म.ना.से. रजा नियम-1981 | Leave rule-1981

Table of Contents

14.प्रसूती रजा (दत्तक मुलांसाठी रजा):-

            (नियम क्रमांक 74) शासनाच्या महिला कर्मचा-यांना 180 दिवसांपर्यंत प्रसूती रजा मिळू शकते.  पण रजा मंजूर करतेवेळी त्या महिलेला दोन किंवा दोनपेक्षा अधिक मुले जिवंत असता कामा नयेत म्हणजेच ही रजा 2 हयात अपत्यांपर्यंतच अनुज्ञेय आहे.  ही विशेष प्रकारची रजा कोणत्याही खात्यावर खर्च टाकली जात नाही.(महिलांसाठी रजा याबाबत विशेष Blog लिहला जाईल.)

         शासन निर्णय दिनांक 28.7.1995 व दिनांक 28.7.1995 अनुसार सुधारित केलेल्या नियमाप्रमाणे गर्भपात या कारणासाठी महिला कर्मचा-यास संपूर्ण सेवेच्या कालावधीत जास्तीत जास्त एकूण 45 दिवस रजा मिळू शकेल.  यावेळी हयात मुलांची संख्या विचारात घेण्याची आवश्यकता नाही.  पूर्वी या कारणासाठी सहा आठवडे रजा मिळत होती.  आता नविन नियमानुसार रजा मंजूर करताना पूर्वी मंजूर केलेली रजा एकूण 45 दिवसांच्या मर्यादेसाठी विचारात घेण्यात येवू नये. एकूण वेतनाच्या बाबतीत प्रसूती रजेस लागू असणा-याच तरतुदी या रजेसही लागू असतील.

अ.दत्तक मुलांच्या प्रकरणी रजा:-

           शासनाच्या कायमसेवेतील किंवा 2 वर्षापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या महिला कर्मचा-याने तीन वर्षापेक्षा कमी वयाचे व अनाथ मूल दत्तक घेतले असेल तर त्या महिलेस ही विशेष रजा मिळू शकेल.  ही विशेष रजा मूल दत्तक घेण्याच्या दिनांकापासून 90 दिवस किंवा मूल तीन वर्षाचे होईल तो दिवस यापैकी जो दिनांक अगोदरचा असेल त्या दिनांकापर्यंतच अनुज्ञेय असेल. संपूर्ण सेवेच्या कालावधीत ही विशेष रजा एकदाच अनुज्ञेय राहील व महत्वाची अट अशी की त्या महिलेस स्वत:चे मूल असता कामा नये.

ब.विशेष विकलांगता रजा:-

           नियम क्रमांक 75 मध्ये या रजेची तरतूद केलेली आहे.  आपल्या पदाची कर्तव्ये बजावत असताना, त्याच्या कामाचे स्वरुप धोकादायक असल्यामुळे, किंवा कोणी जाणूनबुजून एखाद्या कर्मचा-यास काही इजा केली व त्यामुळे तो विकलांग झाला तर त्याला या विशेष रजेचा लाभ मिळू शकेल.  अशी विकलांगता इजा झाल्यापासून 3 महिन्यांच्या आत निदर्शनास आणून दिली गेली पाहिजे किंवा ती 3 महिन्यानंतरच लक्षात आली असेल व नंतर निदर्शनास आणून दिली गेली तर अशी खात्री करुन मग ही रजा मंजूर केली पाहिजे.  प्राधिकृत वैद्यकीय अधिकारी मंजूर करेल तेवढे दिवस किंवा जास्तीत जास्त 24 महिन्यांपर्यंत अशी रजा मंजूर करता येते.  या रजेच्या कालावधीत पहिल्या 120 दिवसापर्यंत अर्जित रजे प्रमाणे वेतन मिळेल. नंतरही त्यांनी विनंती केल्यास आणखी 120 दिवसांच्या अर्जित रजा वेतनाच्या आधारे त्याला रजा देता येईल.  मात्र ही अतिरिक्त 120 दिवसांची रजा अर्धवेतनी रजा खात्यावर खर्च पडेल.

क.रुग्णालयीन रजा:-

          (हॉस्पिटलायझेशन लीव्ह) (नियम क्रमांक 77) ही रजा वर्ग 4 चे कर्मचारी व वर्ग 3 पैकी असे कर्मचारी ज्यांना घातक किंवा स्फोटक वस्तू हाताळाव्या लागतात, त्यांना मिळू शकेल.  शिवाय या प्रकरणात रुग्णालयात किंवा अन्यत्र उपचार करुन घ्यावयाचे असतील तेव्हा ही रजा मिळू शकेल.

     इतर कोणत्याही देय व अनुज्ञेय रजेला जोडून ही रजा घेता येऊ शकेल. मात्र जोडून घेण्यात येणा-या एकूण रजांचा कालावधी 28 महिन्यापेक्षा जास्त होता कामा नये.  या कालावधीत रजावेतन अर्जित रजेएवढे द्यावयाचे की अर्धवेतनी रजेएवढे यासंबंधी रजा मंजूर करणा-या अधिका-याने परिस्थितीनुसार निर्णय घ्यावयाचा आहे.

ड.खलाशांची रुग्णता रजा:-

         (सीमॅन्स सिकनेस लीव्ह) (नियम क्र. 78) शासकीय जहाजावरील अधिकारी किंवा वॉरंट अधिकारी किंवा इतर कर्मचारी यांना आजारासाठी किंवा इजेसाठी उपचार करुन घेण्यासाठी जास्तीत जासत 6 आठवडयापर्यंत पूर्ण वेतनी रजा मिळू शकेल.  कर्तव्य बजावताना विकलांग झालेल्या खलाशास जास्तीत जास्त 3 महिन्यापर्यंत पूर्ण वेतनी रजा मिळू शकेल.

इ.क्षयरोग रजा:-

            नियम क्रमंाक 79 परिशिष्ट 3) क्षयरोगासारखा गंभीर विकार झालेल्या कर्मचा-यास क्षयरोग रजा ही विशेष रजा दिली जाते.  क्षयरोगा प्रमाणेच कर्करोग / कुष्ठरोग व अर्धांगवायू या गंभीर रोगांसाठी देखील याच नियमांनुसार रजा दिली जाते.  शासन निर्णय दिनांक 20.1.2006 अन्वये या नियमात एड्स या रोगाचाही समावेश करण्यात आला आहे.  क्षयरोगासारख्याच रजेच्या सर्व सवलती एड्स या रोगामध्ये देखील दिल्या जातील.

            मात्र अस्थायी परंतु 3 वर्षापेक्षा जास्त अखंडित सेवा झालेल्या कर्मचा-यांनाच याबाबतीत रजेच्या व आर्थिक सवलती लागू राहतील.  एक वर्षापेक्षा जास्त व 3 वर्षापेक्षा कमी सेवा झाली असले तर आर्थिक सवलती व पूर्ण वेतनी क्षयरोग रजा मिळणार नाही, मात्र इतर सवलती मिळतील आणि 1 वर्षापेक्षा कमी सेवा झाली असेल तर याबाबतीतील कोणतीही सवलत मिळणार नाही.  निलंबित कर्मचा-यांना देखील या नियमांचा फायदा मिळू शकेल.

            शासकीय कर्मचा-यास क्षयरोग (किंवा इतर विकार) झाल्याचे योग्य त्या वैद्यकीय अधिका-यांचे प्रमाणपत्र त्याने सादर केल्यानंतरच देय व अनुज्ञेय सर्व पूर्ण वेतनी रजा प्रथम घ्याव्या लागतील. या रजा संपविल्यानंतर त्यास जास्तीत जास्त 1 वर्षाची पूर्ण वेतनी क्षयरोग रजा देण्यात येईल. या रजेच्या समाप्तीनंतरही तो कर्मचारी बरा होण्याची लक्षणे नसतील तर त्याला देय व अनुज्ञेय अर्धवेतनी रजा देण्यात येईल.  ही रजा समाप्त झाल्यानंतर त्यास आणखी रजेची आवश्यकता असेल तर वैद्यकीय मंडळाच्या शिफारशीवरुन असाधारण रजा देण्यात येईल.  मात्र सर्व प्रकारच्या रजा मिळून हा कालावधी 3 वर्षापेक्षा जास्त होणार नाही हे पहाण्यात यावे.  अन्यथा त्यास रुग्णता निवृत्त करण्यात यावे.  पूर्ण वेतनी क्षयरोग रजा कोणत्याही रजा खात्यामध्ये खर्च पडत नाही.क्षयरोग झालेल्या अस्थायी कर्मचा-यांना त्याच्या सेवेत खंड पडू नये म्हणून जास्तीत जास्त 1 वर्षाची असाधारण रजा मंजूर करण्यात येते. वरील दोन्ही बाबतीतील असाधारण रजा वेतन वाढीसाठी व निवृत्तीवेतनासाठी ग्राहय धरण्यात येईल.

            पहिल्या वेळची क्षयरोग रजा मंजूर करण्यासासाठी प्रादेशिक विभाग प्रमुख सक्षम असतील. योग्य त्या वैद्यकीय अधिका-याच्या शिफारशीनुसार त्याच कर्मचा-यास, कामावर हजर झाल्यानंतर, पुन्हा दुस-यांदा क्षयरोग रजेची (व इतर सवलतींची) आवश्यकता असेल तर त्यास विभाग प्रमुखांची मंजुरी घ्यावी लागेल आणि तिस-या वेळी पुन्हा याच रजेची आवश्यकता असेल तर रजा मंजुरीसाठी प्रशासकीय विभाग सक्षम आहे.  मात्र कोणत्याही परिस्थितीत चौथ्यांदा क्षयरोग रजा मंजूर करता येणार नाही.  अशा कर्मचा-याने चौथ्या वेळी रजेची मागणी केली तर त्यास रुग्णता निवृत्तीच्या दृष्टीने तपासणीसाठी वैद्यकीय प्राधिका-याकडे पाठवावे.

ई.अध्ययन रजा:-

            नियम क्रमांक 80, 81, 84, 86 व 93) शासकीय कर्मचा-यास त्याच्या पदाशी व कर्तव्य क्षेत्राशी प्रत्यक्ष व जवळचा संबंध असलेल्या व्यवसाय अथवा तांत्रिक विषयातील उच्च शिक्षण किंवा विशेष अभ्यासक्रम, लोकसेवेची निकड लक्षात घेऊन पूर्ण करण्यासाठी अध्ययन रजा मंजूर करण्यात येते.

            सामान्यपणे किमान 5 वर्षापेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचा-यास ही रजा मंजूर करण्यात येते, मात्र या रजेवरुन परत शासकीय सेवेत येण्याची खात्री नसेल किंवा आल्यानंतर 3 वर्षाच्या आत तो सेवानिवृत्त होण्याची शक्यता असेल तर त्यास ही रजा देण्यात येवू नये. अध्ययन रजा एकावेळी जास्तीत जास्त 12 महिने आणि संपूर्ण सेवेच्या कालावधीत एकूण 24 महिन्यांपर्यंत मंजूर करण्यात येते.  मात्र इतर रजांना जोडून अध्ययन रजा द्यावयाची झाल्यास एकूण रजा 28 महिन्यापेक्षा जास्त होता कामा नये.  अध्ययन रजा कोणत्याही रजा खाती खर्च पडत नाही.

            अध्ययन रजेसाठी कर्मचारी भारताबाहेर जाणार असेल तर त्याला रजेवर जाण्यापूर्वीचे वेतन रजेच्या कालावधीत मिळेल.  शिवाय त्यास काही विहित दराने अध्ययन भत्ता देखील मिळेल.  भारतामध्ये अभ्यासक्रम पूर्ण करावयाचा असेल तर त्यास फक्त वेतन मिळेल.  मात्र दोन्ही प्रसंगी महागाई भत्त्या व्यतिरिक्त इतर भत्ते मिळणार नाहीत.अध्ययन रजेवरुन परत आल्यानंतर पुढे किमान 3 वर्ष शासनाच्या सेवेत रहाणे अशा कर्मचा-यास बंधनकारक राहील.  3 वर्षाच्या आत त्यास राजीनामा द्यावयाचा झाल्यास तो मान्य होणार नाही. किंवा त्याने राजीनाम्याचा आग्रह धरलाच तर त्यास अध्ययन रजेच्या काळात देण्यात आलेले वेतन व भत्ते वसूल करण्यात येतील.  मात्र त्याचा असा राजीनामा वैद्यकीय कारणास्तव असेल तर मात्र तो मंजूर केला जाईल व वेतन वसूलीपासून त्यास सूट देण्यात येईल.

अर्धवेतनी रजेचे रोखीकरण

            नियतवयोमानानुसार निवृत्त होणा-या कर्मचा-यास निवृत्तीच्यावेळी त्याच्या खात्यावर शिल्लक असलेल्या संपूर्ण अर्धवेतनी रजेचे रोखीकरण अनुज्ञेय होऊ शकते.  मात्र हा लाभ सर्वच कर्मचा-यांना मिळेल असे नाही.  तर ते पुढील सुत्रानुसार अनुज्ञेय झाले तरच मिळू शकते.

सूत्र :  (अर्धवेतनी रजावेतन +   अनुज्ञेय असल्यास त्यावरील महागाई भत्ता) 

 

(वजा)

 (निवृत्तीवेतन+ इतर सेवानिवृत्ती लाभांचे निवृत्तीवेतन सममूल्य + रजावेतनावर महागाई भत्ता अनुज्ञेय असल्यास निवृत्तीवेतनावरील महागाई वाढ) 

 

 

अर्धवेतनी रजेचे

रोख सममुल्य        =

          शिल्लक      

X अर्धवेतनी रजेचे दिवस

                     30

            वरीलप्रमाणे निवृत्तीवेतन सममूल्य काढण्यासाठी प्रथम पुढील सूत्र वापरावे.

निवृत्तीवेतन सममूल्य    =             उपदान      

                                        12 x अंशराशीकरणाचा दर

            वरील सूत्रानुसार काही रक्कम निघत असेल तर अर्धवेतनी रजेचे रोखीकरण म्हणून ती मिळेल अन्यथा नाही.

एका सहामाहीत सुरु होऊन पुढील सहामाहीत संपणारी अर्जित रजा अर्जित रजा साठविण्याची  कमाल मर्यादा असाधारण रजा व निलंबनाच्या कालावधीसाठी अर्जित रजेमध्ये कपात

            (शासन निर्णय दिनांक 9.11.90 आणि दिनांक 1.1.91 दिनांक 15.1.2001) एक काल्पनिक उदा. घेऊन वरील प्रश्नांच्या अनुषंगाने रजा लेखा तयार करु.

उदा. एका कर्मचा-याच्या रजा खात्यावर दिनांक 31.12.2003 अखेर 300 दिवस अर्जित रजा शिल्लक होती.  त्याने दिनांक 1.7.2004 ते दिनांक 31.7.2004 आणि दिनांक 16.6.2005 ते दिनांक 15.7.2005 अशा अर्जित रजा उपभोगल्या. तो दिनांक 1.8.2005 ते 31.10.2005 या कालावधीत निलबित होता व निलंबन वैध ठरविण्यात आले.  तर दिनांक 30.6.2006 अखेर त्याच्या खात्यावर किती अर्जित रजा शिल्लक राहतील ते दाखवा.

अर्जित रजेचा लेखा :-

सहामाहीतील सेवेचा तपशीलपूर्ण महिनेप्रारंभी जमा रजामागील सहा माहिन्यातील निलंबनाचे दिवसकपात करावयाची रजा

(5च्या1/10)

एकूण रजा (4+8-5)उपभोगलेली रजा

 

शिल्लक रजा
पासून पर्यंत     पासून पर्यंत  एकूण 
1      2345678
300(31.12.03)
1.1.04 ते 30.6.04615300+15300 (कमाल मर्यादा)
1.7.04 ते 31.12.04615300+151.7.04 ते 31.7.04 = 31284
1.1.05 ते 30.06.0561529916.6.05 ते 30.6.05 = 15284
1.7.05 ते 31.12.056152991.7.05 ते 15.7.05= 15284
1.1.06 ते 30.6.06615929290290

  *(दिनांक 30.6.06 अखेर शिल्लक अर्जित रजा = 290 दिवस)

            नविन नियमानुसार रजा त्या त्या सहामाहीत खर्च टाकल्या जातात.  एखादी रजा एका सहामाहीत सुरु होऊन पुढील सहामाहीत संपत असेल तर त्या त्या सहामाहीतील रजेचे दिवस त्याच सहामाहीत खर्च टाकावेत, त्या सहामाहीचा रजेचा जमा खर्चाचा हिशोब पूर्ण करावा व पुढील सहामाहीशी संबंधित दिवस पुढील सहामाहीत खर्च टाकावेत. अर्जित रजा साठविण्याची कमाल मर्यादा 300 दिवस आहे.  परंतु एखाद्या सहामाहीच्या प्रारंभी जमा होणारे 15 दिवस वरीलप्रमाणे वेगळे दाखवावेत व त्या सहामाहीत उपभोगलेल्या रजा प्रथम त्या 15 दिवसांशी समायोजित कराव्यात.  त्या सहामाहीत काहीही रजा घेतली नाही तर ते 15 दिवस सहामाही अखेरीस व्यपगत होतील व पुन्हा 300 च्या कमाल मर्यादेत रजा शिल्लक राहील.

            एखाद्या सहामाहीतील निलंबनाचे किंवा असाधारण रजेचे जेवढे दिवस असतील त्याचे एक दशांश दिवस पुढील सहामाहीचा हिशोब करताना एकूण रजेतून वजा करावेत.  अशा रितीने एखाद्या सहामाहीत वजा करावयाच्या दिवसांची कमाल मर्यादा 15 असेल.  रजेचे दिवस अपूर्णांकात आल्यात ते नजीकच्या पूर्णांकात रुपांतरीत करावेत.अर्धवेतनी रजेच्या बाबतीत वजावट दाखविण्याची पध्दत वरीलप्रमाणेच आहे.  अर्धवेतनी रजा निलंबनाच्या दिवसांच्या एक अठरांश व दहा दिवसांच्या कमाल मर्यादेत पुढील सहामाहीत वजा केली जाते.

खालील प्रमाणे शासन निर्णय/परिपत्रक/अधिसूचना

1.शासन परिपत्रक दि.09 /06/2005 नुसार तीन दिवसाची अर्जीत /परीवर्तीत रजा मंजूर करण्यात यावी.

2.सहसंचालक,लेखा व कोषागारे,महाराष्ट्र राज्य,मुंबई यांचे पत्र क्र. 246 दि. 28/08/2019 च्या पत्रानुसार पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी 15 दिवसांच्या अतिरीक्त अर्जित रजा लेखाबाबत.

3.शासन निर्णय दि. 24/03/1982 नुसार नैमित्त‍िक रजेच्या मागे व पुढे रविवार आणि सार्वजनिक सुटटया जोडून घेण्याबाबत.

4.शासन परिपत्रक दि. 16/03/2018 नुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयासाठी अधिकारी/कर्मचारी (तात्रिक/अतात्रिक) यांचे रजा मंजूरीचे प्रस्ताव शासनास सादर करतांना घ्यायची दक्षता.

5.शासन निर्णय दि. 13/08/2013 नुसार शासकीय/निमशासकीय सेवेतील खेळाडूंच्या पालकांना रजा सवलती देण्याबाबत.

6.अधिसूचना दि. 06.06.2008 नुसार शासकीय कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना प्रदेय असलेल्या रजा वेतनाची रोख सममूल्य रक्कम.

7.शासन निर्णय दि. 11/05/1989 नुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय खेळ स्पर्धामधील सहभागामुळे होणाऱ्या अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याबाबत.

8.शासन निर्णय दि. 27/02/2004 नुसार राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय खेळ स्पर्धामधील सहभागामुळे राज्य शासकीय कर्मचारी यांना द्यावयाच्या अतिरिक्त वेतनवाढ/वेतनवाढी व अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याबाबत खुलासा.

9.शासन निर्णय दि.16/07/1994 नुसार राजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना रजा मंजूर करण्याच्या आणि शासकीय कर्मचाऱ्यांना अध्ययन करण्याच्या आणि शासकीय कर्मचाऱ्यांना अध्ययन रजा मंजूर करण्याच्या शक्ती प्रदान करणेबाबत.

10.शासन निर्णय दि. 20/06/1996 नुसार विलंबाने प्रदान करण्यात आलेल्या अर्जित/अर्धवेतनी रोख सममूल्य रकमेवर व्याज देण्याबाबत.

11.शासन निर्णय दि. 26.12.2011 नुसार शासकीय कर्मचारी वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय असाधारण रजेवर असताना वार्षिक वेतनवाढीचा पुढील दिनांक विनियमित करणेबाबत.

12.शासन निर्णय दि.12/08/1994 नुसार रजेशिवाय असलेल्या अनुपस्थितीच्या कालावधीचे भूतलक्षी प्रभावाने असाधारण रजेमध्ये परिवर्तन करण्यासंबंधातील अधिकार.

13.शासन परिपत्रक दि.10/04/1990 नुसार असाधारण रजेवर असतांना स्वेच्छा सेवानिवृत्ती.

14.शासन निर्णय दि.30/03/1995दि.26/02/2007 नुसार “टेकिंग एक्सपिडीशन्स” मध्ये भाग घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष नैमित्तिक रजा मंजूर करणेबाबत.

15.शासन निर्णय दि. 01/03/1997 नुसार शासन सेवेत तदर्थ(Adhoc)/अस्थायी नियुक्ती करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना रजा.

16.शासन निर्णय दि. 21/12/1998 नुसार 8 नैमित्त‍िक रजा अनुज्ञेय आहे.

17.शासनाचा रजा मंजूरीबाबत आदेश माहितीसाठी.

18.शासन निर्णय दि. 19/04/2022 नुसार कला संचालनालयाच्या नियंत्रणाखालील अशासकीय अनुदानीत कला संस्थामधील शिक्षक/ शिक्षकत्तेर कर्मचाऱ्यांना 1. अर्जित रजा रोखीकरण 2. महिला कर्मचाऱ्यांना प्रसुती 3. पक्षाघात झालेल्या कर्मचाऱ्यांना रजा सवलत लाभ देण्याबाबत.

19.शासन निर्णय दि. 20/01/2005 नुसार एडस रोगाचा समावेश करण्याबाबत.

20.शासन निर्णय दि. 10/04/1990 नुसार सेवानिवृत्तीपूर्वीची असाधारण रजा मंजूर करण्याचे अधिकार मंत्रालयीन विभागांना प्रत्यायोजीत करण्याबाबत.

21.शासन निर्णय दि. 14/07/1981 / दि. 29/05/1982 / दि. 20/03/1998 नुसार कुटुंब कल्याण कार्यक्रमासाठी संतती प्रतिबंधक शस्त्रक्रिया करुन घेणाऱ्या औद्योगिक व औद्योगिकेत्तर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष नैमित्तिक रजा देण्याबाबत.

22.शासन परिपत्रक दि. 09/05/2000 नुसार शासकीय कर्मचाऱ्यांना विकलांगता रजा मंजूर करण्यासंबंधातील खुलासा.

23.अध्ययन रजा मंजूरीचा शासन आदेश.

24.अध्ययन रजा मंजूरीचा शासन आदेश.

25.नमुना 4 व 5

Leave a Reply