प्रस्तावना : आरोग्य सेवा अयुक्तालय, वैद्यकीय शिक्षण व संशेधन संचालनालय, अयुर्वेद संचालनालय व अन्न व औषध प्रशासन अंतर्गत लिपीक कर्मचारी शासन सेवेत आल्यानंतर या लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांना सेवाप्रवेशात्तर प्रशिक्षण आणि पदोन्नतीसाठी पर्यवेक्षीय प्रशिक्षण देणे अवश्यक असते.कालानुरुप शासन कामकाजात झालेले बदल,संगणकीकरण, शासन/प्रशासन व्यवहारात विविध संगणक प्रणालीचा वापर, बदललेले वित्तीय नियम यानुसार प्रशिक्षण अभ्यासक्रमात बदल करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या विविध प्रशासकिय विभागांच्या विभागीय परीक्षासंदर्भातील सामाईक बाबींबाबतचे धोरण शासन निर्णय दि. 31.03.2021 निश्चित करण्यात आले आहे. दिनांक 09/05/2022 च्या शासन निर्णयानुसार सुधारीत अभ्यासक्रम खालीलप्रमाणे लागू करण्यात येत आहे.
Table of Contents
अ)लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांकरिता सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण- सुधारित अभ्यासक्रम
अ.क्र. | सुधारित / प्रस्तावित अभ्यासक्रम | प्रशिक्षणाचा कालावधी | ||
1 | पेपर क्र.01 (100 गुण) | कार्यालयीन संघटन टिप्पणी प्रारुप | कार्यालयीन संघटन व्याख्या व उददीष्टे | सुटटीच दिवस वगळून एकूण 45 दिवस |
2 | पेपर क्र.02 (100 गुण) | सेवा नियम | महाराष्ट्र नागरी सेवा नियम(सेवा शर्ती, शिस्त व अपील, वर्तवणूक, रजा,वेतन, निवृत्तीवेतन इ.) | |
3 | पेपर क्र.03 एकुण (100 गुण) 70-गुण लेखी परीक्षा व 30 गुण संगणक चाचणी परीक्षा | वित्तीय नियम | 1)महाराष्ट्र कोषागार नियम पुस्तीका 1968 व महाराष्ट्र वित्तीय नियम (70-गुण) 2)संगणक चाचणीकरीता विषय-ई-निविदा,जीईम पोर्टल, ई-गर्व्हनस, ग्रास प्रणाली कार्यपध्दती, बिल पोर्टल,बिम्स, सेवार्थ, कोषवाहिनी, ऑनलाईन महसुल जमा/खर्च ताळमेळ, ई-ऑक्शन व इतर माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित कार्यप्रणाली(30 गुण) | |
4 | पेपर क्र.04 (100 गुण) | आरोग्य विषयक माहिती | नागरी वैद्यक संहिता,सामाजिक आरोग्य नियमावली, रुग्णालयीन प्रशासन पुस्तिका, नागरी वैदयक संहिता, सामाजिक आरोग्य नियमावली, रुग्णालयीन प्रशासन पुस्तिका, नागरी नोंदणी पध्दती. |
ब)लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांना पर्यवेक्षकिय पदाकरीता (पदोन्नती) प्रशिक्षण – सुधारित अभ्यासक्रम
सुधारीत अभ्यासक्रम | ||
पेपर क्र. | विषय | प्रशिक्षण कालावधी |
1 ते 4 | लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांना सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी निश्चित केलेले पेपर क्र. 1 ते 4 मध्ये विहित केलेला सुधारित संपुर्ण अभ्यासक्रमासह विधानमंडळा संबंधीत विविध आयुधांवर करण्यातय यावयाचे कामकाज,महालेखापाल कार्यालयांसंबंधीत कामकाज तसेच न्यायालय व विविध शासकीय कार्यालये समवेतचे पत्रव्यवहार व अनुषंगिक कामकाज, तसेच,राज्य माहिती आयोगाच्या सन 2012 च्या अहवालातील शिफारशीनुसार व केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार पदोन्नती देण्याच्या पात्रता परिक्षेच्या अभ्यासक्रमात. | सुटटीचे दिवस वगळूण एकूण 45 दिवस. |
अ) माहितीचा अधिकार अधिनियम-2005 | ||
ब) महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम-2005 | ||
क) महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडतांना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम-2005 मधील प्रकरण तीन. | ||
ड) आपत्ती व्यवस्थापन |
1)अ व ब मधील ऄभ्यासक्रम हे सार्वजनिक सुट्या वगळून एकूण 45 दिवसांचे असेल व हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ४5 दिवसांची परीक्षा उत्तीर्ण होणे संबंधीत प्रशिक्षणार्थीस बंधनकारक आहे.
2) कनिष्ठ लिपीक संवर्गासाठी वर्षातून दोन प्रशिक्षण सत्रे व पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांसाठी एक प्रशिक्षण सत्र घेण्यास मान्यता देण्यात येत अहे.
3) शासन निर्णय दि. 31.03.2021 नुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या विभागीय परीक्षेसाठी निश्चित केलेले धोरण आरोग्य सेवा अयुक्तालय, मुंबइ यांच्या अधिपत्याखालील कर्मचारी यांनाही लागू राहील. या धोरणानुसार परीक्षेला बसण्याची पात्रता, विभागीय परीक्षेचा उद्देश, परीक्षेला बसण्याकरीता विहित संधीची संख्या आणि विहित संधीत परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे परिणाम, परीक्षेला बसण्याची अनुज्ञेयता, परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट, परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी परीक्षेतील किमान गुणांचे मानक, परीक्षा उत्तीर्ण होण्याचा दिनांक, परीक्षा विहित संधीत उत्तीर्ण न झाल्यास रोखलेली वेतन वाढ अदा करण्याचा दिनांक तसेच, वरिष्ठ पदावर पदोन्नती देण्यासाठी पात्रता परीक्षेसाठीची पात्रता, विभागीय परिक्षेचा उद्देश व या अंतर्गत येणाऱ्या सर्व बाबी तसेच, समायोजनाने नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विभागीय परीक्षेसंदर्भात नमूद मार्गदर्शक सूचना इत्यादी सर्व बाबी आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील कर्मचाऱ्यांनी लागू करण्यात आले आहे.
4) सदर प्रशिक्षणास कर्मचाऱ्यांना सेवा जेष्ट्ठतेनुसार प्रशिक्षणास पाठविण्यात यावे. सदर प्रशिक्षण हे सेवांतर्गत प्रशिक्षण असल्याने या प्रशिक्षणास हेतुत: अथवा संयुक्तिक कारणाशिवाय अनुपस्थित राहील्यास, प्रशिक्षण अर्धवट सोडल्यास व याअनुषंगाने जेष्ट्ठतेवर किंवा वेतन वाढीवर परिणाम झाल्यास त्याकरीता संबंधित कर्मचारी स्वत: जबाबदार राहील. प्रशिक्षण अर्धवट सोडल्यास संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतनातून प्रशिक्षणाथींसाठी विहित केलेला खर्च वसूली पात्र राहील. सदर प्रशिक्षण पूर्णवेळ उपस्थित राहून पूर्ण केल्यांनतच प्रशिक्षणार्थ्यांस परीक्षेसाठी पात्र समजण्यास येईल. याबाबतचे हमीपत्रही संबंधित कर्मचाऱ्यांकडून घेण्यात यावे. तसेच, ज्या कर्मचाऱ्यांची प्रशिक्षणासाठी निवड झालेली असेल त्याला प्रशिक्षणासाठी कार्यमुक्त करण्याची जबाबदारी संबंधीत कार्यालय प्रमुखाची असेल.
5)लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांना सेवाप्रवेशात्तर प्रशिक्षण आणि पदोन्नतीसाठी पर्यवेक्षीय प्रशिक्षण यासाठी जो काही अभ्यासक्रम दिला आहे. त्यात काही पुस्तकांची नावे देण्यात आली आहे. जे सध्या उपलब्ध पुस्तके आहे. ते सर्व पुस्तके देण्यात आली आहे. काही online प्रशिक्षण आहे. त्याची सुध्दा लिंक देण्यात आली आहे. यांचा अभ्यास आपण करु शकता व परीक्षा उत्तीर्ण हाेणारच.