखे आहे. एखादया कर्मचाऱ्यांचे संगणक बिघडले की, दुरुस्त करुन देणे. संगणकाचे दर पाच वर्षान निर्लेखन करणे. कार्यालयातील अधिकारी/कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामाचे साहित्य पुरवणे. गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM) पोर्टलवरुन साहित्य खरेदी करणे.
केंद्र सरकारने 2016 मध्ये दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या खरेदीसाठी जीईएम या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची स्थापना केली. खरेदीसाठी ही एक सोपी, पारदर्शक आणि पूर्णपणे डिजिटल प्रक्रिया आहे. जनरल फायनान्शियल रूल्स (financial Rules) 2017 नुसार सर्व मंत्रालये आणि विभागांना जीईएमकडून उपलब्ध वस्तू आणि सेवा खरेदी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
शासन निर्णय दिनांक 01/12/2016 नुसार शासकीय विभागांनी करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपध्दतीची सुधारित नियमपुस्तीका. हा शासन निर्णय भांडार शाखेसाठी खुप महत्वाचा आहे. यानुसार कार्यवाही केली जाते.
शासन निर्णय दिनांक 24/08/2017 नुसार शासकीय विभागांनी करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपध्दती धोरणामध्ये सुधारणा केंद्र शासनाने विकसीत केलेल्या गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM) पोर्टलची कार्यपध्दती राज्य शासनास वस्तु व सेवा खरेदीसाठी स्विकृत करण्यात आली आहे.
गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM) पोर्टलवर खरेदीसाठी उपलब्ध असलेल्या वस्तू व सेवांचे दोन किंवा त्यापेक्षा जास्त पुरवठादार असतील तर सदरच्या वस्तू व सेवांची गव्हनयमेंट ई- गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM) पोर्टलवर खरेदी करण्यास,खरेदी धोरण शासन निर्णय दिनांक 01/12/2016 मधील परिच्छेद 2.4 मध्ये नमुद केलेल्या लक्षक्यांकित विभागांना/कार्यालयांना बंधनकारक करण्यात आले आहे. यशदाने बनवलेली gem_Government e Marketplace ppt. मराठीमध्ये आहे.
शासन निर्णय दिनांक 10/09/2020 नुसार निरुपयोगी, दुरुस्ती न होण्याजोग्या शासकीय भांडार वस्तु, यांत्रसामुग्री, वाहने इत्यादी निर्लेखित करुन त्याची विक्री / विल्हेवाट लावण्याबाबत.
शासन निर्णय दिनांक 01/08/2011 नुसार संगणक, प्रिंटर, लॅपटॉप, सर्व्हर व इतर आयटी उपकरणांचे आयुष्यमान(Life) ठरविणे व कालबाहय झालेल्या उपकरणांची विल्हेवाट लावण्यात यावी. संगणक,लॅपटॉप,प्रिंटर,सर्व्हर व इतर सर्व माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित उपकरणे ज्यांचे वयोमान 5 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त झाले आहे.अशी उपकरणे कालबाहय झाल्याने निर्लेखित करण्यायोग्य ठरविण्यात यावीत.
शासन परिपत्रक दिनांक 18/06/1991 नुसार निरुपयोगी,दुरुस्ती न होण्याजोग्या अथवा गरजेपेक्षा अतिरिक्त असलेल्या शासकीय भांडारवस्तु,यंत्रसामुग्री,वाहने इत्यादीची लिलावने विक्री करण्याची व्यवस्था.
भांडार पडताळणी कर्मचारीवर्गाकरिता अनुदेश नियमपुस्तीका
शासन निर्णय दिनांक 18/12/2018 नुसार कृषि विभागातील कृषि आयुक्तालय अधिनस्त कार्यालयाकरिता गव्हनयमेंट ई- गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस प्रणालीव्दारे खरेदीसाठी व सदर प्रणालीच्या वापरासाठी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत..
शासन परिपत्रक कृषी, पशुसवंर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विकास विभाग दिनांक 15/02/2022 नूसार कालबाह्य, दुरुस्ती न होणाऱ्या अथवा अतिरिक्त असलेल्या भाडांर वस्तु/ भांगारसाहित्य/ यांत्रसामुग्री इत्यादींचे निर्लेखन करण्यासाठी स्थायी कार्यप्रणाली निश्चीत करण्याबाबत.
1 thought on “भांडार शाखेचे कार्य व गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस | Functions of Store Branch-(GeM)”