मुंबई वित्तीय नियम-1959 | Bombay Financial Rules-1959

25.संदेशवाहकाद्वारे वेतन, रजावेतन प्राप्त करणे (नि.क्र.81):-

शासकीय कर्मचारी रजेवर असल्यास त्याला देय असलेले रजा कालावधीतील वेतन हे त्याला संदेशवाहकामार्फत प्राप्त करून घेता येते.त्यासाठी कर्मचार्‍याने स्वाक्षरी करुन दिलेले अधिकारपत्र अशा संदेशवाहकाने धारण केलेले असल्यास, अशी देय रक्कम संदेशवाहकास प्रदान केली जाते.अशा प्राधिकारपत्रासोबत सदर कर्मचार्‍याने रक्कम मिळाल्याची पोच पावती संदेशवाहकामार्फत कार्यालयास सादर केली पाहिजे.कार्यालयातील रोखपाल किंवा रोख विभागातील कोणत्याही कर्मचार्‍याने कोणाचाही संदेशवाहक म्हणून काम करू नये.सुरक्षिततेच्या दृष्टीने, वेतन देयक तयार करणार्‍या कर्मचार्‍याने अशा प्रकारे रजेवरील कर्मचार्‍याने दिलेले प्राधिकारपत्र व त्यावरील कर्मचार्‍याची स्वाक्षरी पडताळून पाहिली पाहिजेत.कार्यालयप्रमुखाने अशा संदेशवाहकास स्वतः ओळखले पाहिजे किंवा इतरांकडून खात्री करून घेतली पाहिजे.अशा प्रकारे रक्कम प्राप्त करून घेताना, या रकमेच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी सदर शासकीय कर्मचार्‍याचीच असेल.

Leave a Reply