शासकीय कामकाजास्तव हॉटेल वास्तव्यासाठी देय असलेल्या दैनिक भत्त्याच्या दरांत सुधारणा

प्रस्तावना:- शासकीय दौऱ्यावरील अधिकारी/कर्मचाऱ्यांना दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू व हैद्राबाद शहरांतील अनुसुचित दर आकारणाऱ्या हॉटेलमध्ये वास्तव्य केल्यास देय असलेल्या दैनिक भत्त्यातून दैनिक खर्च भागवणे शक्य होत नसल्याने शासन निर्णय दि.30/09/2022 नुसार राज्य शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांना शासकीय कामकाजास्तव हॉटेल वास्तव्यासाठी देय असलेल्या दैनिक भत्त्याच्या दरांत सुधारणा करण्यात आली आहे.  

Table of Contents

अ) हॉटेल वास्तव्यासाठी देय असलेल्या दैनिक भत्त्याच्या दरांत सुधारणा

अ.क्र.
 अधिकारी/कर्मचारी सातव्या वेतन आयोगानुसार विवरण करीत असलेला वेतनस्तर
अधिकारी/कर्मचाऱ्यांना दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू व हैद्राबाद.
 

 हॉटेलमध्ये वास्तव्य केल्यास देय असलेली प्रतिपूर्ती
भोजन व संकीर्ण
1
एस-30 व त्याहून अधिक
 रु.7500/-पर्यंत प्रतिदिन
 रू. 1200/- प्रतिदिन पेक्षा जास्त नाही.
2एस-25 ते एस-29

 

रू. 4500/- पर्यंत प्रतिदिनरू. 1000/- प्रतिदिन पेक्षा जास्त नाही.
3एस-20 ते एस-24

 

रू. 2250/- पर्यंत प्रतिदिनरू. 800/- प्रतिदिन पेक्षा जास्त नाही.
4एस-19 व त्यापेक्षा कमी

 

रू. 1000/- पर्यंत प्रतिदिनरू. 500/- प्रतिदिन पेक्षा जास्त नाही.

ब)कालावधीची मर्यादा दर्शविणारा तक्ता

मुख्यालयापासून अनुपस्थिती

 

प्रतिपूर्तीची मर्यादा

 

मुख्यालयापासून 6 तासांपेक्षा कमी कालावधीसाठी अनुपस्थिती

 

उपरोक्त तक्त्यातील मर्यादेच्या 30 टक्के रक्कम अनुज्ञेय
मुख्यालयापासून 6 ते 12 तास कालावधीसाठी अनुपस्थिती

 

उपरोक्त तक्त्यातील मर्यादेच्या 70 टक्के रक्कम अनुज्ञेय

 

मुख्यालयापासून 12 तासांपेक्षा जास्त कालावधीसाठी अनुपस्थिती

 

उपरोक्त तक्त्यातील मर्यादेच्या 100 टक्के रक्कम अनुज्ञेय

 

*सदर कालावधी मुख्यालयापासून अनुपस्थिती ही मध्यरात्री पासून ते मध्यरात्री पर्यंत गणण्यात येईल.

क)अटी व शर्ती खालीलप्रमाणे

1.) हॉटेल वास्तव्याची प्रतिपूर्ती :-

हॉटेल वास्तव्याची प्रतिपूर्तीची मागणी करतांना हॉटेलची पावती जोडणे आवश्यक राहील. उपरोक्त तक्त्यात नमूद करण्यात आलेल्या दरांपेक्षा कमी शुल्क आकारणाऱ्या हॉटेलमध्ये वास्तव्य करण्याचा कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करणे आवश्यक राहील.

2.) प्रवास भत्त्याची प्रतिपूर्ती :-

प्रवास भत्त्याची प्रतिपूर्ती ही वित्त विभागाच्या दि.03/03/2010 रोजीच्या शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे अनुज्ञेय राहील.

3.) भोजन व संकीर्ण खर्च :-

प्रत्येक भोजन व संकीर्ण खर्चासाठी स्वतंत्र प्रतिपूर्ती अनुज्ञेय राहणार नाही. त्याऐवजी उपरोक्त तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे एकत्रीतपणे प्रतिपूर्ती अनुज्ञेय राहील. सदर प्रतिपूर्ती ही खाली दर्शवलेल्या तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे मुख्यालयापासून अनुपस्थित असलेल्या कालावधीनुसार विनियमित करुन त्याप्रमाणे प्रतिपूर्ती अनुज्ञेय करण्यात आली आहे.

तसेच दैनिक भत्ता मंजूर करण्यासंदर्भातील अन्य अटी शासन निर्णय दि.03.03.2010 प्रमाणे कायम राहील/आहे. सुधारीत दर दि.08/10/2022 पासून आमलांत यावे. सदर प्रतिपूती ही केवळ दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू व हैद्राबाद. या शहरात शासकीय कामकाजास्तव दौऱ्यावर असतांना हॉटेलमध्ये वास्तव्य केलेतरच अनुज्ञेय ठरविण्यात आले आहे.

1 thought on “शासकीय कामकाजास्तव हॉटेल वास्तव्यासाठी देय असलेल्या दैनिक भत्त्याच्या दरांत सुधारणा”

  1. नमस्कार, डेंग्यू झालयानंतर तातडीची बाब म्हणून खाजगी रूग्णालयात आय.सी.यु. मध्ये उपचार झाले असल्यास वैद्यकीय प्रतीपूर्ती कशी करता येईलॽ डेंग्यबाबत शासन निर्णय असल्यास पाठविण्यात यावा.

    Reply

Leave a Reply